शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
4
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
5
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
6
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
7
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
8
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
9
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
10
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
11
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
12
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
13
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
14
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
15
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
16
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
17
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
18
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
19
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
20
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी

नाट्यसंमेलनासाठी पहिली घंटा

By admin | Updated: April 16, 2016 04:08 IST

साहित्य-सांस्कृतिक क्षेत्रातील राजकीय मंडळींच्या सहभागाविषयीचा वाद तसा नवा नाही. त्याबरोबरच सर्वशक्तिमान मानल्या गेलेल्या राजकीय मंडळींच्या पाठबळाशिवाय संमेलने होत

- मिलिंद कुलकर्णीसाहित्य-सांस्कृतिक क्षेत्रातील राजकीय मंडळींच्या सहभागाविषयीचा वाद तसा नवा नाही. त्याबरोबरच सर्वशक्तिमान मानल्या गेलेल्या राजकीय मंडळींच्या पाठबळाशिवाय संमेलने होत नाहीत, हा अनुभवदेखील नवा नाही. राज्याचे महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या नाट्य परिषदेच्या ग्रामीण शाखेतर्फे २०१७ च्या नाट्यसंमेलनासाठी निमंत्रण देण्यात आले आहे. त्याला सकारात्मक प्रतिसाद देण्याचे संकेतदेखील नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी यांनी दिल्याने ही चर्चा आता काही दिवस सुरु राहील. जळगावात १९४४ मध्ये नाट्यसंमेलन झाले होते. त्यानंतर ७२ वर्षांत संमेलन झाले नाही. गेल्या १५ वर्षांत तीन वेळा निमंत्रणे देण्यात आली. परंतु यश आले नाही. नाट्य परिषदेच्या शहर शाखेचे प्रयत्न तोकडे पडले. मात्र हे संमेलन जळगावात व्हायला हवे, अशी रंगकर्र्मींची प्रबळ इच्छा आहे. त्यातून आणखी एका शाखेचा जन्म झाला. एकनाथराव खडसे यांच्या कन्या आणि जिल्हा बँकेच्या अध्यक्ष रोहिणी खडसे-खेवलकर यांनी स्वत:कडे अध्यक्षपद घेत मुक्ताईनगर (जळगाव ग्रामीण) ही नवीन शाखा स्थापन केली. या शाखेच्या उद्घाटनाला नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी, नाट्य संमेलनाचे अध्यक्ष गंगाराम गवाणकर, नाट्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह दीपक करंजीकर, सदस्य मधु कांबीकर, विभाग प्रमुख सुनील ढगे, दिलीप दळवी ही दिग्गज मंडळी उपस्थित राहिली. या कार्यक्रमात २०१७ चे संमेलन जळगावात घेण्यासाठी अधिकृत निमंत्रण जोशी यांना देण्यात आले. जळगावातील तयारी पाहून येथे संमेलन व्हावे, अशी माझी व्यक्तिगत इच्छा आहे. परंतु नियामक मंडळात यासंबंधी निर्णय होणार असून यापूर्वीच अन्य तीन-चार ठिकाणचे प्रस्तावदेखील आल्याचे जोशी यांनी स्पष्ट केले. एकनाथराव खडसे यांनी पुत्र स्व.निखील खडसे यांच्या नावाने पुरुष व महिला कलावंतांना ५१ हजारांचा जीवन गौरव पुरस्कार देण्यासाठी २५ लाख रुपयांचा निधी नाट्य परिषदेकडे देण्याची घोषणा केली. जळगावातील शासकीय नाट्यगृह जानेवारी २०१७ पर्यंत पूर्ण होईल आणि अकलूजसारखा राज्य लावणी महोत्सव जळगावात घेण्याचे सूतोवाच खडसे यांनी केले. एकंदरीत जळगावच्या नाट्यचळवळीला सुगीचे दिवस येतील, असे चित्र या कार्यक्रमामुळे निर्माण झाले. अर्थात जळगावची नाट्यपरंपरा जुनी आहे. बालगंधर्वांचे बालपण जळगावात गेले. त्यांच्या स्मृती त्यांच्या नावाचे नाट्यगृह आणि वार्षिक संगीत महोत्सवाद्वारे जतन केल्या जात आहेत. ग्रामीण भागात म्हणजे शेलवड आणि मुक्तळ या ठिकाणी १८६५ पासून बालाजी सांस्कृतिक मंडळ व श्रीराम नाट्य मंडळाच्या माध्यमातून नाटके सादर होत असत. आजही भुसावळ येथे अंतर्नाद प्रतिष्ठान, रसिक कला मंडळ, उत्कर्ष कलाविष्कार, नुपूर अकादमी, स्वरनिनाद तर चाळीसगावला रंगगंध यासारख्या संस्था रंगभूमीवर वेगवेगळे प्रयोग करीत आहेत. पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धा, बालगंधर्व संगीत महोत्सव, विद्यापीठाचा युवारंग हा युवक महोत्सव अखंडपणे सुरु आहे. अधिकृत प्रस्ताव देऊन नाट्यसंमेलनाची पहिली घंटा तर वाजली. यंदा चंद्रपूर, कोल्हापूरदेखील स्पर्धेत असल्याची चर्चा आहे. जळगावला संमेलन होण्यासाठी स्वत: खडसे प्रयत्नशील असल्याने बहुदा अडसर येणार नाही. संमेलन निश्चित झाल्यास स्थानिक पातळीवर रंगकर्र्मींचे गटतट एकत्रित करण्याचे मोठे आव्हान ग्रामीण शाखेपुढे राहणार आहे. १५-२० वर्षांपासून कार्यरत असलेल्या शहर शाखेच्या मंडळींना विश्वासात घ्यावे लागेल. नवीन शाखा ग्रामीण असली तरी निम्म्याहून अधिक मंडळी शहरातील आहेत. शहर आणि ग्रामीण असे संतुलन राखावे लागेल. ७२ वर्षांनंतर जळगावात नाट्य संमेलन होणार असेल तर या निमित्ताने जळगावात नाट्यगृह, सक्षम संस्था अशा पायाभूत सुविधा तयार होतील, ही सकारात्मक बाब आहे.