शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

विशेष लेख: राजकीय बाजारपेठेत जातीय झेंड्यांचा वरचष्मा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2024 08:04 IST

प्रत्येक निवडणुकीत जातींचे राजकीय महत्त्व मात्र वाढते आहे. गुणवत्तेला नव्हे, तर जातीला महत्त्व येऊन सत्तेचा मार्ग प्रशस्त केला जात आहे.

सध्याची मोदी यांच्या नेतृत्वाखालील ३.०  ही आघाडी म्हणजेच एनडीए ३.० ही खरे तर जातींच्या छाप्यातून काढलेली आघाडी आहे. नरेंद्र मोदी हे तिचे लोहार आणि वारंवार घोकून तयार केली गेलेली प्राक्कथा आहेत. भारतीय सामाजिक वारशाच्या कालातीत भट्टीत सरकार तयार करण्यासाठी मोदी यांनी वर्ण आणि कर्म एकत्र आणून तिची रचना केली आहे. 

राममोहन रॉय, विवेकानंद, सुब्रमनिया भारती, नारायणा गुरू यांच्या कार्याचा वारसा असूनसुद्धा  जे घडवले आहे त्यात बिघाडही आहे. आपल्या आधुनिक आकांक्षांवर जातीची एक दीर्घ सावली पडलेली आहे. या जातव्यवस्थेच्या सामाजिक बाजूची धार थोडी कमी झाली असली तरी निवडणुकांमागून निवडणुका जातींचे राजकीय महत्त्व मात्र वाढते आहे. गुणवत्तेला नव्हे, तर जातीला महत्त्व येऊन सत्तेचा मार्ग प्रशस्त केला जात आहे.

जूनच्या पहिल्या आठवड्यात दिल्लीत सरकार स्थापना झाले तेव्हा भुवनेश्वर आणि विजयवाडात मंत्री झालेल्यांच्या  जातीची चर्चा जास्त होती; त्यांच्या कामाची नव्हती. लागोपाठ तिसऱ्यांदा आलेल्या मोदी सरकारकडे बदल आणि सातत्याचे मिश्रण म्हणून पाहिले जात आहे. ल्युटेन्स दिल्लीतील विविध सरकारी इमारतीत स्त्रियांना कोपऱ्यातील नवी कार्यालये मिळाली आहेत. मंत्र्यांच्या जातीकडे जास्त लक्ष दिले गेल्यामुळे गुणवत्ता दुय्यम ठरली आणि राजकीय दर्जाही घसरला.

भारताच्या विस्तारणाऱ्या राजकीय बाजारपेठेत जात हाच  जिंकून देणारा घटक, पात्रता होत आहे. उदाहरणार्थ गेल्या आठवड्यात ओडिशात भाजपाने मोठी राजकीय कमाई केली. २४ वर्षे सत्तेवर असलेल्या नवीन पटनाईक यांना घालवले. भाजपाची सरशी झाली यात शंका नाही; पण हे करताना ओडिया अस्मितेला चुचकारण्यात आले. कारण एका माजी  दक्षिण भारतीय नोकरशहाकडे पटनायक यांचा उत्तराधिकारी म्हणून पाहिले जात होते. योगी आदित्यनाथ यांच्यापासून मोदींपर्यंत भाजपकडून एकच प्रश्न विचारला जात होता, तामिळ बाबूला तुम्ही ओडिशावर राज्य करू द्याल का? 

राज्यातला पहिला मुख्यमंत्री निवडण्याची वेळ आली तेव्हा पक्षाने सामाजिक संदर्भांचाच विचार केला. ओडिशाचा पहिला भगवा मुख्यमंत्री म्हणून मोहन चरण माझी या ५२ वर्षीय आदिवासीची निवड करण्यात आली. भाजपाच्या महिला सबलीकरणाचे प्रतीक असलेल्या पार्वती  परिडा यांना पहिल्या उपमुख्यमंत्री म्हणून शपथ देण्यात आली.

