शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

देशी दारू दुकानाची बदलती वेळ धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 00:54 IST

देशी दारू दुकानाची वेळ सकाळी १० ऐवजी सकाळी ८ वाजता करण्याचा निर्णय सरकारच्या गृहविभागाने घेतला. पूर्वी ही वेळ सकाळी १० ते रात्री १० अशी होती. या निर्णयाचे अतिशय वाईट परिणाम शहरी व ग्रामीण भागात होणार आहेत.

- हेरंब कुलकर्णी  (सामाजिक कार्यकर्ते)

देशी दारू दुकानाची वेळ सकाळी १० ऐवजी सकाळी ८ वाजता करण्याचा निर्णय सरकारच्या गृहविभागाने घेतला. पूर्वी ही वेळ सकाळी १० ते रात्री १० अशी होती. या निर्णयाचे अतिशय वाईट परिणाम शहरी व ग्रामीण भागात होणार आहेत. कदाचित काहींना दोन-चार तास वेळ पुढे-मागे झाल्याने काय फरक पडतो, असे वाटेल; पण त्याचे खूप गंभीर परिणाम होणार आहेत.देशी दारूचा ग्राहक हा अजूनही गरीब आणि कष्टकरी वर्ग आहे. लाखो गरीब कुटुंबे देशी दारूचे बळी आहेत. ही दारू शरीराला घातक असते. या निर्णयापूर्वी सकाळी दुकाने उशिरा उघडत असल्याने दारूबाज लोक किमान सकाळी मजुरीला व आपल्या कामधंद्यांना जात होते आणि दारू प्यायची असेल तर काम संपल्यावर रात्री पीत होते. त्यामुळे किमान दिवसभर काम तरी होत होते. सरकारच्या या निर्णयाने आता दारू पिणारे अगदी सकाळीच दारू प्यायला जातील. दारू जास्त प्यायले तर झिंगून कामाला जाण्याची शक्यता कमी होईल. दारू प्यायलेल्या मजुराला, कर्मचाऱ्याला दिलेले कामही नीट होणार नाही. तो जर मजूर असेल तर कदाचित त्या दिवशी कोणी कामही देणार नाही. गरीब कुटुंबातील दारू पिणारे तर दारू पिऊन घरी जाऊन सकाळीच घरी धिंगाणा, शिवीगाळ सुरू करतील. आजही गरीब कुटुंबात महिला आणि मुलांना संध्याकाळी मारहाण, शिवीगाळ सुरू असते. पण किमान सकाळ तरी त्यातून मुक्त असते. त्यामुळे महिला सकाळी काम करू शकतात आणि मुले अभ्यास करतात. पण आता हा घरातील गोंधळ सकाळीच सुरू होईल. तेव्हा कौटुंबिक स्वास्थ्य घालवणारा आणि लोकांच्या कार्यक्षमतेवर थेट परिणाम करणारा हा निर्णय ठरणार आहे.हे सगळे सरकारी अधिकारी, मंत्री यांना माहीत नसेल असे थोडेच आहे का? असे गरिबांचे जीवन अधिक केविलवाणे करणारे निर्णय सरकार का घेते आहे? तर त्याचे कारण दारू विक्री जास्त होण्यासाठी दारू दुकानदार आणि सरकार यात कोट्यवधी रुपयांचे अर्थपूर्ण व्यवहार झाल्याची उघड चर्चा होते आहे तेच महत्त्वाचे कारण आहे. दुसरे कारण वारेमाप आश्वासन पूर्ण करण्यासाठी कर्जबाजारी सरकारला उत्पादन शुल्क अबकारी कर हेच महत्त्वाचे उत्पन्न उरले आहे. निवडणूक वर्षात नवीन करही लावायचे नाहीत. त्यामुळे दारूतून उत्पन्न वाढवायचे असे धोरण आहे. घरपोच दारू ही घोषणा तो अंदाज घेण्यासाठीच होती. जनक्षोभ पाहून सरकारने सारवासारव केली. ते जमेना म्हणून आता दुकाने २४ तास उघडी करण्याच्या दिशेने सुरुवात केली आहे. महाराष्ट्राच्या सामाजिक दडपणाने आता देशी दारूचे परवाने दिले जात नाहीत. हा सरकारचा नाइलाज आहे. तेव्हा आता आहे त्याच दुकानांतून जास्तीत जास्त महसूल काढण्यासाठी ती दुकाने जास्तीत जास्त वेळ उघडी ठेवायची असे धोरण आहे. त्या धोरणाची ही सुरुवात आहे म्हणून त्याला विरोध करायला हवा.दारूबंदीची जेव्हा जेव्हा मागणी होते तेव्हा तेव्हा दारूबंदी करणार नाही, पण आम्ही दारू नियंत्रण करू, अशी सरकारची दारूविषयक भूमिका आहे. जर ही भूमिका असेल तर टप्प्याटप्प्याने दारूचा पुरवठा कमी कमी होईल अशीच धोरणे असली पाहिजेत. दारूची उपलब्धता जितकी कमी तितके व्यसनाचे प्रमाण कमी होते. त्यामुळे नियंत्रणे वाढवत नेली पाहिजेत. इथे सरकारचा उलट प्रवास आहे. दारू सहज उपलब्ध कशी होईल असेच सरकारचे प्रयत्न आहेत. केवळ महसूल वाढविण्यासाठी गरीब कुटुंबांना अधिक दारिद्र्याकडे ढकलणारा हा निर्णय आहे.