शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
5
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
6
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
7
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
8
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
9
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
10
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
11
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
12
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
13
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
14
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
15
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
16
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
17
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
18
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
19
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
20
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट

एक-दूसरे की नफरत छोडो; भारत जोडो.. भारत जोडो...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2018 5:20 PM

विविधतेत एकतेचा नारा आपण नेहमी देतो. शाळेतील प्रतिज्ञा वर्षानुवर्षे आम्ही म्हटली. भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत, असे आम्ही अभिमानाने म्हणतो. परंतु...

- धर्मराज हल्लाळेविविधतेत एकतेचा नारा आपण नेहमी देतो. शाळेतील प्रतिज्ञा वर्षानुवर्षे आम्ही म्हटली. भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत, असे आम्ही अभिमानाने म्हणतो. परंतु, हे सगळे शिकणे आणि शिकविण्यापुरतेच मर्यादित राहते की काय, असे वर्तन पाहून वाटते. आज भाषा, प्रांत भेद आणि त्याहूनही जाती, धर्म भेद एकमेकांच्या जीवावर उठला आहे, अशी अनेक उदाहरणे घडतात. तरीही सद्भावना आणि भाईचाराचा संदेश देऊन देशभर फिरणारे थोर गांधीवादी नेते डॉ.एस.एस. सुब्बाराव यांच्यासारखी थोर माणसे हा देश एकसंघ ठेवण्यासाठी आयुष्य देतात. देशाच्या कानाकोप-यात राष्ट्रीय एकात्मतेची शिबिरे, महोत्सव घेऊन सामाजिक सलोख्याचे बिजारोपण करण्याचे महत्कार्य डॉ. सुब्बाराव उर्फ भाईजी यांच्या हातून घडत आहे. असाच एक राष्ट्रीय बाल आनंद महोत्सव महाराष्ट्रात विशेष म्हणजे मराठवाड्यातील लातूरमध्ये १७ ते २२ नोव्हेंबर दरम्यान होत आहे. या महोत्सवामध्ये देशातील १८ राज्यांमधून लहान मुले-मुली सहभागी झाले आहेत. महोत्सवात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारे उपक्रम होतील, परंतु त्यापेक्षाही अधिक मोलाचा संदेश मिळणार आहे, तो म्हणजे सद्भावनेचा. आज तो अमूक जातीचा, तो त्या धर्माचा, माझी भाषा ही, त्याची भाषा वेगळी असे भेद शाळेतच अनुभवायला मिळतात. न कळत्या वयात मुले आई-बाबांना गंभीर प्रश्न विचारतात. तू कोणत्या धर्माचा, आपली जात कोणती? मुळातच हे सर्व प्रश्न सभोवतालचे वातावरण पाहून निर्माण होत आहेत. जात आणि धर्माच्या भावना इतक्या नाजूक झाल्या आहेत की, त्यावर लिहिणे दूरच दोन शब्द बोलणेही अवघड बनले आहे. अशावेळी कोणी तरी ठणकावून सांगितले पाहिजे, आपण सर्वजण एक आहोत. जाती-धर्म वेगळे असले तरी मानव आहोत. तुमच्या आणि माझ्या धमण्यांमध्ये वाहणारे रक्त हे सारखेच आहे. माझी वेशभूषा वेगळी आहे. मी बोलतो ती भाषा वेगळी आहे, आमच्या या विविधतेत एकता नांदते हे शिकविले पाहिजे. ९० वर्षीय डॉ. सुब्बारावजी यांनी आपले संपूर्ण आयुष्य या एकमेव मूल्यासाठी वाहिले आहे. महोत्सवाची खासियत म्हणजे वेगवेगळ्या राज्यांतून आलेली वेगवेगळ्या जाती-धर्माची मुले लातूर शहरातील वेगवेगळ्या जाती-धर्मांच्या घरांत वास्तव्याला राहणार आहेत. ज्या पालकांनी समोरचा मुलगा कोणत्या प्रांताचा आहे, कोणती भाषा बोलणार आहे, कोणत्या धर्माचा आहे याचा विचार न करता त्याचे पालकत्व स्वीकारले आहे, त्यांचे मनस्वी अभिनंदन. लातूरच्या विलासराव देशमुख फाऊंडेशन आणि दिल्लीच्या राष्ट्रीय युवा योजनेने पेरलेला हा राष्ट्रीय विचार उद्याचे उज्ज्वल भविष्य घडविणारा आहे. जाती-धर्माचे श्रेष्ठत्व आणि गौणत्व विसरून आपण मानव आहोत, हा मूक संस्कार बाल मनांवर कायमचा या महोत्सवाने कोरला जाणार आहे.डॉ. एस.एन. सुब्बाराव यांना देशप्रेमाचे बाळकडू मिळाले आहे. बालवयातच त्यांनी तिरंगा ध्वज हाती घेऊन इंग्रजांविरुद्ध घोषणा दिल्या. त्यानंतर सबंध आयुष्य राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचाराने प्रेरित होऊन एकात्मतेसाठी दिले आहे. त्यांनी एक राष्ट्रीय विचार घेऊन चंबळचे खोरे पिंजून काढले. जिथे ६५४ डाकूंनी भाईजींसमोर आत्मसमर्पण केले. अशा व्यक्तिमत्वाचा सहवास लातूरसह देशभरातील मुलांना लाभणार आहे.  विशेष म्हणजे विविध जाती-धर्माच्या कुटुंबात वेगवेगळ्या प्रवाहातील मुले आणि मुली रमणार आहेत. महाराष्ट्रातील संस्कृती त्यांना अनुभवायला मिळेल. शिवाय, मुलांबरोबरच लातूरच्या पालकांनाही अन्य राज्यांतील बाल पाहुण्यांकडून त्यांच्या राज्यांची संस्कृती समजणार आहे. एक निश्चित आहे की, लातूरच्या पाचशे कुटुंबाचे देशाच्या विविध राज्यांत कायमचे नाते जोडले जाणार आहे. हा प्रयोग राष्ट्रीय एकात्मतेचे वायूमंडळ तयार करील. ज्याचा प्रभाव आणि परिणाम दीर्घकाळ देशाच्या कानाकोपऱ्यात दिसत राहील.

टॅग्स :Indiaभारत