शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
5
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
7
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
10
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
11
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
12
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
13
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
14
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
15
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
16
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
17
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
18
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
19
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
20
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

भाष्य - शालिनता हरपली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 12:14 AM

आपल्या कामाचा सर्वसामान्यांच्या जीवनात प्रभाव दिसला पाहिजे. २० टक्के राजकारण करताना ८० टक्के समाजकारण करत जगावे अशी भूमिका अखेरपर्यंत

आपल्या कामाचा सर्वसामान्यांच्या जीवनात प्रभाव दिसला पाहिजे. २० टक्के राजकारण करताना ८० टक्के समाजकारण करत जगावे अशी भूमिका अखेरपर्यंत ठेवणारे ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक, राज्य मंत्रिमंडळातील दोनवेळचे माजी मंत्री तथा माजी खासदार शिवाजीराव पाटील हे खऱ्या अर्थाने समाजाभिमुख जीवन जगले. त्यातूनच त्यांनी सहकारमहर्षी, विकासपुरुष, सहकार चळवळीचे ज्येष्ठ मार्गदर्शक अशी स्वत:ची ओळख निर्माण केली. स्पष्ट व सुसंस्कृत भाषा, समंजसपणा आणि सहकार व लोकशाही विचारांशी त्यांनी शेवटपर्यंत बांधिलकी घट्ट ठेवली. यामुळेच त्यांच्या जाण्याने सामाजिक भान जपणाऱ्या पिढीचा एक दुवा निखळला असून राजकारणातील शालिनतेचा उत्तम प्रतिनिधी आपण गमावला असल्याच्या श्रद्धांजलीपर भावना उमटल्या आहेत. राष्ट्रसेवा दलाच्या मुशीतून घडलेल्या शिवाजीरावांनी स्वातंत्र्यप्राप्तीच्या लढ्यानंतर राजकारणातून समाजाला भरपूर विधायक योगदान दिले. पेट्रोल कामगार, शेतकरी व शेतमुजरांचे प्रश्न त्यांनी सोडवले. जलसिंचनाचे क्षेत्र ७ हजार एकरावरून तब्बल ४० हजार एकरापर्यंत वाढवले. विजेचा प्रश्नसुद्धा सोडवला आणि शेतकऱ्यांना ऊस लावायचे आवाहन केले. त्यातून खान्देशच्या विकासात महत्त्वाचा ठरलेला शिरपूर साखर कारखाना आणि अनेक प्रकल्प उभे राहिले. शिसाका अल्पावधीत अग्रेसर ठरला. जागतिक साखर संघाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले. आपल्याकडे रिफार्इंड साखरेचे उत्पादन त्यांच्याच प्रयत्नातून सुरू झाले. १९७७ च्या आणीबाणीच्या काळात काँग्रेसची सर्वत्र पीछेहाट होत असताना त्यांनी धुळे जिल्ह्यातील दोन्ही जागा काँग्रेसला जिंकून दिल्या. पुढे सहकार मंत्रिपदही भूषविले. वसंतदादा पाटलांसोबत सबंध महाराष्ट्र पालथा घातला. शरद पवार युवा काँग्रेसचे अध्यक्ष होते तेव्हा शिवाजीराव सचिव होते. सानेगुरुजींच्या धडपडणाऱ्या मुलांपैकी एक असलेले शिवाजीराव हे अतिशय पुरोगामी विचारांचे होते म्हणूनच आपली धाकटी कन्या स्मिता पाटील हिला सिनेअभिनेत्री होण्यास आडकाठी न करता त्यांनी प्रोत्साहनच दिले. मोठी मुलगी डॉ. अनिता व मधली गीता यासुद्धा उच्चशिक्षित असून परदेशात आहेत. कन्येला प्रथम आणि पित्याला नंतर राष्ट्रीय पुरस्कार अशा दुर्मीळ पालकांपैकी ते एक होते. २०१३ मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तेव्हासुद्धा आपल्या विधायक समाजकारणाचे फळ आयुष्याच्या उत्तरार्धात मिळाल्याची त्यांची समाधानाची भावना होती.