शहरं
Join us  
Trending Stories
1
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
2
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
3
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
4
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
5
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
6
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
7
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
8
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
9
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
10
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
11
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
12
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
13
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
14
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
15
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
16
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
17
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
18
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
19
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
20
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!

संगीत नाटकांचा मानदंड : सौभद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2017 12:38 AM

अण्णासाहेब किर्लोस्कर यांच्या ‘संगीत सौभद्र’ या संगीत नाटकाच्या पहिल्या प्रयोगास परवा १८ नोव्हेंबर रोजी १३५ वर्षे पूर्ण होत आहेत... मराठी संस्कृतीत काव्य-शास्त्र-विनोदाला प्राचीन काळापासून खूप महत्त्वाचे स्थान आहे.

अण्णासाहेब किर्लोस्कर यांच्या ‘संगीत सौभद्र’ या संगीत नाटकाच्या पहिल्या प्रयोगास परवा १८ नोव्हेंबर रोजी १३५ वर्षे पूर्ण होत आहेत...मराठी संस्कृतीत काव्य-शास्त्र-विनोदाला प्राचीन काळापासून खूप महत्त्वाचे स्थान आहे. यातूनच मराठी नाटकाचा उगमही झाला. विष्णूदास भावे यांनी १८४३ साली ‘सीतास्वयंवर’ नाटकाचा प्रयोग करून मराठी रंगभूमीची सुरुवात केली. या मराठी रंगभूमीने नुकतेच ५ नोव्हेंबरला १७५ व्या वर्षात पदार्पण केले. संगीत हाच आत्मा असलेलं गद्य म्हणजे ‘संगीत नाटक’. नांदीनं प्रारंभ, भरतवाक्याचा सुरेल शेवट आणि दरम्यान ठिकठिकाणी पदं हे संगीत नाटकाचं बाह्यरूप. पूर्ण नाटकात संगीताचा अखंड प्रवाह वाहत राहणं, गद्याचा प्रभाव संगीतानंच वाढवणारं नाटक म्हणजे संगीत नाटक. या संगीत नाट्यपरंपरेतील अण्णासाहेब किर्लोस्कर यांनी लिहिलेले ‘संगीत सौभद्र’ हे एक महत्त्वाचं नाटकं. त्याच्या पहिल्या प्रयोगास १८ नोव्हेंबर रोजी १३५ वर्षे पूर्ण होत आहेत. पुण्यातील फरासखान्याजवळील पूर्णानंद नाट्यगृहात हा पहिला प्रयोग सादर झाला. ‘सौभद्र’ नाटक लिहून अण्णासाहेबांनी संगीत नाटक अधिक दृढ करण्याचा प्रयत्न केला. आजतागायत सौभद्र नाटकाची, त्यातील पदांची मोहिनी मराठी रसिकांवर कायम आहे. म्हणूनच संगीत रंगभूमीच्या इतिहासात व वर्तमानातही या नाटकाचे मोल अधिक आहे.‘सौभद्र’ हे संगीत नाटकाचा मानदंड ठरून एक नाट्यशैली म्हणून मान्य झाले. या नाटकाचे यश केवळ त्यातील संगीतावर निर्भर राहिलेले नाही, तर या नाटकातील पात्रांचे मानवी पातळीवरचे परस्परसंबंध, नातेसंबंध लोभसवाणे वाटतात. वरकरणी ही सुभद्रेच्या विवाहाची कथा. पण केवळ पुराणकाळातील कुणा एका सुभद्रेची विवाहकहाणी म्हणून ती राहत नाही, ती कुणाही मध्यमवर्गीय घरातील एखाद्या मुलीच्या विवाहाची कहाणी ठरते. दर्शनी पौराणिक कथानक घेऊनही तसे हे सामाजिक नाटक आहे. सुभद्रा, अर्जुन, कृष्ण, बलराम, रुक्मिणी, नारद इत्यादि परिचितांमधून ही कहाणी उभी राहिलेली आहे. त्यांच्या जीवनातील प्रसंग, संवाद, संघर्षबिंदू या साºया गोष्टी मराठी प्रेक्षकाला जवळच्या वाटल्याने आज इतक्या वर्षांनंतरही ‘सौभद्र’ नाटकाची रसिकप्रियता कमी झालेली नाही. अण्णासाहेब किर्लोस्कर आपण लिहिलेले नाटक रंगमंचावर कसे व्हावे यासाठी जे म्हणून काही करावे लागते ते जाणणारे होते. किर्लोस्कर कंपनीतील बाळकोबा नाटेकर तर पिढीजात गवई. यातील गीतांच्या चालींमध्ये पारंपरिकतेबरोबरच टप्पा, कर्नाटकी रागदारीप्रधानही पदं होती. ‘बलसागर तुम्ही वीर शिरोमणी’ या पदाची पूर्वीची लावणी ढंगाची चाल बदलून पुढे बालगंधर्वांनी ती भीमपलास रागात गायली. ‘वद जाऊ कुणाला’ या पदाच्या सध्याच्या ढंगाचं योगदान हिराबाई बडोदेकरांचे आहे. अशा अनेक कहाण्यांसह सुभद्रेची भूमिका बालगंधर्वांप्रमाणेच अनेकांनी स्त्रीपार्टी‘ नट तसेच गायक अभिनेत्रींनी अजरामर केली. तीनच कलावंतांचा समावेश असलेले त्रिपात्री सौभद्र नाटकाचा अनोखा प्रयोग लता व कीर्ती शिलेदार या भगिनींनी साकारला तसेच सौभद्रच्या पहिल्या प्रयोगास १२५ वर्षे पूर्ण झाली तेव्हा ‘मराठी रंगभूमी’ पुणे संस्थेने पुढाकार घेऊन पुण्यातील पूर्णानंद थिएटर पासून बालगंधर्व रंगमंदिरापर्यंत रथयात्रा काढून सौभद्र नाटकाचा शतकोत्तर रौप्य महोत्सवही साजरा केला. संगीत नाटकाबद्दल बोलताना प्रा. शिवाजीराव भोसले एकदा म्हणाले होते, ‘प्रत्यक्ष अनुभवाला येणारं ज्ञान, सामर्थ्य, अस्तित्व या गुणांचं कल्पनारूप संगीत नाटकाला मिळालं आहे. संगीत नाटक हे एक मनोनिर्मित पण मनोरम कल्पनाशिल्प आहे.’ संगीत सौभद्रचे स्मरणरंजन म्हणूनच महत्त्वाचे व हवेहवेसे आहे. 

- विजय बाविस्कर (vijay.baviskar@lokmat.com)