शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूचे CM होताच जोसेफ विजय यांनी काढला १० लाख कोटींच्या कर्जाचा मुद्दा, स्टालीन भडकले! प्रकरण काय?
2
Persian Gulf Tension: समुद्रात पुन्हा रक्ताची होळी? कतारच्या किनाऱ्याजवळ ब्रिटनच्या जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला
3
हंटाव्हायर बाधित जहाज अखेर स्पेनला पोहोचलं! ३ जणांचा बळी; प्रवाशांच्या सुटकेसाठी WHO कडून 'स्पेशल ऑपरेशन'
4
जे बंगालमध्ये घडलं नाही ते तामिळनाडूत घडलं, विजय यांनी भाजपाच्या हातून मोठा मुद्दा पळवला? शपथविधीवेळी घडलं असं काही...  
5
Thalapathy Vijay : मोफत वीज, महिला सुरक्षा... मुख्यमंत्री होताच थलापती विजय यांचा 'मास्टरस्ट्रोक', घेतले मोठे निर्णय
6
Video - आता हे काय नवीन? "आणखी अभ्यास केला असता तर..."; लेकाला ४९९/५०० गुण मिळूनही आई नाराज
7
Hanta Virus : "घाबरण्याची गरज नाही, परिस्थिती नियंत्रणात, पण..."; हंटा व्हायरसबाबत WHO चा मोलाचा सल्ला
8
बूट पळवण्याच्या खेळावरून इतका वाद झाला की, चिडलेल्या नवरीनं मांडवातूनच नवऱ्याला माघारी धाडला!
9
भोंदू खरात प्रकरणी रूपाली चाकणकर यांची चौकशी सुरू; नाशिकमध्ये SIT समोर नोंदवला जबाब
10
ऑस्ट्रेलियन क्रिकेटची पाकिस्तानसारखी अवस्था, करारावरून वाद, खेळाडू आणि बोर्ड आमने-सामने, ५ क्रिकेटपटूंनी घेतला असा निर्णय
11
परदेशातून भारतात आले ११.४ लाख कोटी रुपये, जगातील सर्वाधिक 'रेमिटन्स' मिळवणारा देश
12
ड्रायव्हर, नोकर अन् नातेवाईकांच्या नावे जमवलेली संपत्ती होणार जप्त; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
13
"आई-वडिलांना सोड तरच..."; हमाली करुन बायकोला शिकवलं, नोकरी मिळताच नवऱ्याला धमकी
14
फोटोवर थुंकला, मग हर की पैडीमध्ये जिवंत पत्नीचं केलं पिंडदान, व्हिडीओ व्हायरल होताच खळबळ
15
मातृत्वाचे ममत्व अन् सर्वोच्च त्याग ; ‘ती’च्या किडनीदानाने ३७ मुलांना जीवनदान
16
कोकण, गोवा प्रवाशांना रेल्वेचा सुखद दिलासा; साप्ताहिक उन्हाळी विशेष रेल्वे, जाणून घ्या संपूर्ण माहिती 
17
तिन्ही बापलेक विहिरीत उतरले अन अचानक विहीर ढासळली; मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून अंत
18
संसार वाऱ्यावर सोडून चार मुलांची आई शेजाऱ्यासोबत फरार! हतबल पतीने उचललं टोकाचं पाऊल
19
सोमनाथ : अखंड श्रद्धापर्व अन् महाराष्ट्राशी जडलेले अभेद्य नाते
20
Elvish Yadav : "२ दिवसांत १० कोटी दे, नाहीतर गोळ्या घालू...", एल्विश यादवला जीवे मारण्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

भाष्य - बिहारचे मद्यपी उंदीर !

By admin | Updated: May 5, 2017 00:15 IST

राजकारणाचा एक ‘मास्टर स्ट्रोक’ म्हणून मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी वर्षभरापूर्वी बिहारमध्ये संपूर्ण दारूबंदी लागू केली. राज्यभर

राजकारणाचा एक ‘मास्टर स्ट्रोक’ म्हणून मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी वर्षभरापूर्वी बिहारमध्ये संपूर्ण दारूबंदी लागू केली. राज्यभर याची कडक अंमलबजावणी सुरूआहे व स्वत: नितीश कुमार देशव्यापी दारूबंदीचा आग्रह धरत आहेत. प्रत्यक्षात या दारूबंदीमुळे बिहारमधील किती लोकांचे दारूचे व्यसन सुटले व किती अट्टल मद्यपी दारूवाचून व्याकूळ झाले आहेत याची अधिकृत माहिती उपलब्ध नाही. परंतु या दारूबंदीमुळे बिहारमधील उंदरांना मात्र दारूची चटक लागली आहे व ते कोट्यवधी रुपयांची दारू पित आहेत, अशी धक्कादायक माहिती मंगळवारी एका सरकारी बैठकीत उघड झाली. उंदीर लाखो टन अन्नधान्य फस्त करतात हे सर्वश्रुत आहे; पण मूषक दारूचेही शौकीन असतात, हे ऐकल्यावर विश्वास बसणे कठीण आहे. बिहारमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी पाटण्याचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक मनू महाराज यांनी बैठक घेतली. पोलिसांचे काम चोख सुरू आहे व पाटणा शहर आणि जिल्ह्यात कोट्यवधी रुपयांची अवैध दारू जप्त करण्यात आली आहे, असे मनू महाराज यांना अधिकाऱ्यांनी सांगितले. साहजिकच एवढी दारू आहे कुठे व ती ठेवली आहे कुठे, असा प्रश्न उपस्थित झाला. याचे उत्तर देताना अधिकाऱ्यांनी मद्यपी उंदरांचे बिंग फोडले. जप्त केलेली दारू पोलीस ठाण्यांच्या स्टोअर रूममध्ये ठेवली होती. परंतु बाटल्यांची बुचे कुरतडून उंदरांनी सर्व दारू पिऊन फस्त केली, असे त्यांनी मनू महाराज यांना सांगितले. अर्थात ही लोणकढी थाप न कळण्याएवढे मनू महाराज दूधखुळे नाहीत. त्यांनी बैठकीत अधिकाऱ्यांना खोटे पाडले नाही. मात्र त्यांनी जप्त केलेली दारू उंदरांनी फस्त करू नये यासाठी दोन आदेश काढले. एक, सर्व पोलीस ठाण्यांच्या स्टोअररूम १०० टक्के ‘उंदीरप्रूफ’ कराव्यात. आणि दोन, सर्व पोलीस अधिकारी व शिपायांची यापुढे दररोज अचानक व कुठेही ‘ब्रिद अ‍ॅनेलिसिस टेस्ट’ घेतली जाईल. जो कोणी या चाचणीत ‘फेल’ होईल किंवा चाचणी द्यायला नकार देईल त्याला तत्काळ निलंबित केले जाईल ! अर्थात यावरून दारूबंदीची अंमलबजावणी करताना जप्त केलेली दारू फस्त करणारे बिहारमधील हे उंदीर बहुधा खाकी गणवेशधारी असावेत, अशी शंका मुळीच घेऊ नका. नाही तर नितीशबाबूंना यातही राजकारणाचा वास  यायचा !