शहरं
Join us  
Trending Stories
1
'आधी प्रभू रामचंद्रांची भक्ती केली, नंतर अहंकार आला, म्हणून...', RSS नेते इंद्रेश कुमार यांचा भाजपवर निशाणा
2
अजित पवार गटासह शिंदेसेनेला ‘कॅबिनेट’? ‘एनडीए सरकार’चा पहिला मंत्रिमंडळ विस्तार सप्टेंबरमध्ये
3
स्वबळाच्या डरकाळ्या! विधानसभेला मविआ, महायुतीचे समीकरण फिसकटणार? सर्वांकडून स्वतंत्र चाचपणी
4
AFG vs PNG : अफगाणिस्तानचा विजयरथ कायम! सुपर-८ मध्ये धडक; न्यूझीलंड वर्ल्ड कपमधून बाहेर
5
आजचे राशीभविष्य, १४ जून २०२४: आरोग्य उत्तम राहील, पण रागावर मात्र नियंत्रण ठेवावे लागेल!
6
"त्यानं भारताविरूद्ध जे केलं ते...", नसीम शाहच्या समर्थनार्थ पाकिस्तानी अभिनेत्री मैदानात!
7
'इंडस्ट्रीत एखाद्याच्या मागून....'; सिद्धार्थने सांगितली कलाविश्वातील खटकणारी गोष्ट
8
Kuwait Fire: आज भारतात आणणार मृतदेह, कोणत्या राज्यातील किती लोकांचा मृत्यू?
9
भाजपच्या मराठा आमदारांची आज बैठक, दिवसभर मंथन-चिंतन बैठकांचाही जोर
10
दहशतवादाचे कंबरडे मोडा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निर्देश; दहशतवादी घटनांचा घेतला आढावा
11
न्यूझीलंड वर्ल्ड कपमधून बाहेर! शाब्दिक युद्ध पेटलं; दिग्गजानं पाकिस्तानची लायकी काढली
12
भाजीपाल्याचा दुष्काळ: फरसबी, वाटाण्यासह दोडका १६० रुपये किलो, गवार, शेवग्यानेही ओलांडली शंभरी
13
'करा किंवा मरा'च्या सामन्यात इंग्लंडचा 'मोठ्ठा' विजय; अवघ्या १९ चेंडूत सामना जिंकला
14
संसदेत बारामतीचे तीन खासदार, सुनेत्रा पवारांनी भरला राज्यसभेचा अर्ज; विराेधात कुणीच नाही
15
Wriddhiman Saha ची नवीन खरेदी; १२ व्या वर्षी पाहिलेलं स्वप्न अखेर पूर्ण, म्हणाला...
16
'घरातील काम ही फक्त महिलांची जबाबदारी का?' लोकप्रिय अभिनेत्री सान्या मल्होत्राचा सवाल
17
सूर्या, रोहितला १० वर्षांनी भेटणे विशेष, सौरभ नेत्रावळकरची प्रतिक्रिया
18
१,५६३ उमेदवारांचे ग्रेस गुण रद्द, केंद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयात माहिती; २३ जून रोजी ‘नीट’ची फेरचाचणी
19
येडीयुरप्पांविरोधात उद्या दाखल होणार चार्जशीट, निकटवर्तीय म्हणतात, ते तर दिल्लीला गेले
20
बांगलादेशची Super 8 च्या दिशेने कूच, नेदरलँड्सची हार अन् माजी विजेत्या श्रीलंकेचे संपले आव्हान

मंथनातून ‘अमृत’ यावे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2020 7:09 PM

मिलिंद कुलकर्णी पुराणात समुद्रमंथनाची कथा आहे. मंथनातून निघणारे अमृत देवांनी तर विष राक्षसांनी प्राशन केले होते. सद्प्रवृत्ती आणि दुष्प्रवृत्तीचे ...

