शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
5
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
6
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
7
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
8
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
9
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
10
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
11
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
12
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
13
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
14
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
15
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
16
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
17
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
18
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
19
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
20
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ

विघ्नहर्त्या, सप्टेंबरमध्ये जीएसटीचे विघ्न दूर कर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2019 05:40 IST

करनीती भाग-३0१

उमेश शर्माअर्जुन (काल्पनिक पात्र) : कृष्णा, ‘विघ्नहर्ता’ भगवान गणेश सप्टेंबर महिन्यात येत असून सगळीकडे उत्साहाचे वातावरण आहे. करदात्यांसाठी सप्टेंबर महिना सर्वात महत्त्वाचा आहे़ करदात्यांना या महिन्यात कोणत्या समस्यांना समस्यांना सामोरे जावे लागेल?कृष्ण (काल्पनिक पात्र) : अर्जुना, सप्टेंबर महिना हा करदात्यांसाठी खरंच खूप महत्त्वाचा महिना आहे. ज्या करदात्यांना आॅडिट लागू आहे त्या करदात्यांना आर्थिक वर्ष २०१८-१९ साठीचे ‘इन्कम टॅक्स आॅडिट रिपोर्ट’ ३० सप्टेंबर २0१९ पर्यंत दाखल करावे लागेल. त्यात करदात्यांना जीसीटीचीही माहिती देणे गरजेचे आहे. करदात्यांना आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये जीएसटी रिटर्नमध्ये झालेल्या चुका सुधारण्याची शेवटची संधी सप्टेंबर महिन्यात आहे.

अर्जुन : कृष्णा, करदात्यास जीएसटी आॅडिट रिपोर्ट २०१७-१८ आणि ‘इन्कम टॅक्स आॅडिट रिपोर्ट’ २०१८-१९ मध्ये काय विघ्न येऊ शकतात?कृष्ण : अर्जुना, आर्थिक वर्ष २०१७-१८ जीएसटीचे अ‍ॅन्युअल रिटर्न दाखल करण्याची शेवटची तारीख ३0 नोव्हेंबर २0१९ आहे. परंतु ‘इन्कम टॅक्स आॅडिट रिपोर्ट’ दाखल करण्याची शेवटची तारीख ३० सप्टेंबर आहे़ करदात्यांना आर्थिक वर्ष २०१७-१८ च्या समयोजना आर्थिक वर्षासाठी असलेल्या जीएसटीआर-९ मधील टेबल नं. १०, ११, १२ व १३ मध्ये काळजीपूर्वक नोंदी कराव्या लागतील. आर्थिक वर्ष २०१८-१९ चे बुक्स आॅफ अकाउंट्स ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत निश्चित करावी लागतील. करदात्यांनी आर्थिक वर्ष २०१७-१८ मधील जीएसटी लायबिलिटीचा परिणाम लक्षात घेऊन त्याला २०१८-१९ च्या बुक्समध्ये समाविष्ट करावे.

अर्जुन : कृष्णा, आर्थिक वर्ष २०१८-१९ च्या इन्कम टॅक्स आॅडिट रिपोर्टमध्ये जीएसटीची माहिती समाविष्ट करताना करदात्यांना कोणत्या विघ्नांना सामोरे जावे लागेल?कृष्ण : अर्जुना, इन्कम टॅक्स आॅडिट रिपोर्टमध्ये जीएसटीअंतर्गत नोंदणीकृत नसलेल्या संस्थांच्या एकूण खर्चाचे विभाजन करण्याच्या अडचणीस सामोरे जावे लागेल. म्हणजेच एकूण खर्चाची विभागणी अशी असेल - वस्तू व सेवा ज्यांच्यावर जीएसटी लागू होत नाही, कम्पोझिशन योजनेअंतर्गत असलेल्या संस्था, जीएसटीअंतर्गत नोंदणीकृत नसलेल्या संस्था आणि इतर नोंदणीकृत संस्था. म्हणून करदात्यांनी इन्कम टॅक्स आॅडिट रिपोर्टअंतर्गत सादर करण्यासाठी लागणाऱ्या माहितीची काळजीपूर्वक तयारी करून ठेवावी.अर्जुन : कृष्णा, सप्टेंबर महिन्याचे जीएसटी रिटर्न दाखल करताना कोणती विघ्ने येऊ शकतात?कृष्ण : अर्जुना, आर्थिक वर्ष २०१८-१९ च्या जीएसटी रिटर्नमध्ये झालेल्या चुका सुधारण्याची शेवटची संधी सप्टेंबर महिन्यात दाखल होणाºया रिटर्नमध्ये आहे. करदात्यांनी जीएसटी रिटर्न आणि बुक्स आॅफ अकाउंट्सशी जुळवणी करून घ्यावी. करदात्यांनी रिटर्नमध्ये दाखल न केलेले परंतु बुक्स आॅफ अकाउंट्समध्ये दाखल केलेल्या व्यवहारांचा तपशील द्यावा. जुळवणी करणे अत्यंत गरजेचे आहे. जेणेकरून आर्थिक वर्ष २०१८-१९ च्या अ‍ॅन्युअल रिटर्न आणि आॅडिट रिपोर्टला अंतिम रूप येईल.अर्जुन : कृष्णा, करदात्याने यातून काय बोधघ्यावा?

कृष्ण : अर्जुना, करदात्यांना त्यांचे विघ्न दूर करण्यासाठी सप्टेंबर महिना हा सर्वात महत्त्वाचा आहे. कारण या महिन्यात विघ्नहर्ता गणपतीचेही आगमन झाले आहे. जीएसटीचे रिव्हाइज रिटर्न दाखल करता येणार नाही ही सर्वात मोठी अडचण करदात्यांसमोर उभी आहे. सरकारने रिव्हाइज रिटर्न दाखल करण्याची योजना आणावी आणि करदात्यांचे विघ्न दूूर व्हावे हीच विघ्नहर्त्याकडे प्रार्थना असेल.( लेखक सीए आहेत )

टॅग्स :Ganesh Festival Ritualsगणेशोत्सव विधीGSTजीएसटीTaxकर