शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

 प्रकाशोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2017 01:08 IST

दीपोत्सवाच्या आनंदपर्वाचा काळ म्हणजे दीपावली! दिव्यांच्या प्रकाशानं दु:खाचा अंध:कार दूर होतो. तमोगुण मागे सरतो. काम, क्रोध, लोभाला दृूर करण्याचा प्रकाशोत्सव असलेली दीपावली! मना-मनातला अंधार मिटवून मनाला उजळवून टाकणारी!

- कौमुदी गोडबोलेदीपोत्सवाच्या आनंदपर्वाचा काळ म्हणजे दीपावली! दिव्यांच्या प्रकाशानं दु:खाचा अंध:कार दूर होतो. तमोगुण मागे सरतो. काम, क्रोध, लोभाला दृूर करण्याचा प्रकाशोत्सव असलेली दीपावली! मना-मनातला अंधार मिटवून मनाला उजळवून टाकणारी! दिव्यांचा नित्यनूतन उत्सव ईश्वराच्या प्रांगणात चालू असतो. त्याचा आनंद आपण घेत असतो. दीपावलीत भूतलावावरील छोट्या-छोट्या पणत्यांपासून मोठमोठ्या समया संध्यासमयी तेवतात तेव्हा सर्वत्र स्वर्ग अवतरल्यासारखं वाटतं.लहानपणी प्रचंड थंडीत गरम गरम पाण्यानं स्नानं करण्यात मजा यायची. सुगंधी तेलाचा, उटण्याचा आणि मायेच्या हाताचा स्पर्श दीपावलीच्या स्नानाला येत राहायचा. वर्षातून एकदा, दोनदाच नवे कपडे मिळायचे. आता ढीगभर कोरे कपडे असतात पण बालपणीच्या दीपावलीला समस्त भावंडांना मिळणाºया मोजक्या कपड्यांचं अप्रूप, कौतुक त्यामध्ये नाही. मनमुराद हास्य, मनमोकळं फराळावर ताव मारणं याची मजा आताच्या दीपावलीमध्ये हरवून गेली. अंत:करणामध्ये निखळ आनंद, एकमेकांविषयीची ओढ आता सापडत नाही. नात्यामध्ये, समाजामध्ये स्नेहाचा अभाव आणि उपचारांचा दिखाऊपणा आल्यामुळे फराळाचे पदार्थ, कोरे कपडे, फटाके याची रेलचेल असली तरी दिवाळीचा सात्विक आनंद मात्र दूर गेला.शेणानं सारवून त्यावर रेखलेली रंगावली स्मरते. आता अंगणही नाही आणि शेणाचे सडेदेखील नाहीत. सगळीकडे टाईल्सचा चकचकाट झाल्यामुळे अंगणाच्या मातीचा स्पर्शही पायांना होत नाही.आता दीपावली वेगवेगळ्या ठिकाणी किंवा हॉटेलमधून साजरी करण्याची फॅशन आहे. प्रेम, माया, आपुलकी यामधून प्रत्येक दीपावलीला प्राप्त होणारा निखळ आनंद पार हरवला आहे.दीपावली मनातल्या, कुटुंबातल्या, समाजातल्या निखळ आनंदाचा संदेश प्रकाशोत्सवातून देते. दीपोत्सव, प्रकाशोत्सव, आनंदोत्सव अशा तीन उत्सवांचा सुरेख संगम दीपावली सणामध्ये होतो. आशयसंपन्न असणाºया या सणामधून आपलं आयुष्य आशयघन करण्याचा मन:पूर्वक प्रयास केला तर खºया अर्थानं दीपावलीच्या प्रकाशानं जीवन उजळून जाईल. 

टॅग्स :diwaliदिवाळीDeepotsav 2017दीपोत्सव 2017Maharashtraमहाराष्ट्र