मिलिंद कुलकर्णीपुराणात समुद्रमंथनाची कथा आहे. मंथनातून निघणारे अमृत देवांनी तर विष राक्षसांनी प्राशन केले होते. सद्प्रवृत्ती आणि दुष्प्रवृत्तीचे निदर्शक म्हणून देव आणि दानवांना ओळखले जाते. लहानपणी ‘विषामृत’ हा खेळ खेळला जात असे. त्याची आठवण येण्याचे कारण म्हणजे जळगाव शहरातील ‘अमृत पाणीपुरवठा योजने’वरुन असेच समुद्रमंथन सध्या सुरु आहे.केंद्र सरकार, राज्य सरकार व महापालिका यांचा सहभाग असलेली अमृत पाणीपुरवठा योजना गेल्या दोन वर्षांपासून शहरात राबवली जात आहे. मुदतीच्या आत ती पूर्ण झाली नाही आणि मुदतवाढ देण्यापूर्वी आकारलेला दंड मक्तेदार जैन इरिगेशन यांना मान्य नाही, असे त्रांगडे आहे. त्यालाही दोन महिने उलटले. परंतु, भाजपचे आमदार सुरेश भोळे यांच्या ‘सुपारी’च्या आरोपावरुन अपेक्षेप्रमाणे गदारोळ उडाला.महापालिका निवडणुकीत दारुण पराभव झालेल्या; मात्र विधानसभा निवडणुकीत तब्बल ४७ हजार मते मिळविल्याने उत्साहित झालेल्या राष्टÑवादी काँग्रेस पक्षाने भाजपविरोधात लगेच शड्डू ठोकले. एका गटाने आमदारांच्या प्रतिमेला ‘बेलफूल’ वाहण्याचे प्रतिकात्मक आंदोलन केले. तर दुसऱ्या गटाने पत्रकार परिषद घेऊन आमदारांच्या राजीनाम्याची मागणी केली. भाजपचे नव्याने महानगर जिल्हाध्यक्ष झालेले दीपक सूर्यवंशी हे आमदारांच्या बचावासाठी पुढे आले आणि त्यांनी राष्टÑवादीला प्रतिटोला हाणला. जळगावकरांनी नाकारलेल्या पक्षाने विनाकारण वादात पडू नये, असा सल्ला दिला.महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत शिवसेनेच्या सदस्यांनीही आमदार आणि भाजपची खिल्ली उडवली.मक्तेदार जैन इरिगेशननेही आपली भूमिका मांडत, हा तिढा सोडविण्यासाठी सर्व संबंधितांची एकत्रित बैठक बोलाविण्याची मागणी केली. ही योजना पूर्ण करण्याची इच्छा असल्याचा मनोदय देखील व्यक्त केला.आमदारांच्या विधानानंतर हे सगळे मंथन झाले. जळगावकरांच्या हाती काय आले, अमृत की विष ? या प्रश्नाकडे राजकारणाच्या पलिकडे जाऊन पहाण्याची आवश्यकता आहे. शेजारील धुळे जिल्ह्यातील पाणी योजना पाच-सहा वर्षांनंतरही वादामुळे पूर्ण होऊ शकलेली नाही. तसे जळगावात होऊ नये, यासाठी सर्व संबंधितांनी पुढे यायला हवे. चर्चेतून मार्ग काढायला हवा. अन्यथा भावी पिढी आपल्याला माफ करणार नाही. कारण जवळ असलेले वाघूर धरण यंदा ओसंडून वाहत आहे. जलसाठा चांगला असतानाही सध्या महापालिका नागरिकांना दोन दिवसाआड पाणीपुरवठा करीत आहे. पाईपलाईन फुटल्याने येणारा व्यत्यय हा वेगळाच आहे. पाणीपुरवठ्याची योजना जुनी झाल्याने एकाचवेळी संपूर्ण शहराला पाणीपुरवठा करणे महापालिकेला शक्य होत नाही. या पार्श्वभूमीवर अमृत पाणी योजना पूर्ण होणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे ही योजना लवकर पूर्ण होणे गरजेचे आहे.गेल्या पाच-दहा वर्षांत जळगावचा विकास खुंटलेला आहे, त्याला कारणीभूत पक्षीय राजकारण, एकमेकांचे पाय ओढण्याची वृत्ती, श्रेयासाठी चढाओढ, अभ्यासूपणा आणि कर्तव्यतत्परतेचा अभाव, व्यापक विचारापेक्षा तात्कालिक फायद्यासाठी संकुचित भूमिका हे घटक आहेत. घरकूल खटल्याचा निकाल लागला, परंतु, अपूर्णावस्थेत असलेली घरकुले पूर्ण व्हावी, यासाठी ना आमदार प्रयत्न करीत आहे, ना महापौर करीत आहे. शिवाजीनगर, पिंप्राळा, असोदा या उड्डाणपुलाचे भिजत घोंगडे कायम आहे. राष्टÑीय महामार्गाचे चौपदरीकरण संथ गतीने सुरु आहे. विमानतळावर नाईट लॅडिंगची सुविधा झाली असली तरी विमानसेवा रडतखडत सुरु आहे. प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.औद्योगिक विकास ठप्प झाला आहे. मंदीमुळे उद्योगांचा अस्तित्वासाठी संघर्ष सुरु असताना नव्या उद्योगांसाठी प्रोत्साहनपर वातावरण व अर्थसहाय्य, जागेची उपलब्धता यासंबंधी निर्णय होताना दिसत नाही. दहावी, बारावीनंतर मुले शिक्षणासाठी मुंबई, पुणे तर पदव्युत्तर शिक्षणासाठी परदेशात जात आहेत. हे बदलवण्यासाठी पक्षभेद विसरुन प्रयत्नांची आवश्यकता आहे.अमृत पाणीयोजनेचा विषय सोडविण्यासाठी शिवसेनेने पाणीपुरवठा मंत्री गुुलाबराव पाटील, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना साकडे घालून हा प्रश्न मार्गी लावायला हवा. राष्टÑवादीने अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा करुन निधी कसा उपलब्ध होईल, यासाठी प्रयत्न करायला हवे. जळगावकरांसाठी या मंथनातून अमृत निघावे, हीच अपेक्षा आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव