शहरं
Join us  
Trending Stories
1
"'केम छो वरली' म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना आता मराठी मतांसाठी..."; मनसेचा पलटवार
2
...तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा महाराष्ट्र चालवणार? संजय राऊतांचा ठाण्यातून हल्लाबोल
3
Smriti Irani : "पाकिस्तान आणि राहुल गांधींचा नेमका काय संबंध आहे?"; स्मृती इराणींचा खोचक सवाल
4
Sanju Samson Controversy : हे वागणं बरं नव्हं! सॅमसनचा पारा चढला पण झाली मोठी कारवाई
5
एअर इंडियाच्या पायलट, क्रू मेंबर्सच्या नोकऱ्या धोक्यात? अचानक ७८ फ्लाईट रद्द, प्रवासी खोळंबले
6
पाकिस्ताननं बांगड्या भरल्या नाहीत, इंडिया आघाडीचे नेते फारुख अब्दुल्ला यांचं विधान
7
पावसाचे थैमान! हैदराबादमध्ये घराची भिंत कोसळून 4 वर्षांच्या मुलासह 7 जणांचा मृत्यू
8
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून गौरव मोरेची Exit! म्हणाला - "मला खूप वाईट वाटतंय की..."
9
AstraZeneca जगभरातून कोरोनाची लस घेत आहे मागे; नव्या खुलासानंतर कंपनीचे मोठे पाऊल
10
२ शत्रू ग्रह अस्तंगत: ३ राशींना लाभच लाभ, ३ राशींना काहीसा संमिश्र काळ; कसा असेल प्रभाव?
11
Family Savings : भारतीय कुटुंबांचं 'सेव्हिंग' ५ वर्षांच्या नीचांकी पातळीवर, आता कर्ज घेऊन चालवतायत काम
12
Aadhar Housing Finance IPO: आजपासून खुला झाला Blackstone च्या कंपनीचा आयपीओ, पाहा डिटेल्स 
13
शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?; एक मुलाखत अन् राजकीय चर्चांना उधाण
14
...अन् विलासराव देशमुखांमुळे रितेशची झाली मराठी सिनेमात एन्ट्री, अभिनेत्याने केला खुलासा
15
भाग्यवान! मतदाराचं अचानक फळफळलं नशीब; लकी ड्रॉमध्ये जिंकला हिऱ्याची अंगठी
16
‘१३ तारखेला मोदी सरकारचे तीन तेरा वाजवायचेत, तर ४ जूनला विसर्जन’, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
17
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
18
'या' चुकांमुळे बुडालं Anil Ambani यांचं साम्राज्य, पाहा टीना अंबानी आता काय करतात? किती आहे संपत्ती
19
बसपा प्रमुख मायावतींनी केली मोठी कारवाई, आनंद मोहन यांना राष्ट्रीय समन्वयक पदावरून हटवले
20
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियात तेजी, HDFC Bank घसरला

दानवे-खोतकरांची ‘साखरपेरणी’

By सुधीर महाजन | Published: June 12, 2018 1:09 PM

जो सध्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि भाजपच्या सरकारमधील शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी निवडला आहे. या दोघांमध्ये सध्या जे काही चालू आहे त्याला तोंडसुख घेणे, असे म्हणावे का? कारण असे बोलून या दोघांचेच समाधान होईल

