शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
5
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
6
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
7
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
8
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
9
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
10
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
11
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
12
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
15
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
16
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
17
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
18
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
19
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
20
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा

ग्लोबल ‘प्रिसिजन’ ने दिली सोलापूरला नवी ओळख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 03:18 IST

१०० वर्षांपूर्वी मल्टिप्लेक्स संस्कृती प्रथम सोलापुरात रुजली. आता याच शहरात यतीन शहा व डॉ. सुहासिनी शहा यांच्या प्रिसिजन फाऊंडेशन व पुणे फिल्म फेस्टिव्हलच्या संयुक्त विद्यमाने दि. १६ ते १८ फेब्रुवारी या कालावधीत आंतरराष्टÑीय सिनेमा महोत्सव होत आहे. १३ देशातील २१ दर्जेदार सिनेमांचा सहभाग त्यात असणार आहे.

- राजा माने१०० वर्षांपूर्वी मल्टिप्लेक्स संस्कृती प्रथम सोलापुरात रुजली. आता याच शहरात यतीन शहा व डॉ. सुहासिनी शहा यांच्या प्रिसिजन फाऊंडेशन व पुणे फिल्म फेस्टिव्हलच्या संयुक्त विद्यमाने दि. १६ ते १८ फेब्रुवारी या कालावधीत आंतरराष्टÑीय सिनेमा महोत्सव होत आहे. १३ देशातील २१ दर्जेदार सिनेमांचा सहभाग त्यात असणार आहे. ‘प्रिसिजन’ परिवाराचे प्रत्येक पाऊल सोलापूरला नवी ओळख निर्माण करून देणारे ठरते...श्रम देवतेचे पूजक असलेल्या बहुभाषिक सोलापूर शहराने आपली पारंपरिक ‘गिरणगाव’ ही ओळख पुसून टाकण्याची प्रक्रिया गतिमान केली आहे. दरवर्षी राज्याला लागणाºया शालेय गणवेशांच्या निर्मितीत घसघशीत अर्धा वाटा उचलणाºया या शहराची ख्याती आता ‘गारमेंट आणि टेक्स्टाईल हब’ म्हणून देशभर होऊ लागलेली आहे. तेलंगणा, आंध्रप्रदेश आणि कर्नाटकाच्या सीमेवरील या शहराचा चेहरा जसा उद्यमशील आहे तसाच उत्सवप्रियदेखील आहे. साहित्य, क्रीडा आणि कलाक्षेत्रात सतत उपक्रमशील असलेल्या या शहराचे सर्वच आघाड्यांवर आंतरराष्टÑीय पातळीवर ब्रँडिंग करण्याची चळवळ उभी राहत आहे. याच चळवळीतील कृतिशील शिलेदार म्हणून यतीन शहा, डॉ. सुहासिनी शहा व त्यांच्या प्रिसिजन कॅमशाफ्टस् लि. या कंपनीची आवर्जून नोंद घ्यावी लागते.सोलापुरातील गिरण्या बंद पडत असताना शहराचा औद्योगिक श्वास गतिमान करण्याचे काम यतीन शहा यांच्या प्रिसिजन उद्योग परिवाराने १९९० च्या दशकापासूनच सुरू केले. त्यांचे वडील स्व. सुभाष शहा यांच्या वाहन उद्योग क्षेत्राला लागणाºया पार्टस्च्या उत्पादन उद्योगाला वैश्विक पातळीवर नेण्याचे काम त्यांनी केले. कल्पकता, संशोधनवृत्ती, धडाडी आणि जागतिक बाजारपेठेशी स्पर्धा करू शकणारी गुणवत्ता या बळावर पाहता-पाहता प्रिसिजन उद्योग समूह ‘ग्लोबल’ बनला. कॅमशाफ्टस् निर्मितीत त्यांनी युरोप, अमेरिका, चीनपर्यंत आपली पाळेमुळे रुजविली. सोलापुरात तयार झालेले कॅमशाफ्टस् टाटा, मारुतीसारख्या भारतीय कंपन्यांबरोबरच बी.एम.डब्ल्यू. मर्सिडीस्, फोर्ड, पोर्शसारख्या प्रतिष्ठित आंतरराष्टÑीय वाहनांमध्ये स्थिर झाले. आज इंग्लंड, जर्मनी आणि चीनसारख्या देशांमधील ख्यातनाम कंपन्यांसोबत उद्योग भागीदार बनण्याचे काम या कंपनीने केले आहे.सोलापुरात पाळेमुळे असलेल्या या आंतरराष्टÑीय कंपनीने आपल्या मातीशी असलेली नाळ अनेक माध्यमांतून घट्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. त्या प्रयत्नात यतीन शहा यांच्या पत्नी डॉ. सुहासिनी तसेच त्यांचा मुलगा करण व सून मयुरा, मुलगी तन्वी यांचा सदैव सक्रिय सहभाग राहिला आहे. व्यावसायिक आघाडीवर अनेक विक्रम नोंदविणारा शहा परिवार सोलापूरच्या सांस्कृतिक आणि सामाजिकदृष्ट्या सशक्त बनविण्याची भावना प्रामाणिकपणे जतन करीत आलेला आहे. अगदी जिल्हा परिषद शाळांना संगणक देण्यापासून ते शहरातील कलावंतांना व्यासपीठ मिळवून देण्यापर्यंतचे त्यांचे प्रयत्न चालू असतात. सोलापूरची आर्थिक प्रगती तर झाली पाहिजेच पण त्याला जोडून हे शहर अभिरुची संपन्नही बनले पाहिजे, हा दृष्टिकोन त्यांच्या प्रत्येक उपक्रमात दिसतो. २००९ सालापासून रंगणाºया ‘प्रिसिजन गप्पा’ आजवर कवी ग्रेस, अमोल पालेकरांसारख्या अनेक मान्यवरांच्या सहभागाने संस्मरणीय ठरल्या. २०११ सालापासून स्व. सुभाष शहा यांच्या स्मरणार्थ दिले जाणारे सामाजिक कृतज्ञता पुरस्कार वेगळे काम करणाºया राज्यातील व जिल्ह्यातील संस्था, व्यक्तींचे प्रेरणास्रोत बनले आहे. २०१५ सालापासून सुरू झालेला ‘प्रिसिजन संगीत महोत्सव’ असो वा गतवर्षीपासून पुणे फेस्टिव्हलच्या संयुक्त विद्यमाने होणारा सोलापूर आंतरराष्टÑीय चित्रपट महोत्सव असो, प्रिसिजन परिवाराचे प्रत्येक पाऊल सोलापूरला नवी ओळख देते. 

टॅग्स :Solapurसोलापूर