शहरं
Join us  
Trending Stories
1
पाथर्डीत मतदान कर्मचाऱ्यांकडेच सुजय विखे पाटील यांची प्रचार पत्रके, ग्रामस्थांचा आक्षेप
2
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates :राज्यात निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात सकाळी 9 वाजेपर्यंत सरासरी 6.45 टक्के मतदान झाले
3
उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला किती जागा मिळतील?; पंतप्रधान मोदींनी केला मोठा दावा
4
अणुबॉम्बच्या भीतीने पीओके जाऊ द्यायचे का? मणिशंकर अय्यर यांच्या वक्तव्यावर अमित शहांचे प्रत्युत्तर
5
निकालानंतर पुन्हा भाजपासोबत जाणार का?; राऊतांचा प्रश्न अन् उद्धव ठाकरेंचं सडेतोड उत्तर
6
मतदारयादीत नाव त्यांचेच पण आडनाव दुसऱ्याचे; सकाळीच रांगेत आलेले पती-पत्नी मतदानाला मुकले
7
Panchayat 3 ची झलक बघायची आहे? 'या' दिवशी रिलीज होणार सीरिजचा ट्रेलर
8
Tata Motors चे शेअर्स जोरदार आपटले, ८ टक्क्यांची घसरण; Q4 निकालांमुळे गुंतवणूकदार नाराज
9
Life Lesson : अस्थिर, अशांत, अविवेकी मनाला शांत कसं करायचं? उपाय सांगताहेत गौर गोपाल दास!
10
मध्य रेल्वे: ठाणे-कळवा स्थानकादरम्यान लोकल १ तासाहून अधिक वेळ थांबलेली; सहा मार्ग झालेले बंद
11
शिंदे कट्टर शिवसैनिक, ते बंड करणारे नव्हते, पण...; देवेंद्र फडणवीसांनी पडद्यामागचं राजकारण सांगितलं
12
Success Story: ₹८५० च्या पगारावरून ₹५५,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, नशीब बदलणाऱ्या उद्योजकाची कहाणी
13
पुण्यात पैसे वाटल्याचा धंगेकरांचा आरोप, मुरलीधर मोहोळांचे सडेतोड उत्तर; म्हणाले...
14
मृणाल दुसानीस इंडस्ट्रीत करणार कमबॅक?; सिनेकरिअरविषयी दिली मोठी हिंट
15
छत्रपती संभाजीनगरमध्ये २५ ईव्हीएम बंद पडली, परळीतही गोंधळ; टक्केवारीवर परिणाम
16
"उद्धव ठाकरेंचं स्वत:चं मेटावर्स जग, त्या जगाचे राजे तेच, नियमही त्यांचेच..."
17
Stock Market Opening Bell: Sensex-Nifty वर विक्रीचा दबाव, बाजार उघडताच गुंतवणूकदारांचे ₹४७.५ हजार कोटी बुडाले
18
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीचा अपघातात मृत्यू, बसने कारला धडक दिली अन्...
19
राज ठाकरेंच्या राजकारणाचा शेवट, आग लावण्याची कामं बंद करा; जितेंद्र आव्हाड संतापले
20
NPS: Retirement वर पाहिजेय ₹२ लाखांचं Pension? पाहा तुम्हाला किती करावी लागेल गुंतवणूक

गणराज रंगी...चार दशकांचा पुण्यातील सुरेल प्रवास!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2017 2:39 PM

पुण्यात आमच्या गल्लीतल्या गणपतीपाशी सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असे. आमचा निंबाळकर तालमीचा जुना गणपती उत्सव गजाननराव वाटवे, मालती पांडे, बबनराव नावडीकरांच्या भावगीतांनी रंगत वाढवायचा. तर एके वर्षी चक्क बिस्मिल्लाखॉंसाहेबांनी रस्त्यावर सनई वादन केले होते.

ठळक मुद्देदगडुशेठच्या शंभरीला पंचवीस वर्षांपुर्वी मी सारसबाग मैदानावर गजानन वाटवे, मालती पांडे, बाबूजी, ज्योत्स्ना भोळे, बबनराव नावडीकर, अरुण दाते, श्रीधर फटके, रवी साठे असे भावगीतातले तीन पिढ्यांतले गायक पेश केले होते.गिरगाव, डोंबिवली, दादर, पार्ले, माटुंगा, कल्याण, ठाणे या मुंबई परिसरात ठरलेले रसिक श्रोते भेटत. गायक गाण्याची ओळ विसरले तर समोर बसलेले रसिक गाण्याच्या ओळी खालून ओरडून सांगत. एक संध्याकाळ मात्र पुण्यातच शो करावा लागे कारण त्या दिवशी घरी होणारा मंत्रजागर टाळता येत नसे. समोरासमोर दहा-दहा गुरुजी बसून आरोह-अवरोहात मंत्रोच्चाराची स्पर्धा लागे. 'म....हे..' कोरसमध्ये  वरच्या पट्टीत ऐकायला मजा येत असे.

- सुधीर गाडगीळ

गणपती जवळ आले की, आमच्या जुन्या वाड्यातल्या अंधारलेल्या देवघरात 'दिवा' लावला जायचा. गणरायाची प्रसन्न मूर्ती सर्व वेळ स्वच्छ दिसायला हवी, हा त्यामागे  उद्देश होता. पहाटे पहाटे गुरुजी यायचे. साग्रसंगीत पूजा-आरती मग मोदकाचा नैवेद्य झाला की मगच वाड्यातला-गल्लीतला गणपती पाहायला जायची मुभा होती. वाड्यातल्या गणपतीसाठी  दोनदा एकेका बिऱ्हाडांचा नैवेद्य असायचा. त्या लहान वयात त्याची उत्सुकता असायची.

पुण्यात आमच्या गल्लीतल्या गणपतीपाशी सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असे. आमचा निंबाळकर तालमीचा जुना गणपती उत्सव गजाननराव वाटवे, मालती पांडे, बबनराव नावडीकरांच्या भावगीतांनी रंगत वाढवायचा. तर एके वर्षी चक्क बिस्मिल्लाखॉंसाहेबांनी रस्त्यावर सनई वादन केले होते. अलिकडे सांस्कृतिक कार्यक्रमांपेक्षा लायटिंग-सजावट-देखावे यावरच भर दिला जातो. मी स्वतः सांस्कृतिक कार्यक्रमांचं सादरीकरण-आयोजन-निवेदन करायला लागल्यावर मला तर गणपतीच्या दहा दिवसांपैकी सात-आठ दिवस गावोगावी शोसाठी जावं लागे. माडगूळकर-बाबूजी यांच्या गाण्यांनी नटलेलं 'चैत्रबन' घेऊन आम्ही महाराष्ट्राच्या गावोगावी गणपतीमुळेच जाऊन आलेलो आहोत. गिरगाव, डोंबिवली, दादर, पार्ले, माटुंगा, कल्याण, ठाणे या मुंबई परिसरात ठरलेले रसिक श्रोते भेटत. गायक गाण्याची ओळ विसरले तर समोर बसलेले रसिक गाण्याच्या ओळी खालून ओरडून सांगत. इतकं त्यांचं गाण्याशी-आम्हा कलावंतांशी जिव्हाळ्याचं नातं होतं. हृदयनाथ मंगेशकर, अरुण दाते यांचे कार्यक्रमही आम्ही त्याकाळी गणेशोत्सवातच केले आहेत.

विशेष म्हणजे तेव्हा आम्ही सर्वच कलावंत 'नोकरी' करत होतो. त्यामुळे रात्री कार्यक्रम करुन, उत्तररात्री जेवून, प्रवास करुन पहाटे पुण्यात पोहोचायचो आणि सकाळी फ्रेश होऊन, नोकरीवर जाऊन, संध्याकाळी त्या दिवशीच्या शोची तारिख ज्या गावी असेल तिकडे जाण्यासाठी मॅटेडोर पकडायचो. सलग आठ दिवस नोकरी-कार्यक्रम-प्रवास करुन सुद्धा कणमात्र कंटाळा येत नसे. त्या गणपती शाेजची वेगळीच झिंग चढत असे. एक संध्याकाळ मात्र पुण्यातच शो करावा लागे कारण त्या दिवशी घरी होणारा मंत्रजागर टाळता येत नसे. समोरासमोर दहा-दहा गुरुजी बसून आरोह-अवरोहात मंत्रोच्चाराची स्पर्धा लागे. 'म....हे..' कोरसमध्ये  वरच्या पट्टीत ऐकायला मजा येत असे.

दगडुशेठच्या शंभरीला पंचवीस वर्षांपुर्वी मी सारसबाग मैदानावर गजानन वाटवे, मालती पांडे, बाबूजी, ज्योत्स्ना भोळे, बबनराव नावडीकर, अरुण दाते, श्रीधर फटके, रवी साठे असे भावगीतातले तीन पिढ्यांतले गायक पेश केले होते. छोट्या गावांमध्ये सिनेमे दाखवण्यावर भर असे. उलट्या बाजूने सिनेमा कसा दिसतो, हे पाहण्याची पोरांना उत्सुकता असे. 'गणपती' आले की मला हा चाळीस वर्षांचा कार्यक्रमांचा सुरेल प्रवासच आठवतो. 

 

टॅग्स :Ganeshotsavगणेशोत्सव