शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

कृपाशंकर गणपती, नार्वेकर गणपती आणि मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2018 11:57 AM

Ganpati Festival : कृपाशंकर सिंह एकसारखे गॅलरीतून घरात आतबाहेर करीत असतात. मधेच टेबलवरील पाण्याचा ग्लास घटाघटा पितात. त्यांची ही अस्वस्थता त्यांची पत्नी हेरते.

- दे. दे. ठोसेकर कृपाशंकर गणपतीकृपाशंकर सिंह एकसारखे गॅलरीतून घरात आतबाहेर करीत असतात. मधेच टेबलवरील पाण्याचा ग्लास घटाघटा पितात. त्यांची ही अस्वस्थता त्यांची पत्नी हेरते. तनीक बैठ जाईयेगा. इतनी बार फोनुवा करके बुलाया है तो आ जायेंगे, असं बायको बोलते. नही नही हम इसलिए परेशान नही है की वो आयेंगे या नही आयेंगे. हम तो बस इसलिए परेशान है की, वो ससुरा नार्वेकर उनको छोडेगा तो वो हमार पास आएंगे ना? तेवढ्यात दरवाजाची बेल वाजते... (बेलवर गाणे मुत्त‘कोडा’ कव्वाडी हडा...) दरवाजात साक्षात देवेंद्रभौ. कृपाभय्या त्यांना चक्क मिठी मारतात. मग सिंह परिवाराची ओळख परेड सुरु होते. ये बेटा, ये दामाद, ये बहू, ये बहन के जिजा, जिजा के चचेरे भाई, बहनोई के बडे साले... (देवेंद्रभौ अस्वस्थ होतात) गणपती  कुठयं? देवेंद्रभौ कृपाभय्यांच्या गणपतीसमोर उभे राहून हात जोडतात.कृपाशंकर गणपती : बहुत इंतजार करवाया बाबुजीको. कल से मै घरमा हूं पर उनको मेरी कौ ना पडी है. दु दिन से सुन रहा हूं की शीएमवा आ रहे है शीएमवा आ रहे है.

देवेंद्रभौ : काय करणार बाप्पा. सतत फोन, मेसेज. सकाळपासून चार कार्यकर्ते वर्षाच्या दरवाजात. एक माझ्या घरच्या बाप्पाची पूजेची तयारी करायला, एक प्रसाद वाटायला, एक येणाऱ्यांना हवं नको ते पाहायला. एकसारखे माझ्या जवळ येऊन कब निकलना है... कृपाजी इंतजार कर रहे है... शेवटी कशीबशी आरती केली आणि पोहोचलो.

कृपाशंकर गणपती : बहोत बढीया. वो क्या है ना की, जब से ये कृपाभय्या ‘हिंदी मेरी माँ और मराठी मेरी मौसी’ बोल रहे है आणि जब से ‘माय मरो, पण मावशी जगो’ ही म्हण सबको सुनाते आए है तभी से मेरे भक्त है. पर इनकी समस्या तो मै हल नही कर सकता. आप दयालू है. आपने जिस लाडप्यार से आर. एन. सिंह, प्रसाद लाड, प्रवीण दरेकर वगैरा वगैरा को गोद मे लेकर प्यार दिया है उसी तरह इन्हे प्यार दो. वैसे ये सेवा मे कम नही करते. इसके पहले कई लोगो की इन्होने सालो साल सेवा कि है. दो दिनोसे मेरी सेवा मे लगे है. पर इन्होने मोदक नही खाया है. गणपती का प्रशाद खाऊंगा तो देवेंद्रभौ के हाथ से, ऐसा निश्चय किया है उन्होने. (लागलीच देवेंद्रभौ कृपाभय्यांना जवळ बोलावून भलामोठा मोदक त्यांना प्रेमपूर्वक भरवतात) (कृपाशंकर पुन्हा कडकडून मिठी मारतात)

