शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
3
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
4
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
5
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
6
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
7
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
8
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
9
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
10
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
11
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
12
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
13
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
14
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
15
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
16
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
17
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
18
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
19
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
20
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट

coronavirus: ‘कोरोना’वर मात करणं व्हिएतनामला जमलं!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2020 4:27 AM

२८८ रुग्ण व शून्य मृत्यू ही कमाल व्हिएतनामसारख्या देशानं कशी करून दाखवली? २३ जानेवारी २०२० रोजी व्हिएतनाममध्ये कोरोनाचा रुग्ण सापडल्याचे व्हिएतनाम सरकारने जाहीर केलं. आपल्या देशात कोरोना पोहोचला हे जाहीर करणारा व्हिएतनाम हा पहिला देश.

व्हिएतनाम चीनचा शेजारी देश. १४०० किलोमीटर इतकी व्हिएतनाम व चीनची सीमा एकमेकांना लागून आहे. चीनच्या बाहेर जगात पहिला कोरोनाचा रुग्ण सापडला तो ही व्हिएतनाममध्येच. २३ जानेवारी २०२० रोजी व्हिएतनाममध्ये कोरोनाचा रुग्ण सापडल्याचे व्हिएतनाम सरकारने जाहीर केलं. आपल्या देशात कोरोना पोहोचला हे जाहीर करणारा व्हिएतनाम हा पहिला देश.तो दिवस आणि आजचा दिवस, व्हिएतनाम एखादी लढाई लढावी तसा कोरोनाशी लढला, देशातला प्रत्येक नागरिक लढला आणि त्यातून घडलं असं की ९ कोटी ६० लाख लोकसंख्या असलेल्या व्हिएतनाममध्ये २८८ कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्यातले आजवर २४१ बरे होऊन घरी गेले आणि कोरोनापायी बळी जाणाऱ्यांची संख्या आहे शून्य.एकही माणूस व्हिएतनामने कोरोनापायी बळी दिला नाही. हे कसं जमलं त्यांना. चीनने ज्या चुका केल्या, त्यावेळीच ओळखून व्हिएतनाम सरकारने पाऊलं उचलली आणि आपलं नियोजन बेतलं. मुख्य म्हणजे पैसा कमी, तंत्रज्ञानाची मदत कमी, टेस्टिंग कमी, वैद्यकीय साधनं कमी असा सगळा नन्नाचा पाढा असताना व्हिएतनामला हे जमलं कसं?व्हिएतनाम हा देश फक्त चीनचा शेजारी नाही, तर व्हिएतनामची अर्थव्यवस्थाही मोठ्या प्रमाणात चीनवर अवलंबून आहे. चीनमध्ये कोरोना कहर झाला. अर्थव्यवस्थेला फटका बसला त्याचा थेट परिणाम व्हिएतनामच्या अर्थव्यवस्थेवरही झालाच. यावर्षी सकल राष्टÑीय उत्पादनात घट होईल, पर्यटनातून मिळणारा महसूल बुडेल हे तर उघड आहेच. त्यात व्हिएतनाम हा देश ‘अल्प उत्पन्न देश’ म्हणून ओळखला जातो. म्हणजे या देशातील बहुसंख्य लोक अल्प उत्पन्न गटात मोडतात आणि त्यांच्या क्रयशक्तीवरच देशाची अर्थव्यवस्था तोलली जाते. शेजारच्या इंडोनेशिया, फिलिपिन्स या देशांपेक्षाही व्हिएतनाम हे गरीब राष्टÑ आहे. सकल राष्टÑीय उत्पन्नातून आरोग्यावर होणारा खर्च आहे ५.६ टक्के म्हणजे एकूण जेमतेमच. त्यामुळे जेव्हा कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला त्याचवेळी राजधानी हानोईत लॉकडाऊन जाहीर झालं.व्हिएतनामकडे ‘सार्स’ या आजाराशी लढण्याचा चांगला पूर्वानुभव होता. तो कामाला आला. २००३ मध्ये व्हिएतनामसह चीन, हॉँगकॉँगसह अनेक दक्षिणपूर्वी आशियाई देशात हा सार्सचा ताप पोहोचला होता. त्यावेळी ‘सार्सवरही मात करणारा पहिला देश’ असा बहुमान व्हिएतनामने पटकावला. गेल्या तीन आठवड्यांत कोरोनाचा एकही स्थानिक रुग्ण येथे आढळला नाही. स्थानिक संसर्ग पूर्ण थांबविण्यात व्हिएतनामला यश मिळालं आहे. शुक्रवारी ७ कोरोना रुग्ण देशात आढळले; मात्र, ते दुबईहून आले होते, त्यांना विमानतळावरच तपासणी करून क्वारंटाईन केलं.गेल्या आठवड्यात व्हिएतनाममध्ये शाळाही उघडल्या, लॉकडाऊन बºयापैकी शिथिल झाली. वेळेत व्यवहार सुरूझाले त्यामुळे मंदीचा फार फटका बसणार नाही अशी सरकारला आशा वाटू लागली आहे तसं बारीक नियोजनही केलं आहे. शाळेच्या गेटवरच प्रत्येक मुलाचा ताप तपासला जातो. मास्कचीसक्ती आहे. शारीरिक अंतर राखणं सक्तीचं आहेच व मुलांच्या हातावर सॅनिटायझरही तिथंच देण्यात येतं. दुसरीकडे व्हिएतनामचा सारा भर राहिला तो जलद प्रतिसाद व कृतीवर. आपल्याकडे साधनं कमी आहेत, हे लक्षात घेऊन पहिला रुग्ण आढळला तेव्हाच त्याची संपर्क साखळी शोधत संपर्कातली माणसं क्वारंटाईन केली. पुढे हेच धोरण कायम राहिलं, रुग्ण सापडला की शक्य तेवढी संपर्क साखळी खणून माणसं क्वारंटाईन केली. सगळा भर जनजागृतीवर दिला. नागरिकांना नुसती माहिती देऊन हे सरकार थांबलं नाही तर तुम्ही कृती कार्यक्रमाचा भाग आहात असं म्हणत सरकारने लोकांना अभियानात सहभागी करुन घेतलं. ‘ही महामारी म्हणजे देश लढत असलेलं युद्ध आहे आणि ते जिंकायचं आहे.’ हे देशाचं घोषवाक्य बनलं.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या