शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

जीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 00:29 IST

जगण्याच्या समृद्ध संकल्पना माणसाला जिवंत ठेवतात. हा जन्म सुंदर आहे, माझ्यासाठी आलाय आणि मला एकदाच मिळालाय यावर आपण जगू शकतो. पुढल्या जन्माचं कुणी पाहिलं. घ्या मजा करून या जन्मात. मग मस्त खा, प्या, भरपूर हिंडा-फिरा माणसं जोडा, नाती जोडा असं वाटतं. नातं फक्त रक्ताचं नसतं. एकाच आईच्या पोटी जन्मलेली विविध विचारसरणींची मुलं आणि विविध आयांच्या पोटी जन्मलेली एकाच विचारसरणीचे बांधव.

- किशोर पाठकजगण्याच्या समृद्ध संकल्पना माणसाला जिवंत ठेवतात. हा जन्म सुंदर आहे, माझ्यासाठी आलाय आणि मला एकदाच मिळालाय यावर आपण जगू शकतो. पुढल्या जन्माचं कुणी पाहिलं. घ्या मजा करून या जन्मात. मग मस्त खा, प्या, भरपूर हिंडा-फिरा माणसं जोडा, नाती जोडा असं वाटतं. नातं फक्त रक्ताचं नसतं. एकाच आईच्या पोटी जन्मलेली विविध विचारसरणींची मुलं आणि विविध आयांच्या पोटी जन्मलेली एकाच विचारसरणीचे बांधव. मग कुठे जुळवायचा हा हिशेब! सख्खा नवरा वा बायको एकमेकांना विचारत नाहीत; आणि नात्यात न बांधलेली व्यक्ती आपल्यावर जीव टाकते हे कोणतं गणित? थोडक्यात नातं रक्तात नसतं, जीव जडवण्यावर असतं. आपण प्रत्येकाच्या कुठल्या गोष्टीवर प्रेम करतो, जीव लावतो. कुणाचा गळा, कुणाचा शस्त्रक्रिया करणारा हात, कुणाचा पळणारा पाय, कुणाचा कुंचला, कुणाच्या हातातील कला, कुणाचा शब्द... आपण म्हणतो ना तो माणूस नाही मला आवडत. पण त्याचं गाणं, कविता, अभिनय, दिग्दर्शन एकाच मुशीतून बाहेर पडलेल्या ६४ कला या सर्वांवर जीव लावता लावता आपला जीव कधी संपतो ते कळत नाही. हा जीव जडण्याचा प्रकार असतो. बघा जीव, जीवन आणि जीव लावणे एकाच शब्दाचे विराट दर्शन. आपण आपला केवढा जीव म्हणतो या एकाच जिवाने जीव लावायचा जिवात जीव असेपर्यंत जीवनात जगायचं, जीवन घडवायचं, जीव नकोसा वा हवासा होईपर्यंत व्यक्तीवर जीव लावायचा आणि शेवटी जिवाला जीव देऊन जीवन संपवायचं. हीच जीवनाची इतिकर्तव्यता. आयुष्याची चाळीस पन्नास वर्षे एकत्र जगून माणसं एकमेकांना कळत नाहीत. म्हातारपणी कळतं की हा माणूस फक्त कामाकरिता, पैशांकरिता वासनेकरिता आपला होता. अशा साठीच्या स्त्री-पुरुषांना सहवासाची निरर्थकता जाणवते तेव्हा उतारवयात एकटेपण अनुभवतांना तो वा ती आठवते. खूप छान वाटतं आठवणींनी वा वाईटही वाटतं. ही व्यक्ती आपल्याजवळ आली होती पण आपला ताठरपणा, संकोच, स्वाभिमान, स्वार्थ, सामाजिक रुढींचं जाळं या सगळ्यांनी हा वा ही लांब गेले. मग पश्चाताप त्यातूनही जळणारा जीव, कोपणारा जीव, दु:ख करणारा जीव, काठोकाठ नैराश्याने आत्महत्येचा प्रयत्न, विफलता. म्हणून आजच आपला जीव हवेत सोडा. जिवात जीव असेपर्यंत प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या. मरताना हे राहून गेलं. ही भावना नको. हवं ते आणि हवं तेच, तसं जगा! गेलेला क्षण पुन्हा येत नाही.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकnewsबातम्या