भाजपच्या अनेक जुन्याजाणत्यांना या प्रक्रियेत बाजूला ठेवले गेले; कारण राज्याच्या नव्या भगव्या सामाजिक रचनेचे ते भाग होऊ शकत नव्हते. के. व्ही. सिंगदेव हे तसे पाहता मुख्यमंत्रिपदासाठी योग्य होते; परंतु सामान्य सामाजिक वजन असलेले; पण कडवे हिंदुत्ववादी माझी यांना पसंती दिली गेली. राजकीय शर्यतीतला जिंकून देणारा घोडा म्हणून त्यांच्याकडे पाहिले गेले. पक्ष आणि सरकारमध्ये मोदी सर्वशक्तिमान झाल्यापासून दोन्हीवर त्यांचा शिक्का स्पष्ट दिसतो. मोदी स्वतः साध्या पार्श्वभूमीतून आलेले असल्यामुळे प्रदेश आणि समाजात राजकीयदृष्ट्या दीर्घकाल उपेक्षिले गेलेले, अनपेक्षित उमेदवार सहेतुकपणे समोर आणतात. प्रत्येक राज्यात पर्यायी नेतृत्व देण्याच्या त्यांच्या दीर्घकालीन धोरणाचे ताजे उदाहरण म्हणजे  ओडिशाचे नवीन मुख्यमंत्री. १९८० पासून भाजपाचे ५४ मुख्यमंत्री झाले. त्यापैकी २०  जणांची निवड पंतप्रधानांच्या संमतीने करण्यात आली. ते सगळे पूर्वाश्रमीपेक्षा केवळ तरुण नव्हते, तर राज्याची जी सामाजिक ठेवण असेल तिच्यातही वेगळे होते. त्यांनी कधीही पक्ष किंवा सरकारमध्ये महत्त्वाचे पद सांभाळलेले नव्हते. पक्षाची सत्ता असलेल्या जवळपास सर्व राज्यांमध्ये उपमुख्यमंत्री देणे ही मोदी यांची कल्पना. सर्व राज्यांत मिळून २५ उपमुख्यमंत्री आहेत. पैकी १५ भाजपाचे, त्यातले निम्मे दलित किंवा मागास, अगदी थोडेच उपमुख्यमंत्री ब्राह्मण आहेत. सत्तेच्या पटावर प्रथम जात, गुणवत्ता नंतर असेच समीकरण सर्वत्र दिसते. गरीब आणि मागासलेल्या वर्गांतून नवनेतृत्वाचे पीक घेण्याचे प्राथमिक उद्दिष्ट मोदी यांनी ठेवले, त्याला अजून दाखवता येतील अशी फळे आलेली नाहीत. केंद्रीय मंत्रिमंडळात तीन माजी मुख्यमंत्री आहेत. त्याचवेळी बाकीचे मंत्री हे एक तर निवृत्त सरकारी अधिकारी आहेत  किंवा तुलनेने त्यांना कमी अनुभव आहे. त्यांना व्यापक स्वीकृती मिळेल किंवा ते राष्ट्रीय पर्याय म्हणून पुढे येतील हे कठीण आहे. 

मोदी यांची जागा घेणारे दुसरे कोणीही तुल्यबळ नसल्याने त्यांना पर्याय नाही. माजी मुख्यमंत्र्यांची संख्या तीसएकच्या घरात  आहे; पण पंतप्रधान म्हणून स्वीकारले जातील असे कोणीही त्यात नाही. आज उत्तराधिकाऱ्यांच्या बाबतीत १८ कोटी सदस्य असलेल्या भाजपची स्थिती काँग्रेसइतकीच वाईट आहे. १३९ वर्षांच्या काँग्रेस पक्षाकडे गांधींव्यतिरिक्त पर्याय उभा राहू शकलेला नाही.

सध्याच्या राजकारणात जातीय रंग गडद झाले असले तरी   त्याचा पोत भक्कम आणि चव ठीक नाही. समकालीन जातीय राजकारणाने काळाच्या कसोटीवर उतरलेले आडाखे पक्के केले आहेत.  ‘जातीचे, जातीकडून आणि जातीसाठी’ हेच भारतीय मतपेढीचे वैशिष्ट्य  नेतेमंडळी ओव्हर ड्राफ्टसारखे वापरतात. आधुनिक भारतासाठी त्यांचे ‘कास्ट यूवर वोट’ असे आवाहन असते.

टॅग्स :PoliticsराजकारणReligious Placesधार्मिक स्थळेCaste certificateजात प्रमाणपत्र