शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
4
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
5
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
6
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
7
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
8
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
9
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
10
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
11
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
12
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
13
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
14
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
15
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
16
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
17
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
18
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
19
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
20
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 

ढाले यांच्या निधनाने एक झंझावात निमाला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2019 5:13 AM

- ज. वि. पवार फु ले-आंबेडकरी विचारांचा खंदा पुरस्कर्ता, अस्सल आंबेडकरवादी विचारवंत आणि चळवळीत संपूर्ण आयुष्य झोकून घेतलेला नेता ...

- ज. वि. पवारफु ले-आंबेडकरी विचारांचा खंदा पुरस्कर्ता, अस्सल आंबेडकरवादी विचारवंत आणि चळवळीत संपूर्ण आयुष्य झोकून घेतलेला नेता म्हणजे राजा ढाले. राजा ढाले ही व्यक्ती नव्हती तर ती समष्टीची चळवळ होती. आज त्यांच्या जाण्याने पँथरचा झंझावात संपला आहे. नामदेव ढसाळ यांच्यापाठोपाठ राजा ढाले यांच्या जाण्याने आंबेडकरी चळवळीची मोठी हानी झाली आहे.१९६६ पासून आम्ही दोघं एकत्र होतो. कॉलेजमध्येही आम्ही एकत्र होतो. पँथरमध्ये येण्यापूर्वी राजा 'लिटल मॅगझिन' चळवळीत सक्रिय होता. त्या काळात अन्यायाविरोधात लिहिणारे जे मोजके साहित्यिक होते, त्यात बाबुराव बागुल, दया पवार, राजा ढाले, नामदेव ढसाळ, अर्जुन डांगळे आणि मी आघाडीवर होतो. पँथरमध्ये येण्यापूर्वी राजा लिटल मॅगझिनमध्ये सक्रिय असला तरी तो पँथरमध्ये आल्यानंतरच दलित पँथरला खऱ्या अर्थाने उभारी मिळाली होती. त्या काळातील त्याचा 'साधना'तील राष्ट्रध्वजासंबंधातील लेख गाजला होता. त्या लेखाविरोधात महाराष्ट्रासह देशभरात रान माजवलं गेलं.

