शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

‘फाइव्ह जी’ वायरलेसचा फटका हवामान अंदाजाला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2019 06:21 IST

येत्या काही वर्षांतच एक पूर्ण लांबीचा हाय डेफिनेशन (एचडी) चित्रपट काही सेकंदातच आपल्या मोबाइलमध्ये डाऊनलोड करणे शक्य होणार आहे. एवढंच नाही तर इंटरनेट आॅफ थिंग्ज (आयओटी) येत्या दहा वर्षांत बेफाट वाढणार आहे.

- शैलेश माळोदे (विज्ञान लेखक)येत्या काही वर्षांतच एक पूर्ण लांबीचा हाय डेफिनेशन (एचडी) चित्रपट काही सेकंदातच आपल्या मोबाइलमध्ये डाऊनलोड करणे शक्य होणार आहे. एवढंच नाही तर इंटरनेट आॅफ थिंग्ज (आयओटी) येत्या दहा वर्षांत बेफाट वाढणार आहे. इंटरनेट आॅफ थिंग्ज म्हणजे भौतिक वस्तू जागतिक स्तरावर इंटरनेटमुळे जोडल्या जाऊन निर्माण होणारं महाजालच. परिणामी डिजिटल आणि वास्तवातील भौतिक वस्तू एकमेकांशी जोडल्या जातील. हे सर्व शक्य होणार आहे सेल्युलर तंत्रज्ञानाच्या पाचव्या पिढीमुळे म्हणजे ‘फाइव्ह जी’मुळे.

फाइव्ह जी तंत्रज्ञानाची आपण आतुरतेने वाट पाहत असतानाच अमेरिकन सरकारनं या वायरलेस रेडिओ फ्रिक्वेन्सीजच्या विविध ब्लॉक्सचा लिलाव आरंभला आहे. मात्र यापैकी काही फ्रिक्वेन्सीज पृथ्वीच्या निरीक्षणासाठी वापरण्यात येणाऱ्या उपग्रहांच्या खूप जवळ असून त्यामुळे हवामान शास्त्रज्ञांना मोबाइल्स आणि इतर फाइव्ह जी प्रसारणामुळे आकडेवारी गोळा करण्यात अडचणी येतील असं वाटू लागलंय.नियामक वा दूरसंचार कंपन्यांनी हा अडथळा दूर करण्यासाठी पावले न उचलल्यास फाइव्ह जी वायरलेस कव्हरेज क्षमता असलेल्या उपग्रहांना पृथ्वी निरीक्षणासाठी अमेरिकेवरून कक्षेत प्रवास सुरू असताना वातावरणातील पाण्याच्या वाफेचं प्रमाण अचूकपणे ओळखता येणार नाही. अमेरिका आणि इतर देशांतील हवामान शास्त्रज्ञ त्यांच्या प्रारूपांसाठी (मॉडेल्स) लागणाºया आकडेवारीकरिता यावर अवलंबून असतात. त्याअभावी जगभरातील हवामानाचे अंदाज प्रभावित होतील. ही एक जागतिक समस्या आहे.
अमेरिकेच्या राष्टÑीय सागरी आणि वातावरणीय प्रशासन (एनओएए) आणि नासा या दोन्ही संस्था संघीय संचार आयोगाशी महत्त्वाच्या वाटाघाटीत गुंतल्या अहेत. एफसीसी अमेरिकेतील वायरलेस नेटवर्कवर देखरेख ठेवतं. नासा आणि एनओएन यांनी एफसीसीला फाइव्ह जीमुळे येणाºया अडथळ्यांपासून पृथ्वी निरीक्षणाच्या फ्रिक्वेन्सीजचं संरक्षण करण्यास सांगितलंय. पण एफसीसीनं फाइव्ह जीचा पहिला वाटा अत्यंत कमी संरक्षणासह लिलावाद्वारे १७ एप्रिल रोजी विकून दोन अब्ज डॉलर्सची कमाई केली आहे. अमेरिका ही संचारक्षेत्राची मोठी बाजारपेठ असल्यामुळे ‘फाइव्ह जी’ कशाप्रकारे उपयोगात आणायचं याविषयीचे सरकारचे निर्णय संपूर्ण जगातील या तंत्रज्ञानाच्या नियमनाशी संबंधित चर्चेवर प्रभाव टाकणारे ठरणार आहेत. २८ आॅक्टोबर २०१९ पासून यासंबंधीच्या आंतरराष्टÑीय करारासाठीची चर्चा इजिप्तमधील शर्मअल श्ेख या ठिकाणी सुरू होणार आहे.खगोल शास्त्रज्ञ, हवामान शास्त्रज्ञ आणि इतर शास्त्रज्ञांनी तरंगलांबी म्हणजे स्पेक्ट्रमचा वापर करण्यासाठी इतर उपयोगकर्त्यांबरोबर एकत्रित काम करून गरज भासल्यास संघर्ष टाळण्यासाठी वेगळ्या फ्रिक्वेन्सीजचाही वापर केला आहे. या वेळी प्रथमच त्यांनी संघर्षाची भूमिका घेतलीय. कारण त्यांना दुसरा पर्यायच शिल्लक नाही. त्यांच्या कामासाठी ते आवश्यकच आहे. २३.८ गिगाहर्ट्झ फ्रिक्वेन्सी (कंप्रता)च्या यात समावेश असून या ठिकाणी वातावरणातील पाण्याच्या वाफेद्वारे अत्यंत पुसटसा संदेश मिळतो. युरोपियन मेटआॅप प्रोब्ससारखे उपग्रह पृथ्वीवरून प्रसारित होणारी ऊर्जा मॉनिटर करत असतात. ते या फ्रिक्वेन्सीवर खाली वातावरणात आर्द्रता किती आहे ते मोजतात. हे काम दिवसा वा रात्री अगदी ढग असतानाही करण्यात येतं. नंतर ही आकडेवारी वादळे वा इतर हवामान प्रणालीबाबत पुढील काही दिवसांतील अंदाज व्यक्त करण्यासाठी वापरली जाते. ‘फाइव्ह जी’ स्टेशन्सद्वारे याच फ्रिक्वेन्सीवर दिलेल्या संदेशामुळे तिथे वाफ असल्यासारखा संदेश प्राप्त होऊन वास्तविक नैसर्गिक स्थिती झाकोळली जाऊन अंदाज चुकतील.बहुतांश युरोपियन प्रमाणकं वापरणाºया देशात ‘फाइव्ह जी’साठी ती ४२ डेसिबल वॅट्स असून जागतिक हवामान संघटना तर ५५ डेसिबल वॅट्सचा मापदंड सुचवत आहे. जागतिक हवामान संघटनेची संख्या नियामकांना जागतिक गोंगाट प्रमाणकांसाठी तयार करेल असं तज्ज्ञांना वाटतं. एफसीसीद्वारे फाइव्ह जी लिलावात पुढचा टप्पा डिसेंबर २०१९ मध्ये सुरू होणार असून तो अमेरिकेतील सर्वात मोठा असणार आहे. त्यात आणखी तीन फ्रिक्वेन्सी बँड असणार आहेत. यापैकी काहींचा वापर पाऊस, सहासागर, हिम आणि ढगांविषयीच्या उपग्रह निरीक्षणासाठी केला जातो. म्हणून आॅक्टोबरमधील चर्चा महत्त्वाची ठरणार आहे. अमेरिकेसाठी आणि भारताकरितादेखील.

 

टॅग्स :Indiaभारतscienceविज्ञान