कृपाशंकर गणपती : चलो एक समस्या हल हो गयी. इसके पहले मैने ही विधानसभा अध्यक्ष का आशीर्वाद दिलवाया था इन्हे. न जाने ऐसे कई भक्तोंकी समस्यांओ का टेन्शन लेनेसे मेरे उपर का भी स्ट्रेस आजकल बढा है. (देवेंद्रभौ पुन्हा गणपतीला दंडवत घालतात आणि कृपाभय्यांनी हातावर ठेवलेला मोदक गट्ट करतात)------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------नार्वेकर गणपतीमिलिंद नार्वेकर आपल्या मोबाईलवर बोलत आहेत... हे बघा उद्धवसाहेब तुमच्या गणपतीला परवा येतील. आज साहेबांना वेळ नाही. दिवसभराचा प्रोग्राम पॅक आहे. काय म्हणता परवा गणपती नसेल? असू द्या ना. तुम्हाला साहेब येणं महत्त्वाचं आहे की, साहेबांनी गणपती बघणं? चला जय महाराष्ट्र... (तेवढ्यात बेल वाजते. गाण...मिले सूर मेरा तुम्हारा) दरवाजा उघडतात तर समोर साक्षात मुख्यमंत्री देवेंद्रभौ. हस्तांदोलन करतात या साहेब... या... बरं झालं आलात. अगोदर बोलू, मग बसू की अगोदर बसू, मग बोलू... नार्वेकर हळूच डोळा मारतात. मिलिंद, अगोदर दर्शन घेऊ... देवेंद्रभौ गालातल्या गालात हसतात.

नार्वेकर गणपती : नमस्कार, मुख्यमंत्रीसाहेब कसे काय बरे आहात नां? रोज सामना वाचताय का? नका वाचत जाऊ.

देवेंद्रभौ : गणराज हे काय ऐकतोय मी? (नार्वेकर शेजारीच उभे असतात)

नार्वेकर : (हळूच सीएमच्या कानात) आमचा गणपती कधीच खोटं बोलत नाही. तोच मला रोज सांगतो आजचा अग्रलेख वाचायचा की नाही.

नार्वेकर गणपती : मुख्यमंत्री महोदय तुम्हाला एक अ‍ॅडव्हान्स टीप देतोय. संजय राऊत यांनी यंदा नवरात्रौत्सवात रंगशारदामध्ये चंद्राबाबू नायडू, ममता बॅनर्जी, शरद पवार वगैरेमंडळींना घेऊन उद्धव ठाकरे यांच्यासोबत टिपºया खेळायचा कार्यक्रम आयोजित करायचं ठरवलय. तेव्हा त्यापूर्वी काहीतरी हालचाली करुन युतीचं पक्क करा.(देवेंद्रभौ अवाक होऊन नार्वेकरांकडे पाहतात)

नार्वेकर : मी म्हटलं नां आमचा गणपती स्ट्रेटफॉरवर्ड आहे. युती करायची तर तोंडावर हो. नाही तर नाही. पेपरात एक, ओठात दुसरं असं नाही बुवा आमच्या गणपतीचं. पण आपल्याला युती करायची आहे. (सुकामेव्याचा लाडू एकमेकांना भरवतात)नार्वेकर गणपती : रामदासभाई, रावते वगैरे काय बोलतात ते फारसं मनावर घेऊ नका. वाटाघाटींच्या वेळी बशीतील बिस्कीटं, काजू संपवायला काही मंडळी लागतात.

देवेंद्रभौ : पण छोटेराजे आदित्य...?

नार्वेकर गणपती : मातोश्री नंबर दोनचं काम पूर्ण होत आलय. पोरांचं दोनाचे चार करायचं बघायला लागेल. अक्षता पडल्या म्हणजे मधूचंद्र आलाच. लोकसभेबरोबर विधानसभा आणि मधूचंद्र (देवेंद्रभौ खळखळून हसतात ‘मिशन मधूचंद्र’ असं बोलत टाळी देतात)

नार्वेकर गणपती : युतीबिती, सत्ताबित्ता ठीक आहे पण मधेमधे तब्येतीकडं पहा. (देवेंद्रभौ पोटावरुन हात फिरवतात)------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------पीए : सर, नारायण राणेंचा गणपती सारखा फोन करतोय कधी येणार, कधी येणार...देवेंद्रभौ : तेच आता इकडं आलेत. त्यांच्या गणपतीला कळवा पुढल्या वर्षी लवकर येतो...

टॅग्स :Ganpati Festivalगणेशोत्सवDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAditya Thackreyआदित्य ठाकरेKripashankar Singhकृपाशंकर सिंग