नेहमी नेहमी रीतभात पाळायची, संबंध टिकवायचे, व्यवहार सांभाळायचे; पण शेवटच्या वर्षात कलागती उकरून काढायच्या. एकमेकांच्या नावांचा उद्धार करीत शिमगा खेळायचा, दूषणे द्यायची याला बतावणी म्हणावी की निरुपण, असे कोडे सामान्य माणसाला पडते. तो गोंधळून जातो आणि कोणतीही जाहिरातबाजी न करता किंवा कार्यक्रमाचा धडाका न उडवता चर्चेत राहण्याचा उत्तम मार्ग आहे जो सध्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि भाजपच्या सरकारमधील शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी निवडला आहे.या दोघांमध्ये सध्या जे काही चालू आहे त्याला तोंडसुख घेणे, असे म्हणावे का? कारण असे बोलून या दोघांचेच समाधान होईल. कारण ज्यावेळी हे इकडे एकमेकांचे उणे-दुणे काढत होते त्याच वेळी तिकडे मुंबईत भाजपच्या गोटात आणि ‘मातोश्री’वर भाजप अध्यक्ष अमित शहा आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीची जय्यत तयारी चालू होती. म्हणजे एकीकडे मनोमिलनाचे वातावरण तयार केले जात असताना त्याच पक्षांचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्यमंत्री एकमेकांवर दुगाण्या झाडताना दिसत होते म्हणजे या दोन पक्षांत नेमके चालले आहे तरी काय? अमित शहा-उद्धव ठाकरे यांची भेट खरी मानायची की, दानवे-खोतकरांमधील शिमगा, हे कोडे सर्वांनाच पडले आहे. दानवे म्हणतात, हा पक्षाचा वाद नसून, आमचा आपसातील जालना जिल्ह्यातील वाद आहे, म्हणजे जिल्ह्याच्या बाबतीत याला घरगुती बाब म्हटली, तर उद्या लोकसभेच्या निवडणुका दोन्ही पक्षांनी एकत्रित लढल्या, तर जाहीर सभांमधून हेच खोतकर दानवेंच्या उमेदवाराची तरफदारी करताना दिसतील, असेच म्हणावे लागेल आणि ती युतीची गरज आहे, अशी बतावणीही करतील.

या दोघांच्या भांडणाचे कारण वेगळेच आहे. दानवेंच्या विरोधात लोकसभेसाठी उभे राहण्याची तयारी सध्या खोतकर करीत आहेत, असे दानवेच म्हणतात. समजा असे घडलेच, तर दानवेंसाठी मोठी अडचण ठरणार. कारण २००४ आणि २००९ च्या सार्वत्रिक निवडणुकीत दानवे सेनेमुळेच निवडून आले आणि २०१४ साली मोदी लाटेत तरून गेले. खोतकरांच्या या म्हणण्यात तथ्य आहे. मतदारसंघाचा विचार केला, तर जालना लोकसभा मतदारसंघाची आजची परिस्थिती लक्षात घेता भोकरदन आणि बदनापूर या दोन मतदारसंघांवर भाजपचे वर्चस्व आहे. भोकरदनमध्ये दानवेंचे चिरंजीव संतोष हेच आमदार आहेत, तर बदनापूरमध्ये नारायण कुचे हे दानवे समर्थक समजले जातात. जालना विधानसभा मतदारसंघ हा अर्जुन खोतकरांचा आहे आणि जालना नगर परिषदेची सत्ता काँग्रेसकडे. याच लोकसभा मतदारसंघात सिल्लोड-सोयगाव मतदारसंघ येतो. तेथे काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांच्याशी दानवेंचे बिनसल्याने ते विरोधात. त्यामुळेच दानवेंची राजकीय अडचण वाढल्याने सध्याचे चित्र आहे. जालन्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या परतूर आणि राजेश टोपेंचा घनसावंगी मतदारसंघ जरी परभणी लोकसभा मतदारसंघाचे भाग असले तरी हे दोघेही दानवेंसाठी अडचण समजले जातात. या पार्श्वभूमीवर या दोघांमधील वादाला महत्त्व आहे. 

या दोघांनी एकमेकांवर जे आरोप केले ते पाहता, खरे तर दोघांनी एकमेकांवर गुन्हेच दाखल करायला पाहिजे होते, असे हे गंभीर आरोप आहेत. एकमेकांवर जाहीर आरोप केला की, आपण चर्चेत राहतो, विरोधक मागे पडतात आणि पुढे जनमत बनवणे सोपे जाते, असे एक प्रचाराचे सूत्र असते, तर ही साखरपेरणी म्हणावी काय, असाही प्रश्न पडतो. कारण खोतकरांच्या उमेदवारीची भाषा दानवेच वारंवार करतात; पण आपण तर पक्षप्रमुखाचा आदेश पाळणारे आहोत, असे उत्तर खोतकर देतात. दुसरीकडे हा आमचा वैयक्तिक जिल्हा पातळीवरील वाद आहे, असेही दानवे म्हणतात, तर प्रश्न असा की, हा शिमगा नेमका कशासाठी आणि कोणासाठी, काहीही घडले तरी रंगाची उधळण तुमच्यावरच होणार आहे.  

टॅग्स :Raosaheb Danweरावसाहेब दानवेraosaheb danveरावसाहेब दानवेArjun Khotkarअर्जुन खोतकर