शहरं
Join us  
Trending Stories
1
जिल्हा परिषद सर्कल आरक्षण रोटेशनला आव्हान देणाऱ्यांना झटका, उच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्या
2
धगधगतं फ्रान्स! लाखो लोक रस्त्यावर उतरले, काही ठिकाणी दगडफेक; रेल्वे, मेट्रो, बस, शाळा बंद
3
सौदी अरेबियानं लढवली शक्कल, पाकिस्तानला कळलंच नाही; 'डिफेन्स डील'मागची Inside Story काय?
4
आजीच्या जिद्दीला सलाम ! ७१ वर्षांच्या महिलेने चक्क १३,००० फूटांवरून केलं 'स्कायडायव्हिंग'
5
'१-२ जागा कमी जास्त चालतील, पण...', बिहार निवडणुकीबाबत चिराग पासवान यांचे मोठे वक्तव्य
6
भूषण प्रधान आणि केतकीने लग्नाआधीच दिली गुडन्यूज? अभिनेत्याच्या पोस्टने चर्चेला उधाण
7
Video - "मी मुस्लिम, पण मला हा रंग आवडतो"; 'भगवा आयफोन' खरेदी केल्याचा प्रचंड आनंद
8
खळबळजनक! गोड बोलला, खांद्यावर हात ठेवला अन् गळा चिरला; नवऱ्याचा बायकोवर जीवघेणा हल्ला
9
काकासोबत असलेल्या प्रशिकवर बिबट्याची झडप, घरापासून ५० मीटरवर सापडला मृतदेह
10
iPhone 17: बीकेसीतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर तुफान राडा; सुरक्षारक्षकालाही धक्काबुक्की!
11
‘२०१४ पासून मराठा समाजाला देण्यात आलेल्या कुणबी जात प्रमाणपत्रांची माहिती उपलब्ध करून द्या’, काँग्रेसची मागणी 
12
रेपचा व्हिडिओ, पत्नीची आयडिया; पती विधवा महिलांसोबत बनवायचा संबंध, आरोपीचा खळबळजनक खुलासा
13
अजबच! फ्रेंड रिक्वेस्ट रिजेक्ट केल्याने तरुणी संतापली, अपहरण करून तरुणाला मारहाण केली, त्यानंतर...
14
श्रद्धा कपूरने दिली प्रेमाची कबुली, शेअर केला मजेशीर व्हिडिओ; बॉयफ्रेंडला टॅग करुन म्हणाली...
15
"फडणवीस साहेबांनी मला बोलावलं अन्...", समीर चौघुलेंनी सांगितला विमानातला किस्सा; म्हणाले...
16
हॉर्लिक्स, विक्स, झंडू बाम, डायपर, टुथपेस्ट... सर्वकाही स्वस्त; दिग्गज कंपन्यांनी जारी केली नवी लिस्ट
17
"एकटं वाटलं की मी सिद्धिविनायक मंदिरात जाऊन बसते...", रिंकूने सांगितलं कारण, म्हणाली...
18
Mumbai Crime: घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर सापडला ३५ वर्षाच्या माणसाचा मृतदेह; कोणामुळे गेला जीव?
19
‘टॅरिफ’मुळे प्लास्टिक उद्योग अडचणीत; ३ वर्षांत भारतातून इतर देशांमध्ये चौपटीने निर्यात वाढविण्याचे लक्ष्य
20
शेअर बाजाराच्या तेजीला ब्रेक; Sensex १४७ अंकांनी आपटला, निफ्टीतही घसरण; 'हे' प्रमुख स्टॉक्स घसरले

पोलीस निरीक्षकावर गोळीबार आणि पुन्हा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर.... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2018 18:52 IST

गुन्हेगारांवर पूर्वी पोलिसांचा जो धाक होता तो कमी झाला आहे़. त्याचा परिणाम गुन्हेगार असे बिनधास्त पोलिसांवरही गोळीबार करु लागले आहेत़.

ठळक मुद्देपुणे रेल्वे स्टेशनवर बुधवारी गुन्हेगारांना पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस अधिकाऱ्यावर गोळीबार हत्यार बाळगणाऱ्या गुन्हेगारांना पकडताना पोलिसांनी स्वत:च्या सुरक्षेची अगोदर काळजीभारतीय दंडविधान कायद्यानुसार प्रत्येकाला स्व: संरक्षणाचा अधिकार

