शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

सतत यू-ट्यूब पाहाता? पर्यावरणाला मोठा धोका! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2025 10:13 IST

इलेक्ट्रॉनिक उपकरणे बदलण्याची हौस आणि आंतरजालावरील ‘टाइमपास’ आटोक्यात आणला तर डिजिटल कार्बन फूटप्रिंट कमी होण्याला हातभार लागेल.

प्रियदर्शिनी कर्वे, इंडियन नेटवर्क ऑन एथिक्स अँड क्लायमेट चेंज (आयनेक) 

एकविसाव्या शतकात डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर वाढत गेला आहे. कोविड महासाथीत प्रवासावर बंधने आलेली असताना हा वापर अधिक वेगाने वाढला आणि नंतरही वाढलेलाच राहिला. एका जागतिक अभ्यासानुसार २०१३ मध्ये एक प्रौढ व्यक्ती सरासरी सहा तास आंतरजालावर घालवत होती, तर २०२२ पर्यंत यात एका तासाची भर पडली. गेल्या काही वर्षांत डिजिटल कार्बन फूटप्रिंट या विषयावरही बराच अभ्यास झाला आहे व त्यातून काही महत्त्वाच्या गोष्टी पुढे आलेल्या आहेत. डिजिटल कार्बन फूटप्रिंटमध्ये कशाकशाचा समावेश होतो? - स्मार्टफोन, संगणक इत्यादी इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे उत्पादन करण्यासाठी खाणकामापासून कारखान्यापर्यंत सर्वत्र ऊर्जा खर्च होत असते. अजून तरी खनिज इंधने हाच ऊर्जेचा मुख्य स्रोत असल्याने ऊर्जा वापरली की वातावरणातील कार्बन डाय ऑक्साइडमध्ये भर पडतेच. कारखान्यातून आपल्या हातात हे उपकरण येण्यासाठीही ऊर्जा खर्च होते; आणि पर्यायाने कर्ब उत्सर्जनही होते.

आपल्या उपकरणाशी जोडलेले हे सर्व कर्ब उत्सर्जन आपल्याच डिजिटल कार्बन फूटप्रिंटमध्ये मोजले जाते. आपण उपकरण प्रत्यक्ष वापरतो तेव्हा जी वीज खर्च होते त्याच्याशीही कर्ब उत्सर्जन जोडलेले आहेच; पण, आपण जेव्हा आंतरजालावर काही कृती करतो तेव्हा जगभरात विखुरलेली इतरही इलेक्ट्रॉनिक उपकरणांची यंत्रणा वापरली जाते. त्यामुळे या उपकरणांच्या निर्मिती व वापराच्या कार्बन फूटप्रिंटचाही काही हिस्सा आपल्या नावावर जमा होतो. आपण नवे इलेक्ट्रॉनिक उपकरण घेतले की आपल्या आधीच्या उपकरणाची विल्हेवाट लागतानाही कर्ब उत्सर्जन होते. अगदी आपले आधीचे उपकरण योग्य पद्धतीने ई-कचरा म्हणून हाताळले गेले, त्यातील घटकांचा पुनर्वापर झाला, तरीही ऊर्जा खर्च होतेच. त्यामुळे आपण प्रदूषण टाळले तरी कर्ब उत्सर्जन टाळू शकत नाही.

थोडक्यात म्हणजे इलेक्ट्रॉनिक उपकरणे, आंतरजालावरील वावर यांची कार्बन फूटप्रिंट वाढते आहे. पण, म्हणजे डिजिटल तंत्रज्ञानामुळे जागतिक तापमानवाढीचा दर वाढतो आहे का? जगाच्या वेगवेगळ्या भागात राहणारे लोक एकत्र चर्चा करण्यासाठी जेव्हा आंतरजालाचा वापर करतात तेव्हा त्यांची डिजिटल कार्बन फूटप्रिंट निश्चितच शून्य नसते. पण, त्या सर्वांनी प्रवास करून एका ठिकाणी येऊन समोरासमोर बैठक केली असती तर जितके कर्ब उत्सर्जन झाले असते त्यापेक्षा ती कमी असते. अगदी आपले व्यक्तिगत बँकेचे काम आपण स्मार्टफोनद्वारे करतो तेव्हा आपले गर्दीच्या वेळी पेट्रोल जाळत बँकेपर्यंत जाणे-येणे टळलेले असते व त्यामुळे त्या कामासाठीचे कर्ब उत्सर्जन कमी होते आणि वेळही वाचतो.

दोनच दशकांपूर्वी जिथे दोन-तीन उपकरणे लागत तिथे आता एकच व कितीतरी लहान आकाराचे उपकरण वापरले जाते. या उपकरणांची वीज वापराची कार्यक्षमताही वाढत गेली आहे. कोणत्याही कामाला पाच-दहा वर्षांपूर्वी जितकी वीज लागत होती तितकी आता लागत नाही. इलेक्ट्रॉनिक कचऱ्याबाबतही जनजागृती आणि विल्हेवाटीच्या योग्य यंत्रणा या दोन्हीत वाढ झालेली आहे. थोडक्यात म्हणजे विशिष्ट कामांसाठी डिजिटल वावरामुळे या शतकाच्या सुरुवातीला जितके कर्ब उत्सर्जन होत होते ते आता कमी झाले आहे. आपला भौतिक वावर कमी होऊन डिजिटल वावर वाढलेला असल्याने डिजिटल कार्बन फूटप्रिंटमध्ये वाढ झालेली दिसते; पण, त्या बदल्यात भौतिक वावराची कार्बन फूटप्रिंट कमीही झालेली आहे. अर्थात आंतरजालावर माहितीच्या साठवणीत भर पडत गेल्याने त्यासाठीची इलेक्ट्रॉनिक उपकरणांची यंत्रणा व विजेचा वापर यात वाढ झाली आहे हेही खरे. पण, माहिती साठविण्यासाठी भौतिक यंत्रणा असती तर त्यातूनही कर्ब उत्सर्जन झालेच असते. 

गेल्या दशकभरात वीजनिर्मितीत सौर व पवनऊर्जेच्या वापराचे जगभरातील प्रमाण वाढले आहे आणि पुढेही वाढतच जाईल. यामुळे विजेचे कर्ब उत्सर्जन कमी झाल्यानेही आपल्या डिजिटल कार्बन फूटप्रिंटमध्ये घट होत राहील. पण, हातात इलेक्ट्रॉनिक उपकरण व त्याद्वारे आंतरजाल सहज उपलब्ध असल्यावर फक्त कामापुरताच त्यांचा वापर होत नाही. आज जेव्हा प्रत्येक प्रौढ व्यक्ती सरासरी सात तास इलेक्ट्रॉनिक उपकरण वापरते तेव्हा त्यातील बराच वेळ समाजमाध्यमांवरचा वावर, रील्स पाहणे, चॅटिंग इत्यादी बिनकामाच्या, केवळ मेंदू गुंगवून ठेवण्याच्या गोष्टींसाठी खर्च होतो. काही प्रमाणात मनोरंजन हीसुद्धा माणसांची गरज आहे; पण, याचे व्यसन लागले तर हे आरोग्यासाठी आणि उत्पादकतेसाठी हानिकारक ठरते. इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या वापराचे व्यसन ही जागतिक पातळीवरील मोठी सामाजिक समस्या बनलेली आहे व सारे देश त्यावर उपाय शोधण्यासाठी धडपडत आहेत. अलीकडेच ऑस्ट्रेलियात लहान मुलांच्या स्मार्टफोन व समाजमाध्यमांच्या वापरावर कायद्याने बंदी घालण्यात आली आहे. थोडक्यात म्हणजे इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा अनावश्यक वापर वाढत गेल्यामुळे बिनकामाची डिजिटल कार्बन फूटप्रिंट वाढत चालली आहे. 

अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासानुसार, २०२४ साली ‘टिकटॉक’च्या वापराची कार्बन फूटप्रिंट ग्रीस देशाच्या कार्बन फूटप्रिंटपेक्षा जास्त आहे, तर ‘यूट्युब’ आणि ‘इन्स्टाग्राम’ फार मागे नाहीत. वारंवार इलेक्ट्रॉनिक उपकरणे बदलण्याची हौस आणि बिनकामाचे आंतरजालावर वेळ घालवणे यावर नियंत्रण ठेवता आले तर डिजिटल कार्बन फूटप्रिंट कमी होण्यालाही हातभार लागेल. थोडक्यात म्हणजे डिजिटल तंत्रज्ञान वापरत राहूनही डिजिटल कार्बन फूटप्रिंट कमी ठेवणे शक्य आहे. डोळसपणे त्या दिशेने वाटचाल करीत राहायला हवी.    pkarve@samuchit.com

टॅग्स :YouTubeयु ट्यूबSocial Mediaसोशल मीडिया