शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
2
शिवसेनेचा बाप मीच आहे, भाजपा आमदार परिणय फुकेंचं वादग्रस्त विधान; शिंदेसेना संतप्त
3
४४ भूखंड, एक किलो सोने, २ किलो चांदी...! आरटीओ अधिकाऱ्याची संपत्ती एवढी की पाहून अधिकारी थक्क झाले...
4
त्याच पाकिस्तानने सणसणीत वाजवली! इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला दिला पाठिंबा, अमेरिका...
5
NSDL IPO Allotment Status: NSDL आयपीओला तुफान प्रतिसाद; लेटेस्ट GMP सह जाणून घ्या कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस?
6
२० मिनिटांत ८.८ लाख रुपये लंपास, 'या' ४ चुकांमुळे बँक खाते रिकामे! तुम्ही तर करत नाहीयेत ना?
7
विराट कोहलीसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर तमन्नानं अखेर सत्य सांगितलं, म्हणाली...
8
झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन; किडनीच्या आजाराने होते त्रस्त
9
"इंडस्ट्रीत माझी एकच चांगली मैत्रीण आहे...", शशांक केतकरने घेतलं 'या' अभिनेत्रीचं नाव
10
संशयाचं भूत मानगुटीवर बसलं, सीआरपीएफच्या जवानानं पत्नीचं मुंडकं छाटलं! वृत्त वाहिनीच्या ऑफिसमध्ये गेला अन्...
11
हातखंबा येथे पुन्हा अपघात, गॅसवाहू टँकर वडापावच्या टपरीवर आदळला; ग्रामस्थांनी महामार्ग अडवला
12
भारताबाबत ट्रम्प यांनी मोठी चूक केली, दिग्गज अर्थतज्ज्ञानं साधला निशाणा; म्हणाले, "हे म्हणणं एकदम..."
13
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
14
Share Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Sensex १६६ आणि निफ्टी ३१ अंकांच्या तेजीसह खुला, 'हे' शेअर्स वधारले
15
समृद्धीने सुसाट निघाल तर पकडले जाल, तुमच्यावर लक्ष ठेवणार एक हजार ‘डोळे’
16
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
17
‘महादेवी’ हत्तीण प्रकरणात शासनाचा आदेश नाही, उद्या मुंबईत बैठक : मुख्यमंत्री
18
Video : ६०० वर्षांनंतर पहिल्यांदाच! भूकंपानंतर ज्वालामुखीचा उद्रेक; रशियाच्या कामचटकाचा धोका अजूनही टळेना
19
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
20
पुत्रदा एकादशी-बुध प्रदोष: ८ राशींना सर्वोत्तम काळ, शुभ-लाभ; हाती पैसा राहील, कल्याण होईल!

शिंदेंचा अजेंडा भाजपचा, पण विरोधकांचा कोणता? अन् संजय राऊतांना सगळे कसे विसरले?

By यदू जोशी | Updated: August 26, 2022 07:29 IST

एकनाथ शिंदेंसमोर भाजपपेक्षा मोठे होण्याचे टार्गेट दिसत नाही. सध्यातरी शिंदे - देवेंद्र फडणवीस यांचे ट्युनिंग फर्स्ट क्लास आहे!

