शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

जिल्हा खनिज विश्वस्त निधीप्रकरणी गोवा सरकारची अनास्था आदिवासी समाजाच्या मुळावर!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2018 6:32 PM

खाणपट्टय़ात राहणाऱ्या आदिवासी आणि कमकुवत समाजाच्या कल्याणासाठी स्थापन करायच्या जिल्हा खनिज विश्वस्त निधीवर केवळ खाण कंपन्यांशी संबंधित आणि हितसंबंधी नेते यांचीच वर्णी लावल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने ताशेरे ओढले असले तरी प्रत्यक्षात सर्वसमावेशक समिती नेमण्यासाठी उशीर होणार असल्याचे संकेत मिळतात.

- राजू नायक

खाणपट्टय़ात राहणाऱ्या आदिवासी आणि कमकुवत समाजाच्या कल्याणासाठी स्थापन करायच्या जिल्हा खनिज विश्वस्त निधीवर केवळ खाण कंपन्यांशी संबंधित आणि हितसंबंधी नेते यांचीच वर्णी लावल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने ताशेरे ओढले असले तरी प्रत्यक्षात सर्वसमावेशक समिती नेमण्यासाठी उशीर होणार असल्याचे संकेत मिळतात.

उच्च न्यायालयाने सरकारच्या हलगर्जीपणाबद्दल तीव्र रोष व्यक्त करताना आता केवळ जिल्हाधिकाऱ्यांना या निधीचे काम पाहण्याचे आदेश दिले आहेत. शिवाय ज्या बँकेमध्ये हा १८० कोटींचा निधी ठेवला आहे, त्यावर करडी नजर ठेवायच्या सूचना दिल्या आहेत. या निधीच्या अध्यक्षपदी सरकारने आमदार नीलेश काब्राल यांची नियुक्ती केली व अन्य सदस्य खाण व्यवसायाशी संबंधितच नेमले होते. ते खाण कंपन्यांचेच हितरक्षण करतील व कायद्यात ज्या कारणासाठी हा निधी तयार केलाय, त्याला हरताळ फासला जाईल, असा आरोप करून गोवा फाउंडेशन ही संघटना न्यायालयात गेली होती.

या समितीवर आता सरकारला खाणपट्टय़ात राहणारे तज्ज्ञ, कमकुवत समाजाचे प्रतिनिधी व ज्यांच्यावर अन्याय झाला त्यांचे प्रतिनिधी नेमावे लागतील. या समितीने ग्रामीण जनतेला- खाणींमुळे विवंचना सोसाव्या लागल्या. त्यांच्या कल्याणाच्या योजना आखाव्यात, असे स्वयंपोषक खाणींची कास धरणाऱ्या २०११च्या केंद्रीय खाण मंत्रालयाच्या दस्तावेजात नमूद करण्यात आले आहे. गोव्याच्या खाणपट्टय़ात सध्या तीव्र पाणी टंचाई सतावते आहे. खाणी दोन वर्षापूर्वी बंद झाल्यानंतर खाण कंपन्यांनी त्यांच्याकडून होणारा पाणीपुरवठा बंद केला.  तसेच इतर मोफत योजनाही बंद केल्या होत्या. खनिज निधीतून पाणीपुरवठा, विद्यार्थ्यांना बसेस, शाळांची दुरुस्ती आदी कामे हाती घेता येतात. सध्या न्यायालयात खाणपट्टय़ातील लोकांचे होत असलेले हाल व खाण कंपन्यांची बेफिकिरी यासंदर्भात अनेक अर्ज दाखल करण्यात आले आहेत.

गोवा फाउंडेशनचे प्रमुख क्लॉड आल्वारीस यांच्या मते, सरकार केवळ खाण कंपन्यांची खातीरदारी करण्यात मग्न असून त्यांना गरीब जनतेच्या हाल अपेष्टांची पर्वा नाही. या खनिज निधीवर सरकारला आता जादा सरकारी अधिकारी नेमावे लागले तरी त्यांनी सरकारच्या दबावाखाली काम न करता सामान्य जनतेचे हितरक्षण करावे, असे ते म्हणाले. गोवा सरकार किती सक्षम व वेगाने ही नवी समिती नियुक्त करते, त्याकडे लोकांचे लक्ष लागले आहे, असे ते म्हणाले.

खाणी बंद पडल्यानंतर खाणपट्टय़ातील खनिज अवलंबितांचे लांगूलचालन करण्यात सरकार गुंतले असून या लोकांना खिरापती म्हणून सरकारने किमान १०० कोटी उधळले आहेत, त्यांच्यावर कारवाई करू नका, असे सरकारने बँकांनाही साकडे घातले आहे; परंतु ज्यांच्यावर खाणींमुळे पर्यावरणीय व सामाजिक संकट कोसळले त्यांना सरकारने वाऱ्यावर सोडून दिले आहे. ग्रामीण गोव्यात हजारो लोक असे आहेत, ज्यांची शेते नापीक बनली व त्यांचे जलस्रोत आटले, त्यांना मात्र सरकारकडून कसलीही मदत मिळत नाही. खाणी बंद झाल्यावर बेरोजगार बनलेल्या मजुरांनी केंद्रीय मजूर खात्याकडे जावे, राज्य सरकार काही करू शकत नाही, असे उद्गार मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी गोवा विधानसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना काढले होते.

गोव्यात आदिवासींच्या संघटना सक्षम, प्रभावी नाहीत. त्यांच्या काही नेत्यांवर हल्लेही झाले आहेत. रवींद्र वेळीप यांच्यावर तर पोलीस कोठडीतही हल्ला करण्यात आला होता. हा समाज खाणींमधील प्रदूषण व सरकारची अनास्था यामुळे देशोधडीला लागला आहे. पर्यावरणप्रेमी माधव गाडगीळ यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या एका संघटनेने खाणी स्वत:कडे चालविण्यास देण्याची मागणीही सरकारकडे केली होती. परंतु सरकार कायद्यात दुरुस्ती करून खाणींची भाडेपट्टी त्याच चुकार खाणचालकांना द्यायला उत्सुक आहे. सरकारच्या भूमिकेमुळे आदिवासी समाजाचे संपूर्ण उच्चटन झाल्याचा आरोप त्या समाजाचे रवींद्र वेळीप यांनी केला. रवींद्र म्हणाले : सत्तरी तालुक्यातील पिसुर्ले, सांगे व केपे तालुक्यातील आदिवासी गावांमध्ये लोकांचे अक्षरश: हाल होत आहेत व जिल्हा खनिज निधीवर त्यांचे प्रतिनिधी घेऊन गावांविषयी प्रत्यक्ष योजना तयार करण्याची वेळ आली आहे. 

(लेखक गोवा आवृत्तीचे संपादक आहेत. )

टॅग्स :goaगोवा