शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
2
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
3
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
4
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
5
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
6
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
7
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
8
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
9
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
10
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
11
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
12
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
13
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
14
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
15
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
16
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

हे अपेक्षित स्वातंत्र्य नव्हे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2020 5:28 AM

कोणत्याही समाजाने प्रतीक म्हणून विवेकानंद, ज्ञानेश्वर, कबीर, विनोबांची निवड केलेली नाही. उलट लढाऊ प्रतीके शोधून निवडण्यात आली. ज्या अनुसूचित जातीबद्दल काळजी व्यक्त केली जाते, तेथेही जातींमध्ये कडवटपणा दिसतो. प्रत्येकामध्येच वरचढपणाची भावना दिसते.

हाथरससारख्या घटना घडल्या की, चार्वाकाची आठवण येते. वेद काळातील या बंडखोर ऋषीची परंपराधारा शतकागणिक रोडावत गेली; पण महाराष्ट्रात वारकरी सांप्रदायातील सर्वच संत, तर उत्तरेत कबीर पंथाने ती जिवंत ठेवत विस्तारण्याची पराकाष्ठा केली. पुढे १९ आणि २० व्या शतकात महाराष्ट्र आणि बंगालमध्ये चळवळी उभ्या राहिल्या. प्रार्थना समाज असो की, ब्राह्मो समाज; या चळवळीचे ध्येय हे सामाजिक समानता राहिले. फुले, शाहू, आंबेडकर ते हयातभर ‘एक गाव, एक पाणवठ्या’चा ध्यास धरणारे बाबा आढाव, हे सगळेच या दिंडीचे वारकरी. सामाजिक सुधारणेच्या आघाडीवर महाराष्ट्राने जो ठसा उमटवला त्यामागे ही एवढी मोठी परंपरा आहे. असे असतानाही याच महाराष्ट्रात खैरलांजीसारख्या घटनांची संख्या लक्षणीय आहे आणि एका आकडेवारीनुसार बलात्काराच्या घटनांमध्ये महाराष्ट्राचा क्रमांक वरचा लागतो.

आज ज्या हाथरसच्या घटनेने समाजमन ढवळून निघते आहे, त्या उत्तर प्रदेशात कबीर, रविदासापासून ते राम मनोहर लोहियांपर्यंतचा धागा दिसतो; पण दुर्दैवाने लोहियांच्या शिष्यांनीच आकार दिलेल्या तिथल्या मानसिकतेची आजची अवस्था पाहा! गेल्या वर्षभरात राजस्थान, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश या तीन राज्यांमध्ये दलित आणि मागासवर्गीयांवर होणाऱ्या अत्याचारात कमालीची वाढ झाली. या सामाजिक चळवळीच्या प्रदीर्घ परंपरेच्या पार्श्वभूमीवर समाजाचे अभिसरण का झाले नाही? साक्षरता वाढली, सुशिक्षित समाज निर्माण झाला; पण सुशिक्षितांची संस्कृती का निर्माण होऊ शकली नाही, असे प्रश्न पडतात. त्याचवेळी समाजाची धर्म आणि जातीयनिहाय उडालेली शकले आपल्या भोवती फिरताना दिसतात.धर्माचा विखार आणि जातींचा कमालीचा धारदार, टोकदारपणा बोचत राहतो. ‘आपला’ आणि ‘त्यांचा’ ही भाषा सहजपणे कानावर पडते. प्रत्येक धर्म, समाजघटकातील ‘त्यांचा’ हा धर्म-जातीअन्वये वेगळा असतो; पण ‘आपण’ आणि ‘ते’ हा सर्वांचाच स्थायिभाव आहे. या सगळ्या बोचणाऱ्या गोष्टी कोणत्याक्षणी धारदार झाल्या हे कळलेच नाही. उमगले त्यावेळी समाजागणिक आक्रमक संघटना अवतरल्या होत्या. प्रत्येकाने आपली प्रतीके लढाऊच निवडली. त्यात सामाजिक समरसतेऐवजी आक्रमपणाचा अभिनिवेश दिसतो. सामाजिक चळवळींना राजकीय बळ मिळाले, तर वरचढपणाची भावना कमी होत जाते आणि समानता रुजते; पण लोहियांनंतर उत्तर भारतात समाजवादी राजकारणाची वाताहत झाली आणि चळवळी राजकारणाच्या वळचणीला गेल्या.
उर्वरित भारतातही थोड्याफार फरकाने हेच घडले. राजकीय पक्षांनी चळवळींना पाठबळ दिले; पण त्यांचा उद्देश सामाजिक अभिसरणाचा नव्हता. याच्या आडून त्यांनी मतपेढी बांधण्याचा उद्योग केला, कोणी याला सोशल इंजिनिअरिंगचे नाव दिले; पण समाजसुधारणेच्या नावाखाली आपली राजकीय पोळी भाजण्याचा हा एक जुगाड होता. सामान्य माणूस या वरलिया रंगाला भुलत केव्हा सरंजामी मनोवृत्तीच्या दावणीला बांधला गेला, हे त्यालाच कळले नाही. आता प्रत्येक समाजाची एक स्वतंत्र सरंजामीवृत्ती पोसून पुष्ट बनली आहे. एवढ्या चळवळी होऊनही वरचढपणाची भावना महाराष्ट्रात विरली नाही. उलट ती बळकट होत गेली. आज ती उघडपणे वेगवेगळ्या स्वरूपात सर्रास दिसते.
काँग्रेसने पुरोगामी राजकारण केले असेही म्हणता येत नाही. काँग्रेस सत्तेवर असताना राजस्थानात मनुचा पुतळा उभारण्यात आला. आरक्षण हा शब्द ज्वालाग्राही बनला. ज्यांना शिक्षणाची परंपरा नाही आणि उत्पन्नाचे साधनही नाही, अशांना आरक्षण ही मूलभूत संकल्पना आहे. एक हजार वर्षांचा द्वेष शतकागणिक जहरी बनत आहे. खरे तर राजकारणाद्वारे ही क्रांती घडू शकते; पण ते दुधारी शस्र आहे. त्याचा वापर कसा होतो, त्यावर परिणाम दिसतात. आपल्याला समाजकारणासाठी ते वापरता आले नाही. हे स्वातंत्र्य मिळताच गांधी आणि आंबेडकरांना उमजले होते म्हणून १५ ऑगस्ट ४७च्या पहाटे ‘हे माझे स्वातंत्र्य नाही’ असे म्हणत गांधीजी नौखालीत निघून गेले होते, तर या स्वातंत्र्यात माझ्या समाजाचे काय, हा सवाल करीत आंबेडकरांनीही सोहळ्यावर बहिष्कार टाकला होता!