शहरं
Join us  
Trending Stories
1
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
2
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
4
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
5
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
7
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
8
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
9
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
10
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
11
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
12
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
13
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
14
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
15
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
16
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
17
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
18
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
19
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
20
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज

राजाकडून निराशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2019 11:54 PM

लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा जळगाव जिल्ह्यात होणार नाही, हे आता निश्चित झाले आहे.

मिलिंद कुलकर्णीलोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा जळगाव जिल्ह्यात होणार नाही, हे आता निश्चित झाले आहे. सोमवारी ते नंदुरबारला येत आहेत, तर धुळ्यात १६ फेब्रुवारीला त्यांची सभा झाली होती. याचा अर्थ काय काढावा? जळगाव जिल्ह्यातील दोन्ही जागा भाजपच्या दृष्टीने जिंकण्याच्या गटात आहेत काय? याचे उत्तर जो तो आपापल्या पध्दतीने देईल. पण ‘राजा’ने जळगावकडे पाठ फिरविल्याने जिल्हावासीय मात्र निराश झाले आहेत. कारण गेल्यावेळी मोदी यांची सभा लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत एरंडोल, जळगाव याठिकाणी सभा झाल्या होत्या. त्यावेळी त्यांनी मतदारांना मोठे स्वप्न दाखविले होते. त्यातील एक टेक्सटाईल पार्कचे होते. ते म्हणाले होते, जळगाव जिल्ह्यात कापूस मोठ्या प्रमाणात पिकतो. परंतु, प्रक्रिया उद्योग नसल्याने तो आमच्या गुजराथमध्ये येतो. म्हणून आमचे सरकार आल्यावर याठिकाणी प्रक्रिया होईल, असे उद्योगांचे जाळे उभारु. पाच वर्षात काय झाले? जामनेरला केवळ जागा अधिग्रहित झाली. फलक लागले. एकही उद्योग सुरु झालेला नाही. कापूस गुजराथमध्ये जात आहेच.स्थलांतर रोखण्यासााठी खान्देशात सिंचनाच्या सुविधा देऊ. म्हणजे, खान्देशातील नागरिक गुजराथ, मध्य प्रदेशात स्थलांतर करणार नाहीत. सिंचनाच्या आघाडीवर देखील निराशाजनक कामगिरी पाच वर्षांत झाली आहे. दोन केंद्रीय जलसंपदा मंत्री झाले, पण मेगा रिचार्ज प्रकल्प साकारला नाही. पाडळसरेचे काम ठप्प आहे. प्रकाशा व सारंगखेडा बॅरेजमधील पाण्यासाठी शेतकरी डोळे लावून बसले आहेत. अक्कलपाडाचे पाणी धुळ्यासाठी अद्याप आलेले नाही. सुलवाडे जामफळ, शेळगाव, वरखेडे-लोंढे असे अनेक प्रकल्प अपूर्णावस्थेत आहेत. गिरीश महाजन हे राज्याचे तर नितीन गडकरी हे देशाचे जलसंपदा मंत्री असल्याने मोठ्या अपेक्षा होत्या. परंतु, समाधानकारक प्रगती झाली नाही, हे वास्तव आहे. त्यामुळे खान्देशातील तिन्ही जिल्ह्यातील रहिवाशांचे चार-सहा महिने स्थलांतर कायम आहे.गेल्या निवडणुकीच्यावेळी औद्योगिक विकासाचे ‘गुजराथ मॉडेल’ मोदी यांनी मांडले होते. सत्ता आल्यास तसाच औद्योगिक विकास खान्देशात करु, असे आश्वासन त्यांनी दिले होते. मात्र याठिकाणीही निराशा पदरी आली. नंदुरबार जिल्ह्यातील गुजराथच्या सीमेवरील गावांमध्ये उद्योग आले, पण त्यांना सोयीसुविधा मिळत नाही. नरडाण्याच्या दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडोर अद्याप कागदावरच आहे. जळगाव, भुसावळचा औद्योगिक विकास ठप्प आहे. प्लास्टिक पार्कची प्रतीक्षा कायम आहे.धुळ्यातील सभेत तर पंतप्रधानांनी निराशा केली, पण नंदुरबारात ते काय बोलतात, याची उत्सुकता राहील.गडकरी भुसावळला येऊन गेले. महामार्ग बांधकामाच्या प्रगतीविषयी बोलले. भाजपाची मंडळी हुशार आहे. त्यांनी गडकरींची सभा महामार्गाचे काम सुरु असलेल्या भुसावळला लावली. काम ठप्प असलेल्या जामनेर, जळगाव, एरंडोल, पारोळा याठिकाणी लावली नाही. कारण १६५०० कोटी रुपयांच्या कामांचे भूमिपूजन तीन वर्षांपूर्वी गडकरी यांनी केले. त्यापैकी केवळ तरसोद ते चिखली आणि जळगाव ते चाळीसगाव याच रस्त्याचे काम सुरु आहे. उर्वरित सर्व काम ठप्प आहे. नवापूर ते तरसोद या राष्टÑीय महामार्ग क्र.६ चे काम तर रडतखडत सुरु आहे. कधी सुरु होते आणि कधी बंद होते, हे कळतच नाही.गडकरी यांनी महामार्गाविषयी अधिक बोलण्याऐवजी जळगाव ते भुसावळदरम्यान डबलडेकर हवाई बस सुरु करण्याचे स्वप्न दाखविले. आता ही बस कशी असेल ? खर्च किती येईल? तंत्रज्ञान कोणते? याचा काहीही तपशील मिळाला नसला तरी स्वप्न मोठे दाखविले. मध्यंतरी जलवाहतुकीचे स्वप्न खान्देशवासीयांना दाखविले. मुळात नद्या बारमाही वाहत नसताना जलवाहतूक होणार कशी, हा प्रश्न पडतोच. पण विचारणार कुणाला?असाच अनुभव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत आला. पाडळसरे धरणाविषयी जनभावना तीव्र होत्या, त्यांनी नाबार्डकडे जाणार असल्याचे आश्वासन दिले. हुडको कर्जाविषयी पंतप्रधानांकडे जाण्याचे आश्वासन दिले. बलून बंधारे आणि मेगा रिचार्ज जणू कार्यान्वीत झाले अशा पध्दतीने त्यांनी भाषणात उल्लेख केला. सत्ताधारी मंडळींची ही आश्वासने जनतेला निराश करणारी आहेत, हे मात्र निश्चित.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकJalgaonजळगाव