शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

जिल्ह्याचे की किल्ल्याचे विभाजन ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2018 12:26 AM

​​​​​​​अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन करणार, अशी घोषणा करुन पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी नगरच्या राजकारणाला फोडणी दिली आहे.

- सुधीर लंकेअहमदनगर जिल्ह्याचे विभाजन करणार, अशी घोषणा करुन पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी नगरच्या राजकारणाला फोडणी दिली आहे. पालकमंत्र्यांची घोषणा म्हणजे उतावळेपणा आहे, अशी टिपण्णी यासंदर्भात विधानसेभेचे विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी लागलीच केली. विखे असे का बोलले? यालाही अनेक संदर्भ आहेत.नगरचे विभाजन हा जुना प्रश्न आहे. एखाद्या जुनाट रोगासारखा. अंतुले व शरद पवार मुख्यमंत्री असतानापासून या चर्चेचे वादळ उठते व पुन्हा शांत होते. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असतानाही विभाजनाची चर्चा झाली. पण ही नौका पैलतिरी कुणीच नेली नाही. नगरपेक्षा छोट्या जिल्ह्यांचे विभाजन झाले. पण, नगरकडे बलवान नेते असतानाही हा प्रश्न सुटला नाही.याचे कारणच मुळात राजकीय आहे. नगरचे विभाजन येथील राजकीय नेतेमंडळींनाच बहुधा नको आहे. सध्या नगरचा राज्यात जो दबदबा आहे तो जिल्ह्याच्या भौगोलिक परिस्थितीमुळे. चौदा तालुके असलेला हा जिल्हा विधानसभेत बारा आमदार पाठवतो, तर लोकसभेत दोन खासदार. या राजकीय ताकदीमुळे जिल्ह्याला मंत्रिपद हे ठरलेले असते. नगरची जिल्हा बँक, साखर कारखानदारी मजबूत आहे. त्या जोरावर नेतेमंडळींनी विशेषत: दोन्ही कॉंग्रेसने जिल्ह्याच्या उत्तर-दक्षिण भागावर पकड ठेवली.विभाजनानंतर ही ताकदच विखुरली जाईल. त्यामुळे नगरच्या नेत्यांचे आजसारखे राजकीय वजन राज्यात राहील का? हा प्रश्न आहे. उत्तर व दक्षिण नगर असे दोन जिल्हे झाल्यास सध्याचे ‘अहमदनगर’ हे मुख्यालय दक्षिणेत जाईल. तर उत्तर जिल्ह्यातील सहा तालुक्यांसाठी संगमनेर, श्रीरामपूर, कोपरगाव किंवा शिर्डी असे नवीन मुख्यालय निर्माण होईल. सध्या राज्यात प्रबळ असणारे राधाकृष्ण विखे व बाळासाहेब थोरात हे दोन्ही मोठे नेते उत्तर जिल्ह्यातील सहा तालुक्यांपुरते मर्यादित होतील. त्यांची दक्षिण जिल्ह्यावरील पकड सैल होईल. दक्षिणेत नवीन नेतृत्त्व निर्माण होईल. विभाजनानंतर शिर्डी, विमानतळ, धरणे ही उत्तरेसाठी मोठी उपलब्धी राहील. पण, त्याचे राजकीय परिणाम दिसत नाहीत. दक्षिणेलाही त्याचा तोटा नाही.उत्तरेतील नेते आजवर दक्षिण म्हणजे ‘अहमदनगर’ लोकसभा मतदासंघातूनही खासदारकी लढवत आले. अण्णासाहेब शिंदे, बाळासाहेब विखे ही त्याची उदाहरणे आहेत. राधाकृष्ण विखे यांचे सुपुत्र सुजय विखे हे सध्याही नगर लोकसभा मतदारसंघातून इच्छुक आहेत. विभाजनानंतर उत्तरेला दक्षिणेवर हा हक्क गाजविता येईल का? त्यामुळेच पालकमंत्री शिंदे यांनी निवडणुकांच्या तोंडावर ही ठिणगी टाकलेली दिसते. विभाजनाबाबत त्यांचे मुख्यमंत्री, महसूलमंत्र्यांशी बोलणे झाले आहे. मुख्यमंत्र्यांशी शिंदे यांची जवळीक आहे. त्यामुळे ठरविले तर भाजप जिल्हा विभाजन करु शकतो. किंबहुना फक्त भाजपच हा प्रश्न सोडवू शकतो. कारण, कॉंग्रेस-राष्टÑवादीची इच्छाशक्ती असती तर त्यांच्या सत्ताकाळातच हा प्रश्न मार्गी लागला असता. पण, या दोन्ही पक्षांच्या नेत्यांना यातून आपली ताकद घटण्याचा व बालेकिल्ला ढासळण्याचा धोका वाटत असावा. विभाजनातून भाजप त्यांची कोंडी करु शकतो. भाजप याचा राजकीय फायदाही उठवू शकतो.

टॅग्स :Radhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटील