डॉ.स्वामीनाथन:त्यांच्या हृदयात 'शेतकरी' होता!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2023 10:22 AM2023-10-07T10:22:27+5:302023-10-07T10:23:18+5:30

बंगालच्या भीषण दुष्काळाने हेलावलेल्या डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांनी आयुष्यभर शेतकऱ्यांची सेवा करायचे ठरवले होते, ते त्यांनी अतिनिष्ठेने केले.

Dr. Swaminathan: He had a 'farmer' in his heart | डॉ.स्वामीनाथन:त्यांच्या हृदयात 'शेतकरी' होता!

डॉ.स्वामीनाथन:त्यांच्या हृदयात 'शेतकरी' होता!

googlenewsNext

देशातील कृषिविज्ञानात क्रांती आणणाऱ्या डॉ. एम. एस. कटोरा असलेल्या उपाशी भारताला त्यांनी अन्नधान्याच्या स्वामीनाथन या द्रष्ट्या वैज्ञानिकाला काही दिवसांपूर्वी क्षेत्रात स्वयंपूर्ण राष्ट्र बनवले. १९४३ मध्ये बंगालमध्ये आलेल्या भीषण दुष्काळाने ते हेलावून गेले, आणि त्यांच्या बौद्धिक उंचीला न्याय देणारी अन्य अनेक क्षेत्रे बाजूला सारून त्यांनी कृषिक्षेत्राला वाहून घेतले. अगदी तरुण वयात, ते अमेरिकन कृषिशास्त्रज्ञ डॉ. नॉर्मन बोरलॉग यांच्या संपर्कात आले आणि त्यांचा आदर्श ठेवत स्वामीनाथन यांनी आपली वाटचाल सुरू केली. १९५० साली, अमेरिकेत व्याख्यातापदी काम करण्याची काम करण्याचा संधी विनम्रपणे नाकारून ते भारतातच काम करत राहिले. स्वातंत्र्यानंतरच्या दोन पंतप्रधान दशकात भारताने खडतर आव्हानांचा सामना केला. त्यातील प्रमुख आव्हान होते अन्नटंचाई, देशावर दुष्काळाचे सावट पसरलेले असताना डॉ. स्वामीनाथन यांची अढळ बांधिलकी आणि दूरदृष्टी यामुळे देशात कृषी समृद्धीचा नवा अध्याय सुरू झाला. त्यांनी गव्हाची नवी सुधारित वाणे विकसित केली. एकेकाळी हाती भिकेचा कटोरा असलेल्या उपाशी भारताला त्यांनी अन्नधान्याच्या क्षेत्रात स्वयंपूर्ण राष्ट्र बनवले. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी

हरितक्रांतीने अशक्य ते शक्य करुन दाखविण्याच्या भारतीय वृत्तीचे दर्शन जगाला प्रथम घडवले. अब्जावधी आव्हाने असतील, तर त्या आव्हानांवर मात करण्यासाठी नरेंद्र मोदी अभिनवतेच्या ज्योतीने तेवणारी अब्जावधी ही भारताकडे आहेत, हे जगणे पाहिले. हरितक्रांती झाल्याच्या पाच दशकांनंतर भारतीय शेती खूपच आधुनिक झाली आहे. मात्र, डॉ. स्वामीनाथन यांनी झाला रचलेला पाया कधीच विसरता येणार नाही. आज जग भरड धान्य हे सुपर फूड असल्याची चर्चा करत आहे; पण डॉ. स्वामीनाथन यांनी १९९० च्या दशकापासूनच भरड धान्याला प्रोत्साहन मिळावे, यासाठी चर्चा सुरू केली होती. स्वामीनाथन यांच्याशी माझा व्यक्तिगत स्नेह होता. २००१ मध्ये गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर या संवादाला सुरुवात झाली. लागोपाठचा दुष्काळ, मोठे चक्रीवादळ आणि भूकंप यांचा राज्याच्या


विकासावर परिणाम झाला होता. अनेक उपक्रमांपैकी, मृदा आरोग्य कार्ड या उपक्रमामुळे आम्हाला मातीसंदर्भात सखोल तपशील गोळा करता आले, त्याचा नियोजनात फार उपयोग झाला. डॉ. स्वामीनाथन यांनी योजनेसाठी बहुमोल माहिती पुरवली. त्यांच्या सहभागामुळे या योजनेला व्यापक सहमती मिळाली आणि गुजरातच्या कृषी क्षेत्रातील यशाचा पाया रचला गेला.

मी देशाच्या पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यावरही आमच्यामधील संवाद सुरूच राहिला. २०१६ मध्ये त्यांना आंतरराष्ट्रीय कृषी जैवविविधता काँग्रेसमध्ये भेटलो आणि पुढील वर्षी २०१७ मध्ये मी त्यांनी लिहिलेली दोन भागांची पुस्तक मालिका प्रकाशित केली.

वैज्ञानिक' म्हणतात, मात्र, ते त्याहूनही अधिक काही होते. ते खरेतर “किसान वैज्ञानिक", शेतकऱ्यांचे शास्त्रज्ञ होते. त्यांच्या हृदयात शेतकरी होता. त्यांच्या कामाचे यश केवळ प्रयोगापुरते मर्यादित न राहाता बागांमध्ये आणि शेतांमध्ये दिसले. वैज्ञानिक ज्ञान आणि त्याचा व्यावहारिक उपयोग यामधील अंतर डॉ. स्वामीनाथन यांनी कमी केले. मानवी प्रगती आणि पर्यावरणीय शाश्वतता यांच्यातील नाजूक संतुलनावर समर्थन केले. भर देत त्यांनी शाश्वत शेतीचे सातत्याने जागतिक अन्न पुरस्कार (१९८७) हा प्रतिष्ठित सन्मान मिळविणारे ते पहिले भारतीय होते. त्यांनी पुरस्काराची रक्कम नफाविरहित संशोधन फाउंडेशन स्थापन करण्यासाठी वापरली. आजपर्यंत, ही संस्था विविध क्षेत्रांमध्ये व्यापक कार्य करत आहे. कृषी क्षेत्रात मूलभूत संशोधन करणाऱ्या अनेक संशोधन केंद्रांचे श्रेय डॉ. स्वामीनाथन यांना जाते. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी मनिला येथील आंतरराष्ट्रीय तांदूळ संशोधन संस्थेचे संचालक म्हणूनही कार्य केले आहे. आयुष्याच्या सुरुवातीलाच त्यांनी ठरवले होते की शेतीला बळ द्यायचे आणि शेतकऱ्यांची सेवा करायची. त्यांनी ते उत्कटतेने केले. वैज्ञानिक शोधाची फलनिष्पत्ती शेतातल्या पिकांपर्यंत पोचेल हे सुनिश्चित करणे, पुढील पिढ्यांसाठी शाश्वततेतून समृद्धी वृद्धिंगत करणे, ही त्यांची जीवनध्येये डॉ. स्वामीनाथन यांना अनेक जण त्यांना 'कृषी होती, आपणही त्यांच्याशी बांधील राहिले पाहिजे !

Web Title: Dr. Swaminathan: He had a 'farmer' in his heart

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.