- विवेक भुसे- 

एका बाजूला गुन्हे उघडकीस आणण्याचे टेन्शन तर दुसरीकडे हत्यार बाळगणाऱ्या गुन्हेगारांशी सामना करण्याचे आव्हान या कात्रीत अडकलेले पोलीस अधिकारी आणि कर्मचारी अनेकदा जीवावर उदार होऊन गुन्हेगारांना पकडायला जातात़. अनेकदा त्यात त्यांना यशही येते़ त्यावेळी त्यांनी किती धोका पत्करला होता, याची चर्चा होत नाही़. पण, एखाद्या प्रकरणात गुन्हेगारही जीवावर उदार झालेला असतो़. एक खुन केला तरी इतकीच शिक्षा आणि दोन खुन केले तरी तितकीच शिक्षा. ते मग पोलिसांच्या हाताला लागण्यापेक्षा त्यांच्यावर गोळीबार करुन सुटण्याचा प्रयत्न करतात़. अशातून एखादा पोलीस अधिकारी अथवा कर्मचारी जेव्हा जखमी होतो, तेव्हा पोलिसांनी स्वत:च्या सुरक्षेची जबाबदारी अगोदर घेण्याची गरज नव्हती का असा प्रश्न उपस्थित होतो़ पुणे रेल्वे स्टेशनवर बुधवारी गुन्हेगारांना पकडण्यासाठी गेलेले पोलीस निरीक्षक गजानन पवार यांच्यावर झालेल्या गोळीबाराने संपूर्ण पुणे पोलीस दल हादरुन गेले आहे़. सुदैवाने या हल्ल्यातून ते बचावले असून आता त्यांची प्रकृती सुधारत आहे़. मात्र, त्याचवेळी अशा हत्यार बाळगणाऱ्या गुन्हेगारांना पकडताना पोलिसांनी स्वत:च्या सुरक्षेची अगोदर काळजी घेतली पाहिजे की नाही़. अनेकदा गुन्हेगार शस्त्र विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळते़ ते वरिष्ठांना सांगून त्या ठिकाणी जातात़. पण, गुन्हेगाराजवळ पिस्तुल आहे, तो उलट हल्ला करु शकतो, याची शक्यता खूप असते़. अनेकदा अतिशय जोखीम पत्करुन पोलीस त्याला पकडतात़. त्यात त्यांना यशही येते़. त्यामुळे त्यांनी स्वत:चा जीव किती धोक्यात घातला आहे, याची कोठेही चर्चा होत नाही़. पण कधी तरी गुन्हेगारही स्वत:च्या जीवावर उदार झालेला असतो़ त्यातून तो पोलिसांवर फायरिंग करतो़ त्यात एखादा पोलीस जखमी झाला तर, त्याचा संपूर्ण पोलीस दलावर परिणाम होतो़ पोलिसांनी खबरदारी का घेतली नाही, असे विचारले जाऊ लागते़. याबाबत निवृत्त पोलीस अधिकारी वसंतराव कोरेगावकर यांना विचारले असता, त्यांनी सांगितले की, कोणतीही नोकरी म्हटले की त्यात रिस्क असते़. जवान जेव्हा सीमेवर जातो तेव्हा कोठूनही गोळीबार होईल व आपल्या प्राण घेतले जाऊ शकते याची त्याला जाणीव असते़. तसेच एखादा गुन्हेगार आपल्यावर हल्ला करु शकतो, हेही पोलिसांनी नोकरी प्रवेश केला तेव्हापासूनच त्याला माहिती असते़. हत्यार बाळगणाऱ्या गुन्हेगारांना पकडण्यासाठी जेव्हा पोलीस जातात, तेव्हा ते आपल्यापरीने काळजी घेत असतात़. परंतु, अनेकदा प्रत्यक्ष स्पॉटवरील परिस्थिती वेगळी असते़. त्यावेळी संबंधित अधिकारी त्या क्षणाला सुचेल तसा निर्णय घेतो़. त्यातून अशा अनपेक्षित घटना घडू शकते़. त्यामुळे अशा घटनांना सामोरे जाण्याची तयारी ठेवून जास्तीत जास्त खबरदारी पोलिसांनी घेतली पाहिजे़. निवृत्त पोलीस अधिकारी शरद अवस्थी म्हणाले, पोलिसांना ना कायद्याचे सरंक्षण, ना समाजाचे त्यामुळे आता ते अनाथ झाले आहेत़. मानवाधिकार आयोगाचा उद्देश जरी चांगला असला तरी त्याचा फायदा फक्त गुन्हेगारांना झाला आहे़. एखाद्या चकमकीत गुन्हेगाराचा मृत्यु झाला तर त्याची लगेच चौकशी होते़. त्याच्या कारवाईवर संशय निर्माण केला जातो़. मानवाधिकार कार्यकर्ते म्हणवून घेणारे त्या गुन्हेगारासाठी सरसावतात़. पण एखादा पोलीस अधिकारी, कर्मचारी गुन्हेगारांच्या गोळीबाराने मृत्यु पावला अथवा गंभीर जखमी झाला तर हेच मानवाधिकार कार्यकर्ते म्हणविणारे पुढे येत नाही़. भारतीय दंडविधान कायद्यानुसार प्रत्येकाला स्व: संरक्षणाचा अधिकार आहे़. मात्र, हा अधिकार पोलीस अधिकाऱ्यांना कायमच नाकारला जातो़. त्यामुळे तो दुसरीकडे गुन्हेगारांना पकडून त्यांना शिक्षा व्हावी, याचे दडपण असते़ आणि त्यात पुन्हा इन्काऊंटर झाला तर पुन्हा आरोपीच्या पिंजऱ्यात केले जाते. ते वेगळेच़ त्यामुळे आता पोलीस इन्काऊंटर करायला धजावत नाही़. त्यामुळे गुन्हेगारांवर पूर्वी पोलिसांचा जो धाक होता तो कमी झाला आहे़. त्याचा परिणाम गुन्हेगार असे बिनधास्त पोलिसांवरही गोळीबार करु लागले आहेत़. जर गुन्हेगारांचा वाढता धुडगूस रोखायचा असेल तर पोलिसांना खुलेपणाने कारवाई करायला पाठिंबा दिला पाहिजे़ नाहीतर आता पोलीस प्रोटेक्शन फोर्स काढायची वेळ आली आहे़. 

 

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसFiringगोळीबार