शहरं
Join us  
Trending Stories
1
"मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले तर मी मुंडण करेन, ४ जूनला एक्झिट पोल चुकीचे सिद्ध होतील"
2
पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणार, बहुतांश एक्झिट पोलचा अंदाज
3
व्हॉट्सॲपवरून ट्रिपल तलाक; पतीवर गुन्हा, पत्नीला धमकावल्याचा आरोप 
4
धक्कादायक! ११ प्रवाशांनी भरलेली बोट नदीत उलटली; ७ जणांचा बुडून मृत्यू, ४ जण बचावले
5
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य - २ जून २०२४; यश, प्रतिष्ठा वाढेल, वरिष्ठ खूश असल्याने पदोन्नतीची शक्यता
6
नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या टर्मला महाराष्ट्राची अपेक्षित साथ नाही !
7
उत्तरेत पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजप पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा
8
पश्चिम बंगालमध्ये भाजप तृणमूलला देणार धक्का, २०१९च्या तुलनेत सरस कामगिरी करणार
9
हिटमॅनचा फॅन मैदानात शिरला! अमेरिकेच्या पोलिसांनी इंगा दाखवला; रोहितही अवाक्, Video
10
अनंत अंबानी-राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंगचे इटलीत सेलिब्रेशन
11
पंतप्रधान मोदींची ४५ तास ध्यान साधना, संतकवी तिरुवल्लुवर यांना वाहिली पुष्पांजली
12
जावई-सासऱ्यातील समेटासाठी मुलाचा आधार, संवाद साधण्याचा उच्च न्यायालयाचा सल्ला 
13
आजही अडचणींचा डोंगर, वेळेत काम पूर्ण करण्याचे नियोजन
14
एमएचटी-सीईटीच्या चुकीच्या उत्तरांची दखलच नाही, एक प्रश्न अभ्यासक्रमाबाहेरील फॉर्म्युल्यावर आधारित 
15
भारतीय फलंदाजांनी निडरपणे खेळावे - सौरव गांगुली
16
स्कूलबसच्या अपघाताला शाळा संचालकही जबाबदार, पंजाब आणि हरयाणा हायकोर्टाने सुनावले
17
नेपाळ, नेदरलँड्स देऊ शकतात धक्का : गिलख्रिस्ट 
18
अकरावी प्रवेशासाठी ५ जूनपासून पसंतिक्रम, पहिल्याच फेरीचेच वेळापत्रक जाहीर
19
‘धूप से बचने के लिए टोपी तो दिजीए’, रणरणत्या उन्हात कामगार मेटाकुटीला
20
‘एअर टर्ब्युलन्स’ची माहिती मिळणार, प्रवासी सुरक्षेसाठी विशेष सॉफ्टवेअरची ‘इंडिगो’कडून चाचणी

संपादकीय - अखेर राष्ट्रवादीचा निकाल लागला, लागेल!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2024 6:26 AM

घटनेतील १० व्या सूचीचा दुरूपयोग हा पक्षातील मतभेदांमुळे सदस्यांविरोधात करता येणार नाही

निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवार यांच्याकडे सोपविल्यानंतर राष्ट्रवादीबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सुरू असलेल्या आमदार अपात्रतेच्या सुनावणीचा निकाल काय येणार, याचा अंदाज आला होताच. शिवसेनेप्रमाणेच दोन्ही गटांच्या आमदारांना अपात्र न ठरवता विधानसभा अध्यक्षांनी बहुमताच्या आधारावर अजित पवार यांच्याकडील पक्ष हाच मूळ राष्ट्रवादी पक्ष असल्याचा निर्वाळा दिला. हा निकाल देताना त्यांनी पक्षांतर्गत मतभेद आणि पक्षांतर यात फरक कसा आहे, हे नीट समजावून सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांचाच असल्याचे सांगताना न्यायिकदृष्ट्या दोन्ही गटांचे आमदार कसे अपात्र ठरत नाहीत, याचेही स्पष्टीकरण दिले. यासाठी त्यांनी कर्नाटक उच्च न्यायालयाने येडियुरप्पा सरकारच्या काळात दिलेल्या निर्णयाची आठवण करून दिली.

घटनेतील १० व्या सूचीचा दुरूपयोग हा पक्षातील मतभेदांमुळे सदस्यांविरोधात करता येणार नाही, असे स्पष्ट करताना त्यांनी केवळ पक्षातील मतभेद आणि नेत्याविरोधात नाराजी किंवा मत व्यक्त केल्याने अपात्र ठरवले जाऊ शकत नाही, हे स्पष्ट केले. पक्षांतर्गत लढाई किंवा कलह पक्षांतरबंदी कायद्याअंतर्गत येत नाहीत. त्यासाठी पक्षांतर्गत कारवाई केली जाऊ शकते. पक्ष संबंधितांना निलंबित करण्यापर्यंत कारवाई करू शकतो; परंतु त्याचा विधिमंडळातील सदस्यत्वाशी संबंध नाही, असे सांगून त्यांनी दोन्ही गटांच्या आमदारांवरील अपात्रतेची कारवाई टाळली. त्याचबरोबर एका गटाच्या मते शरद पवार हे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, तर दुसऱ्या गटाच्या मते अजित पवार हे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. हे पक्षांतर्गत मतभेद असून, तो पक्षांतर्गत विषय असल्याने राष्ट्रीय अध्यक्ष कोण? हे आपण ठरवू शकत नसल्याचे सांगताना त्यांनी पक्षांतर्गत विषय आणि विधिमंडळ पक्ष यात नेमका फरक काय? हे अधोरेखित केले. ३० जून २०२३ रोजी पक्षात फूट पडली.  दोन्ही गटांना आपली बाजू मांडण्याची संधी दिली. दोन्ही गटांनी आपणच खरा पक्ष असल्याची बाजू मांडली होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व समित्यांची बाजूही लक्षात घेतली. या समित्यांत तळागाळातले कार्यकर्ते असतात. नेतृत्वरचनेसाठी पक्षाची घटना लक्षात घेतली. दोन गटांपैकी एकाने शरद पवार हे पक्षाचे अध्यक्ष आहेत, असा दावा केला, तर दुसऱ्या गटाने अजित पवार हे अध्यक्ष असल्याचा दावा केला होता. निर्णय घेताना कार्यकारिणी आणि अध्यक्षांचे अधिकार विचारात घेतले. महत्त्वाचे राजकीय निर्णय अध्यक्ष घेतील, असे पक्षघटनेत लिहिले आहे. अध्यक्षपदाची निवड घटनेला धरून नाही, असा दावा दोन्ही गटांनी केला होता.

अजित पवार यांची ३० जून २०२३ रोजी पक्षाच्या अध्यक्षपदी निवड झाली आणि ते २ जुलै रोजी राज्य सरकारमध्ये सहभागी झाले. शरद पवार यांच्याविरोधात घोषणाबाजी करणे किंवा त्यांच्या निर्णयाला विरोध करणे हे कृत्य पक्षाविरोधात आहे, असे म्हणता येत नाही. हा पक्षाचा अंतर्गत विषय असल्याचे  अध्यक्ष नार्वेकर यांनी या निकालात नमूद केले. निकाल अपेक्षित असला, तरी तो कायद्याच्या कसोटीवर खरा उतरवण्यासाठी विधानसभा अध्यक्षांनी सर्व बाजूंनी त्याला न्याय दिला. नार्वेकर यांना पक्षांतरबंदी कायद्यात सुधारणा करण्यासाठीच्या केंद्रीय समितीचे अध्यक्ष म्हणून लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी नेमले आहे. ज्या दहाव्या परिशिष्ठाचा नार्वेकर यांनी दोन्ही प्रकरणांमध्ये वारंवार आधार घेतला त्या परिशिष्ठाची चिकित्सा ही समिती करणार आहे. या समितीचा अहवाल देताना नार्वेकर कुठल्या बाबींचा आवर्जून उल्लेख त्यात करतील याचा अंदाज आधीच्या आणि आताच्या निकालाने येतो. राष्ट्रवादीबाबतच्या अध्यक्षांच्या निकालाने शिवसेनेच्या विधिमंडळ पक्षाचे नेतृत्व एकनाथ शिंदेंच्या, तर राष्ट्रवादीच्या विधिमंडळ पक्षाचे नेतृत्व अजित पवारांच्या पक्षाला बहाल झाले आहे. असे असले, तरी शिवसेनेप्रमाणेच राष्ट्रवादीतील वादावर या निकालाने पडदा पडेल, असे मुळीच नाही.

निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांसमोर असलेली लढाई आता लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने जनतेच्या न्यायालयात जाणार आहे. हे न्यायालय अधिक व्यापक आणि परीक्षा पाहणारे असेल. निवडणूक आयोग काय किंवा विधानसभा अध्यक्ष काय; दोघांनीही दिलेल्या निकालावर टीका झालेली आहेच. पक्षाची मालकी कोणाची, हे ठरविण्याचा या दोघांना जसा कायद्याने अधिकार आहे, तसाच अधिकार मायबाप मतदारांनादेखील घटनेने दिलेला आहे. मतदार कोणता निकाल देतील आणि कोणाचा निकाल लावतील, ते लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत कळेलच.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवारRahul Narvekarराहुल नार्वेकर