शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
12
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
13
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
14
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
15
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
16
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
17
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
18
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
19
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
20
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा 'वन-डे सामना'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2020 04:57 IST

मुख्यमंत्र्यांनी सूत्रे स्वीकारल्यावर प्रथमच पंतप्रधानांची भेट घेऊन त्यांना महाराष्ट्राला आर्थिक मदत देण्याची विनंती केली. सत्तेकरिता राजकीय सोंगे आणता येतील, पण राज्यापुढील बिकट आर्थिक पेच सोडवला नाही, तर लोकांचा भ्रमनिरास होईल, हे ठाकरे यांना ठाऊक आहे.

राजकारण आणि क्रिकेट यांचा खूप घनिष्ट संबंध आहे. राजकारणाच्या मैदानावर यशस्वी झालेले काही नेते क्रिकेटच्या राजकारणात रमल्याची शरद पवार यांच्यापासून अनेक उदाहरणे आहेत. विद्यमान सरकारमधील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्री आदित्य ठाकरे वगैरे यांचे स्वत:चे क्रिकेट क्लब राहिले आहेत. सध्या राजकारणातही पाचदिवसीय क्रिकेट सामन्यांसारखे काही शिल्लक नसून ‘वन डे क्रिकेट’ असे राजकारणाला स्वरूप प्राप्त झाले आहे. दीर्घ सामना खेळायचा तर चिकाटी, तंत्र वगैरे बाबींना महत्त्व असते. वन डेमध्ये लक्ष्यपूर्ती हेच विजयाचे निदर्शक असते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शुक्रवारच्या भेटीनंतर ठाकरे यांनी सीएए, एनपीआरबाबत व्यक्त केलेली सकारात्मक भूमिका व त्यामुळे आता राज्यातील महाविकास आघाडी सरकारचे काय होणार, याबाबत भाकिते केली जात आहेत. महाविकास आघाडीचा प्रयोग नैसर्गिक नाही, याची त्यामधील सर्वच पक्षांना कल्पना असल्याने आपला नैसर्गिक स्वभाव सोडायचा नाही किंवा तो सोडलाय, हे दिसू द्यायचे नाही. मात्र, सरकारमधील हितसंबंधांकरिता आघाडीचा मांडलेला संसार मोडायचा नाही, असा हा निखळ व्यावहारिक मामला आहे. शिवाय, महाविकास आघाडीचा विचार करताना भाषा जरी पाच वर्षे सरकार टिकवण्याची केली, तरी प्रत्यक्षात दूरगामी विचार न करता ‘वन डे क्रिकेट’सारखे आजचा दिवस खेळून काढायचा, अशी सरकारमधील महानुभावांची भावना आहे.
शिवसेना सीएए व एनपीआरला उघडपणे विरोध करण्याचा विचारही मनात आणू शकत नाही. कारण, लागलीच उद्धव यांना ‘राज’मुद्रा दिसू लागते. भाजपचे नेते तर उद्धव यांना झेलबाद किंवा धावचीत करण्याकरिता टपून बसलेच आहेत. मोदींच्या भेटीनंतर उद्धव यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. शाहीनबागमधील आंदोलकांना पाठिंबा देणे, ही काँग्रेसची गरज आहे. शाहीनबाग आंदोलन जेवढे जास्त तीव्र होईल, तेवढे ते अध्यक्षपदाच्या पोकळीने त्रस्त असलेल्या काँग्रेसच्या पथ्यावर पडणार आहे. सीएए वगैरे राष्ट्रीय मुद्दे असल्याने काँग्रेसला त्यावर विरोधाची भूमिका घेणे अपरिहार्य असल्याचे काँग्रेसनेही शिवसेनेकडे स्पष्ट केले असणार. राष्ट्रवादी काँग्रेसकरिता हे मुद्दे तितकेसे जिव्हाळ्याचे नाहीत. मात्र, नवाब मलिक अथवा जितेंद्र आव्हाडांसारखे दोन-चार नेते यावरून भाजपला टोले देत राहिले व वेळप्रसंगी समान किमान कार्यक्रमाची आठवण सेनेला करून देत राहिले, तरी त्यामुळे सरकारवर काडीमात्र परिणाम होत नाही.
सर्व सत्ताधारी पक्षांनी आपल्या वैचारिक भूमिका व सरकार यांचा थेट संबंध न ठेवण्याची सोयीस्कर भूमिका घेतली आहे. त्यामुळे या पक्षांच्या भूमिका ही थिअरी आहे, तर सरकार हे प्रॅक्टिकल आहे, अशी सोयीस्कर मांडणी आपसूक झाली आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. देशातील सर्व राज्य सरकारांना (भाजपशासितही) एनपीआरला तोंड द्यावे लागणार आहे. जन्माचे पुरावे देताना मुस्लिमांबरोबरच हिंदूंची व मुख्यत्वे भटक्या विमुक्तांचीही पंचाईत होणार आहे. त्यामुळे ही केवळ महाराष्ट्रातील सरकारच्याच नव्हे तर भाजपशासित राज्य सरकारांकरिता चिंतेची बाब आहे. त्यातून मार्ग काढण्याकरिता काही रकाने न भरण्याचा निर्णय संबंधित राज्य सरकारे घेऊ शकतील, असे त्यांचे मत आहे.सीएएनुसार शेजारील मुस्लीमबहुल राष्ट्रांमधील अल्पसंख्याक हिंदूंना देशाचे नागरिकत्व देण्याचा मुद्दा आहे. याबाबतची प्रक्रिया पूर्ण करून प्रत्यक्ष त्या नागरिकांकरिता लाल पायघड्या घालण्याची वेळ येईल, तोपर्यंत विद्यमान महाविकास आघाडी सरकारचा कार्यकाल संपत आलेला असेल, असा सीएएचे समर्थन करताना सेनेचा होरा आहे. एनआरसीची अंमलबजावणी केवळ आसामपुरती मर्यादित असल्याचे आश्वासन महाराष्ट्रात सत्तेचे समान वाटप करण्याचे आश्वासन दिलेल्या अमित शहा यांनी दिले असून सेनेने भाबडेपणाने पुन्हा त्यावर विश्वास ठेवला आहे. मात्र, त्यामागे ‘जेव्हा तशी वेळ येईल तेव्हा बघू’, असा पवित्रा दिसतो. माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांना सरकारच्या स्थैर्याबद्दल विचारले तर ते सांगायचे की, मी अद्याप मुख्यमंत्री आहे. उद्धव ठाकरे हेही वन डे क्रिकेटमधील यशस्वी फलंदाज ठरतील, असेच दिसते.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकNational Register of Citizensएनआरसीcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा