शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

अग्रलेख - चांदोबा, चांदोबा भिजलास का...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2020 07:01 IST

Water Found on Moon : चंद्रावर किंचित ओलाव्याच्या रूपात का होईना पाणी आढळले आहे. त्यामुळे कित्येक दशकांचा गैरसमज दूर होणार आहे. पृथ्वीभोवती फिरणाऱ्या चंद्राला आपण लाडाने चांदोबा, चांदोबा भागलास का, असे विचारत आलो. आता पाण्याच्या शोधामुळे भिजलास का, असे विचारावे लागेल.

इथे पृथ्वीतलावर माणसांमाणसांमध्ये पाण्याच्या एकेका थेंबासाठी मारामाऱ्या सुरू असताना, सजीवसृष्टीमुळे सूर्यमालेचा मुकुटमणी बनलेली वसुंधरा तापमानवाढीच्या चक्रातून जात असताना, तिचा युगायुगाचा सोबती-सखा चंद्राकडून दिलासादायक बातमी आलीय. पृथ्वीच्या या उपग्रहाच्या पृष्ष्ठभागावर किंचित ओलाव्याच्या रूपात का होईना पाणी आढळले  आहे. त्यामुळे चंद्रावर वस्ती करू इच्छिणाऱ्या किंवा तिथे अंतराळ स्थानक उभारून पलीकडच्या खोल अंतराळात, दुसऱ्या सूर्यमालेत मुशाफिरी करू पाहणाऱ्यांना आनंद झाला नाही तरच नवल. अमेरिकी अंतराळ संशोधन संस्था नासाच्या ‘सोफिया’ या जगातल्या सर्वांत मोठ्या उडत्या वेधशाळेने चंद्रावर पाण्याचा शोध लावलाय. बोईंग ७४७ विमानाचे रूपांतर २.७ मीटर व्यासाच्या दुर्बिणीसह वेधशाळेत करण्यात आले आहे. तिने सतत सूर्यप्रकाशात राहणाऱ्या चंद्राच्या पृष्ठभागावर जलस्फटिके टिपली आणि त्यावरून नि:संदिग्धरीत्या चंद्रावर पाणी असल्याचे अनुमान शास्रज्ञांनी काढले. नासाचे हे निरीक्षण, संशोधन अनेक दृष्टींनी महत्त्वाचे आहे. कारण,  स्पेसएक्ससारख्या संस्थांनी घेतलेला पुढाकार, सामान्यांमध्येही निर्माण झालेले अवकाशाचे आकर्षण, चंद्रावर वस्ती करण्याची स्वप्ने या सगळ्यांना या शोधामुळे नवा आयाम प्राप्त होणार आहे. तत्पूर्वी, १९६९ मधील अपोलो या मानवी चांद्रमोहिमेपासून असे मानले जात होते, की चंद्रावर पाणी नक्की असेल. परंतु ते कधीही सूर्यप्रकाश पोहोचत नाही अशा अंधाऱ्या, कायमस्वरूपी छायांकित ध्रुवीय भागातल्या विवरांमध्ये बर्फाच्या रूपात असेल. चंद्र स्वत:भोवती फिरत नसल्याने त्याचा निम्माअधिक भाग कायमचा अंधारात असतो. पाणी असलेच तर तिथे असेल, उजेडातला टापू या दृष्टीने अत्यंत प्रतिकूल आहे. हा समज २००९ मध्ये नासाने दक्षिण ध्रुवावर खोल विवरांमध्ये जलकण शोधले तेव्हा दृढ झाला.

भारताच्या दुसऱ्या चांद्रयान मोहिमेने गेल्या एप्रिलमध्ये वर्षभराचे भ्रमण पूर्ण करताना चंद्राच्या जवळपास ४० लाख चाैरस किलोमीटर भूपृष्ठाचे मानचित्रण केले. तेव्हाही, कोणत्या ना कोणत्या स्वरूपात पाणी मिळू शकणारे टापू शोधण्यात यश आले. सोबतच, आतापर्यंत आढळले ते खरे पाणी म्हणजे एचटूओ होते की हायड्रोजन व ऑक्सिजनचा एकेकच अणू असलेले हायड्राेक्सील होते, हा संभ्रम आहेच. आता मात्र जलरेणूंच्या स्वरूपातील अत्यल्प प्रमाणात का होईना पाण्याचा शोध लागला आहे. त्यातही पृथ्वीवरून साध्या डोळ्यांनी दिसते त्या क्लेव्हिअस नावाच्या सूर्यप्रकाशातील सरोवराच्या परिसरातील जलस्फटिकांमुळे कित्येक दशकांचा गैरसमज दूर होणार आहे.पृथ्वीभोवती फिरणाऱ्या चंद्राला आपण लाडाने चांदोबा, चांदोबा भागलास का, असे विचारत आलो. आता पाण्याच्या शोधामुळे भिजलास का, असे विचारावे लागेल. चंद्राच्या पृष्ठभागावर पाणी तयार होण्याचा कयासही उत्कंठा वाढवणारा आहे. सततचे छोटे-छोटे उल्कापात, पृष्ठभागावर आदळणारे लघुग्रह किंवा धूमकेतू आणि साैरवाऱ्यांमधून येणारे ऊर्जाभारित कण यांमुळे हे पाणी तयार होत असावे, असा शास्रज्ञांचा अंदाज आहे. अर्थात या पाण्याचे प्रमाण अत्यंत कमी, एक घनमीटर मातीत मिसळलेले १२ औंस अर्थात अंदाजे सव्वातीनशे ग्रॅम इतके आहे. सहारा वाळवंटापेक्षा हे प्रमाण शंभर पटीने कमी आहे. त्यामुळे चंद्रावर पाणी ही उत्साह वाढवणारी बातमी असली तरी प्रत्यक्ष त्याचा वापर हा खूप दूरवरचा पल्ला आहे. लोकजीवनाचा, संस्कृती व सणावारांचा, मिथके व दंतकथांचा अविभाज्य भाग असलेला चंद्र अंतराळ वैज्ञानिकांनाही सतत खुणावत आला आहे. तेव्हा, चंद्रावर मिळू शकणारे पाणी केवळ अवकाश जिंकू पाहणाऱ्या माणसांची शारीरिक तहानच भागवील, असे नाही. त्याचा उपयोग अंतराळ प्रवासाला निघालेल्या माणसांना पिण्यासाठी, श्वसनासाठी आवश्यक प्राणवायूसाठी तसेच राॅकेटमध्ये इंधनासाठीही होऊ शकेल.

२०२४ मध्ये पहिली महिला चंद्रावर पाठविण्याची ‘अर्टेमिस’ मोहीम नासाने आखली आहे. मंगळावर माणूस पाठविण्याच्या मोहिमांवरही विविध देश काम करीत आहेत. चंद्रावर पाणी उपलब्ध असण्याच्या शक्यतेमुळे या मोहिमांना गती मिळेल. सध्या अब्जावधी सूक्ष्म जलकणांच्या रूपात चंद्रावर असलेले पाणी वापरात येऊ शकले तर मंगळाच्या दिशेने जाणाऱ्या मानवी अंतराळ मोहिमा, तसेच त्याहीपुढे दूरवर खोल अंतराळाकडे प्रवास आणि ब्रह्मांडातील अज्ञाताच्या शोधाची तृष्णा, ज्ञानाची असोशी चंद्रावरच्या पाण्याने भागवली जाईल.

टॅग्स :NASAनासाInternationalआंतरराष्ट्रीयWaterपाणीscienceविज्ञान