खटला उभा राहिला. पण, राजा करारी होता, तो डगमगला नाही. 'फासावर लटकवले तरी चालेल, पण माफी मागणार नाही,' असा करारीपणा राजाने दाखवला आणि हा करारीपणा त्याने शेवटच्या श्वासापर्यंत कायम ठेवला. राजाच्या साधनातील या लेखामुळे पँथरला उभारी मिळाली. त्यामुळेच पँथर वाºयासारखी वाढली. त्याआधीही राजा प्रकाशझोतात आला होता, तो ज्येष्ठ साहित्यिका दुर्गाबाई भागवत यांच्यावरील टीकेमुळे. नामदेवच्या 'गोलपीठा' या कवितासंग्रहाचे प्रकाशन होते त्या वेळी दुर्गाबाई भागवतांनी नामदेवच्या कवितांवर टीकाटिप्पणी केली. त्या टीकेला राजाने सडेतोड उत्तर दिलं होतं. दुर्गाबार्इंनी राजाचा लेख ‘साधना’त आल्यावर आकसाने राजाविरोधात एका वृत्तपत्रामध्ये पत्र लिहून सूड उगविला होता.राजाच्या नेतृत्वात आम्ही मराठावाडा विद्यापीठ नामांतराचा लढा लढलो. त्यानंतर पँथरने अनेक छोटी-मोठी आंदोलने केली. त्या काळी नामदेव, राजा, भाई संगारे, अविनाश महातेकर आणि मी चळवळीत आघाडीवर असायचो. त्यामुळे लोक आम्हाला पाच पांडवही म्हणायचे.नामदेववर डाव्या विचारांचा प्रभाव होता, तर राजा शुद्ध बुद्ध-आंबेडकरी विचारांचा पुरस्कर्ता होता. भदन्त आनंद कौसल्यायन यांच्या संपर्कात आल्यानंतर तर बुद्ध विचाराचा तो प्रखर पुरस्कार करू लागला. त्याने 'दलित साहित्या'चा 'फुले-आंबेडकरवादी साहित्य' असा शब्दप्रयोग सुरू केला. राजा नेता होता, मार्गदर्शक आणि चळवळीचा भाष्यकारही होताच. तसेच तो उत्तम चित्रकार आणि कवीही होता.राजाच्या पन्नासाव्या जन्मदिनानिमित्त मी संपादित केलेल्या 'अस्तित्वाच्या रेषा' या त्याच्या पुस्तकात राजाच्या या पैलूचा आढावा घेतला आहे. त्यात त्याने लिहिलेल्या बालकविता, चित्रशिल्पं आणि समाजाला हादरवून सोडणारे लेख प्रसिद्ध केले होते. राजाचं गेल्या पन्नास वर्षांतलं लिखाण या पुस्तकात आहे. राजाचं वाचनही दांडगं होतं. तो सतत वाचत असायचा. मुंबईत ज्या मोजक्या लोकांकडे पुस्तकाचा प्रचंड साठा आहे, त्यापैकी राजा एक होता. त्याचा व्यासंग हा चकित करणारा होता.राजाने लिहिलेल्या एका खासगी पत्रात आपण दोघे (ढाले आणि पवार) एका फांदीवरील दोनच पक्षी आहोत, ज्या फांदीचं नाव आहे आंबेडकरवाद, असा उल्लेख होता. आज या फांदीवरचा एक पक्षी उन्मळून पडला आहे आणि मी एकाकी पडलो आहे. गेल्या पाच दशकांची मैत्री संपुष्टात आली आहे.
राजा कायम चळवळीत ताठ कण्याने उभा असायचा. ही चळवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव मराठवाडा विद्यापीठाला देणारी नामांतरवादी चळवळ असो, क्रांतिबा फुले बदनामी चळवळ असो वा रिडल्स आॅफ हिंदूझमची चळवळ असो राजा ढाले नेहमीच अग्रभागी असे. आपल्या बुद्धिचातुर्याने लढत असे. बाबासाहेबांनी चळवळ ब्रेन आणि पेन यांच्या सामर्थ्यावर लढवली पाहिजे, असे म्हटले होते. राजाने हा विचार तंतोतंत पाळला.राजा आणि मी दलित पँथर बरखास्त केल्यानंतर भय्यासाहेब आंबेडकर यांचे सहकारी झालो. जनता पक्ष नुकताच अस्तित्वात आला होता त्या वेळी बौद्धांच्या सवलतीचा प्रश्न आ वासून उभा राहिला होता. भय्यासाहेबांचे सगळे सहकारी भय्यासाहेबांना सोडून गेले होते. तेव्हा मी आणि राजा यांनीच भय्यासाहेबांना साथ दिली. खासदारकीच्या निवडणुकीत भय्यासाहेबांचा पराभव झाला होता. आम्ही मात्र त्यानंतर भारिपमध्ये सामील होत बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली काम करू लागलो. ढाले एकंदर दोन वेळा पक्षाचे अध्यक्ष झाले आणि मी सरचिटणीस. आमचा नि:स्वार्थीपणा आणि आंबेडकर विचारनिष्ठा याचे हे फलित होते.पँथरनंतर दिशाहीन झालेल्या आंबेडकरी चळवळीला दिशा देण्याचं काम राजाने केलं. आता त्याच्या जाण्याने चळवळ खºया अर्थाने दिशाहीन झालीय. बाबासाहेबांच्या विचारांचा डोळस विश्लेषक हरपल्याने चळवळीला दिशा देणारा कोणीच उरला नाही. माझ्या या पन्नास वर्षांच्या मैत्रीला, सहकाºयाला आणि आंबेडकरी निष्ठावंताला माझा अखेरचा जय भीम.(ज्येष्ठ दलित साहित्यिक)