यदु जोशीवरिष्ठ सहाय्यक संपादक, लोकमत

एकनाथ शिंदेंसमोर भाजपपेक्षा मोठे होण्याचे टार्गेट दिसत नाही. सध्यातरी शिंदे- देवेंद्र फडणवीस यांचे ट्युनिंग फर्स्ट क्लास आहे!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा स्वतःचा कुठलाही अजेंडा नाही. साधारणतः राजकीय नेता हा त्याच्या पक्षाचा अजेंडा चालवतो. शिंदे यांच्याकडे पूर्ण मालकी असलेला कोणताही पक्ष सध्यातरी नाही. शिवसेनेच्या मालकीचे प्रकरण न्यायालयात आणि निवडणूक आयोगात आहे. वैयक्तिक महत्त्वाकांक्षेतून किंवा दूरदृष्टीतून अजेंडा तयार होत असतो; पण शिंदे यांच्याकडे तोदेखील सध्या दिसत नाही. त्यामुळे भाजपचा अजेंडा राबविणे हे त्यांच्यासाठी क्रमप्राप्त दिसते. आणीबाणीतील बंदीवानांना मानधन पुन्हा सुरू करणे, थेट नगराध्यक्ष आणि थेट सरपंच निवडीचा निर्णय, बुलेट ट्रेन प्रकल्पाला गती ही त्याचीच काही योजनांना गती देत मोदीमंत्राचा उच्चारही पुढच्या काळात नित्यनियमाने होत राहील. ठाकरेंच्या नेतृत्वातील शिवसेनेला भाजपपेक्षा मोठे व्हावेसे वाटत होते आणि दोघांमधील संघर्षांचा मुख्य बिंदू तोच होता.

दरदिवशी कटकट करणारे ठाकरे नकोत म्हणून तर भाजपने शिंदेंना जवळ केले. डोकेदुखीच्या हिंदुत्वापेक्षा सहाकार्याचे हिंदुत्व भाजपने निवडले. शिंदेंसमोर भाजपपेक्षा मोठे होण्याचे टार्गेट दिसत नाही. शिंदे यांचा स्वतःचा अजेंडा भविष्यात येईल आणि तो भाजपला मान्य नसेल तरच दोहोंमध्ये कटूता येऊ शकेल. सध्या मात्र हनिमून पिरियड सुरू आहे. शिंदे फडणवीस यांचे ट्युनिंग फर्स्ट क्लास आहे. मुख्यमंत्र्यांवर अतिक्रमण होणार नाही, याची काळजी फडणवीस घेत आहेत.

विधानसभेतील पहिल्याच भाषणात शिंदे बोलले तेव्हा त्यांचे दमदार भाषण हे अपवाद राहील, असे मानणाऱ्यांचा अंदाज चुकला आहे. याही अधिवेशनात शिंदे यांनी विरोधकांना बरोबर टार्गेट करत बंदे मे दम है, हे दाखवले; पण विरोधकांचे काय? विरोधकांच्या आग्रही भूमिकेमुळे सभागृहाचे कामकाज बंद पडले, विरोधक हौद्यात जाऊन बसले, असे एकदाही झाले नाही. पहिल्याच अधिवेशनात सरकारला सहकार्याची भूमिका दिसली. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सभागृह एकदाही डोक्यावर घेतले गेले नाही. नवीन सरकारला ग्रेस पिरियड दिला पाहिजे, हे मान्य; पण संजय राठोड, अब्दुल सत्तार आदींबाबतची अभययोजना आणण्याचे कारण काय होते? आघाडीची एकत्रित रणनीतीच दिसत नाही.

मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचारावरून ठाकरे सेनेला घेरण्याचे काम काँग्रेसच्या आमदारांनी केले, अन्य मुद्द्यांवरही मतभेद दिसले, तथापि पन्नास खोके, एकदम ओक्के' या विधानसभेच्या पायऱ्यांवरील घोषणाबाजीतून शिंदेसेनेला बदनाम करण्याची संधी मात्र विरोधकांनी चांगलीच साधली. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष आपापली स्पेस शोधत आहेत. एकत्रितपणे स्पेस निर्माण करण्याची त्यांची मानसिकता नाही. ठाकरे सरकारच्या काळात भाजपच्या आमदारांना निधी मिळत नव्हता; पक्षाचे आमदार फडणवीसांकडे जायचे, फडणवीस त्यांना सांगायचे, कळ सोसा! लाचार होण्याचे कारण नाही, आपलाही दिवस येईल।

या अधिवेशनात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आमदार राजीनामा उद्धवजींच्या खिशात ज्या पद्धतीने शिंदे-फडणवीसांकडे फायली घेऊन जात होते, त्यावरून कळ सोसण्याची त्यांची तयारी नाही आणि त्यांना तसे सांगणारा नेताही नाही, हेच सिद्ध होते.राऊतांच्या तपाचे फळमहाविकास आघाडी सरकारच्या शिल्पकारांपैकी एक असलेले खा. संजय राऊत यांच्या अटकेवरून एका चकार शब्दाचाही आवाज ठाकरेसेना किंवा काँग्रेस, राष्ट्रवादीने विधिमंडळात काढला नाही. राऊत यांच्या तपाला छान फळ मिळाले. त्यांचे आमदार बंधू सुनील सभागृहात का आले नाहीत, हे तपासले तर खरे कारण कळेल. संजय राऊत यांना सगळ्यांनी वाऱ्यावर का सोडले असावे? ईडीच्या डायनॉसोरला तर ते घाबरले नसतील?

सध्या विरोधकांमध्ये बहुतेक सगळेच आपापल्या बचावात लागले आहेत. त्यांना राऊतांच्या उपकारांची आठवण कशी येणार?  मोठे साहेब त्यांच्या घरी जाणार होते, एखाद्या फायलीने अडवले असेल. महाविकास आघाडीतील जे मंत्री पत्रकारांकडे ढुंकूनही बघत नव्हते, एखाद्याकडे बघितले तर तो सोन्याचा होईल, अशी भीती त्यांना वाटत होती, ते बऱ्यापैकी जमिनीवर आल्यासारखे वाटत आहेत. या बदलाचे मात्र स्वागत!

भाजपचा वॉचटॉवर मुंबईतभाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने पक्षाचे राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिव प्रकाश यांचे मुख्यालय आता मुंबई केले आहे. याचा अर्थ पक्षश्रेष्ठींच्या एका मोठ्या पदाधिकाऱ्याचा थेट वॉच आता महाराष्ट्र भाजपवर असेल. तसे शिव प्रकाश यांचे कार्यक्षेत्र महाराष्ट्राबाहेरही असेल; पण दिल्लीत येणाऱ्या रिपोर्टिंगवर श्रेष्ठींना फिडबॅक देणे आणि मुंबईत बसून स्वतः माहिती घेऊन रिपोर्टिंग करणे यात फरक पडणारच. श्रेष्ठींचे एक वॉचटॉवर मुंबईत आले आहे. होशियार | चंद्रशेखर बावनकुळेजी।

राजीनामा उद्धवजींच्या खिशातभाजप-शिवसेनेचे सरकार असताना शिवसेनेचे मंत्री राजीनामे खिशात घेऊन फिरायचे. एका मंत्र्याने तर एकदा राजीनाम्याचा कागद खरंच खिशातून काढून पत्रकारांना दाखवला होता. मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला तेव्हाच म्हणजे २९ जूनला आमदारकीचाही राजीनामा देत असल्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली होती; पण तो त्यांनी अद्याप दिलेला नाही. परवा ते विधानभवनात गेले तेव्हा त्यांनी हजेरी बुकात सही केली.

जाता जाताशेवटी महाविकास आघाडीतील मंत्र्यांकडे असलेले पीए, पीएस, ओएसडी भाजपच्या मंत्र्यांनी घ्यायचे नाहीत, असा निर्णय झाला म्हणतात. बोटावर मोजण्याइतक्या दोन-तीन लोकांचे नुकसान झाले पण जुने पापी पुन्हा दिसणार नाहीत हेही बरेच म्हणायचे! त्यांना ठेवून घ्या म्हणून भाजपचे दोन मंत्री फडणवीसांकडे खेटे घालत असल्याची माहिती आहे. एका मंत्र्यांकडे गेलात तर ते बाळासाहेब थोरातांचेच ऑफीस वाटते. जुन्या पीएसला वाचविण्याची महा (जन) धडपड सुरू आहेच. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस