शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
आता लोकसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री? काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवरून PM मोदी बरसले
3
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
4
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
5
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
6
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
7
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
8
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
9
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
10
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
11
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
12
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
13
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
14
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
15
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
16
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
17
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
18
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
19
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
20
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"

जात जात नाहीच, निवडणुकीत जात अजूनही प्रभावीच

By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2019 2:46 AM

नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र आणि हरयाणाच्या निवडणुकांमध्ये हेच पाहावयास मिळाले.

डॉ. एस.एस. मंठाअलीकडे राजकारणाचे स्वरूप क्रिकेट सामन्याप्रमाणे होऊ लागले आहे आणि राजकारण्यांनी क्रिकेटच्या प्रशासनाचे रूप धारण केले आहे. त्यात लोकसभेच्या निवडणुका या पाच दिवसीय कसोटी सामन्याप्रमाणे असतात. राज्यांच्या निवडणुकींना वन डे मॅचचे स्वरूप प्राप्त होते, तर पोटनिवडणुका या २०-२० सामन्याप्रमाणे असतात. भाजपला टीम इंडिया समजावे तर राज्ये ही अन्य देशांच्या क्रिकेट टीमचे रूप धारण करतात. दोन्ही प्रकारच्या सामन्यांत विरोधकांची कामगिरी सुमार दर्जाची असते. त्यात काही खेळाडूच हे चमक दाखवीत असतात, तर बाकीचे आल्सो रॅन प्रकारचे असतात. भारतात होणारे सामने टीम इंडिया जिंकत असते, पण अन्य देशांत खेळताना मात्र जिंकताना कष्ट पडतात. दोन्हीमध्ये असलेले हे साम्य लक्षात घेण्याजोगे आहे. काही ठिकाणी मॅच फिक्सिंगचे प्रकारही घडतात, ज्याची तपास संस्थांकडून चौकशी होऊन अंतिम निर्णय न्यायालयात होतो. क्रिकेटप्रमाणेच राजकारणातही वेडेपणा पाहावयास मिळतो आणि तो वर्षानुवर्षे सुरूच असतो.

नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र आणि हरयाणाच्या निवडणुकांमध्ये हेच पाहावयास मिळाले. पण या वेळी विजयाचा करंडक लोकांनी प्राप्त केला. या वेळी सत्तेत असणाऱ्यांनी आणि विरोधकांनीही निवडणूक निकालाविषयी समाधान व्यक्त केले आहे. या वेळी कुणीही ईव्हीएमची चर्चा केली नाही. यावरून पूर्वीपेक्षा या निवडणुका अधिक पारदर्शक होत्या, असे वाटू लागले आहे. त्यामुळे अर्थातच निवडणूक आयोगही समाधानी असेल. या वेळी खरा विजय लोकांचा झाला. त्यांनी दलबदलूंचा जसा मुखभंग केला तसाच मोठमोठ्या सम्राटांनाही बाहेरचा रस्ता दाखवला. आपण वॉशिंग मशीनचे काम करतो, असे राजकीय पक्षांनी समजू नये. जेथे डाग असतात ते वॉशिंग मशीनही स्वच्छ करू शकत नाही. लोक डाग ओळखतात आणि त्यांची वेळ आली की आपले मत व्यक्त करतात. महाराष्ट्रात शक्तिशाली राजाला फारसे नाव नसलेल्या व्यक्तीकडून पराभव पत्करावा लागला, हे चांगले उदाहरण होऊ शकते.राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख हे त्यांना मिळालेल्या यशामुळे समाधानी असतील. त्यांना अपेक्षेपेक्षा जास्त जागा तर मिळाल्याच, पण भाजपचा रथ रोखण्यातही त्यांना यश मिळाले. त्यांनी नेत्यांची दुसरी फळी यशस्वी करून त्यांना अनेक संधी मिळवून दिल्या आहेत. त्यामुळे आता मराठा समाज राष्ट्रवादी काँग्रेसकडे स्वत:चा तारणहार म्हणून बघू लागला आहे. असे असले तरी आपण सत्तेत परत येऊ शकलो, याचा आनंद भाजपला नक्कीच असेल. मराठ्यांचे आधिक्य असलेल्या काही क्षेत्रांत तसेच विदर्भातही त्या पक्षाचा जनाधार कमी झाल्याचे दिसले. त्यामुळे तो परत मिळविण्यासाठी एखाद्या मराठा नेत्याकडे विदर्भाचे नेतृत्व सोपविण्याचा विचार पक्षाला गांभीर्याने करावा लागेल. तसेच हरयाणातही जाट नेत्याचा शोध त्यांना घ्यावा लागेल. तसेच काही काळ अंमलबजावणी संचालनालयासह अन्य एजन्सीच्या हालचालीसुद्धा कमी कराव्या लागतील. कदाचित भाजपच्या मनात वेगळे विचार असू शकतात.

भाजपकडून एक राष्ट्र - एक निवडणूक या तत्त्वाचा पुरस्कार करण्यात येतो. कल्पना चांगली असली तरी त्याचे निष्कर्ष निराशाजनक ठरू शकतात. पण तरीही त्याविषयी विचार करायला हरकत नाही. कारण राष्ट्रीय प्रश्न हे राज्य निवडणुकीत फारसे महत्त्वाचे ठरत नाहीत. हे नुकत्याच झालेल्या निवडणुकांनी दाखवून दिले आहे. त्यामुळे या तत्त्वाचा पुरस्कार केला तर तो भाजपसाठी घातकसुद्धा ठरू शकतो. या निवडणुकीने जातव्यवस्था जिवंत असून ती प्रभावी ठरू शकते, हेही दाखवून दिले आहे. मराठा व जाट या जातींचा प्रभाव या निवडणुकीत दिसून आला.निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना जास्त खूश आहे; कारण त्या पक्षाची सौदेबाजी करण्याची क्षमता वाढली आहे आणि त्यांचा सहकारी पक्ष त्यांच्याशिवाय सत्तेत येऊ शकत नाही. याशिवाय दोन पिढ्यांनंतर त्या पक्षाच्या कुटुंबातील एका व्यक्तीकडे सत्तारूढ होण्याची क्षमता निर्माण झाली आहे, ही त्या पक्षासाठी आनंद देणारी बाब ठरली आहे. विरोधकांना बळ प्राप्त झाले आहे, ही काँग्रेससाठी आनंदाची गोष्ट आहे. महाराष्ट्रात त्या पक्षाकडे विश्वासार्ह नेतृत्व नसताना आणि हरयाणात पक्षांतर्गत कलह असताना दोन्ही ठिकाणी पक्षाला अधिक जागा जिंकता आल्या. फक्त मनसे हा एकच पक्ष अधिक दु:खी असेल. चांगला विरोधी पक्ष देण्याची त्या पक्षाची भूमिका मतदारांना आवडली नाही. त्यामुळे तो पक्ष विरोधक वा सत्तारूढ पक्ष बनू शकला नाही.

या निवडणुकीत अनेक मान्यवर नेत्यांना पराभवाची धूळ चाखावी लागली. ते प्रामुख्याने सगळे दलबदलू नेते होते. ते पुन्हा जुन्या पक्षाकडे परत जातील का? जुना पक्ष त्यांना पुन्हा पक्षात घेईल का? तेव्हा दलबदलू लोकांनी याविषयी आत्मचिंतन करण्याची गरज आहे. जिंकलेल्या आणि पराभूत झालेल्या नेत्यांनी पुन्हा एकदा स्वत:चा नव्याने शोध घ्यावा, हेच जणू मतदारांनी त्यांना सांगितले आहे. निष्ठा नसलेल्या लोकांना सोबत घेऊन कोणतेही युद्ध जिंकता येत नसते. निवडणुका आटोपल्या असल्याने, आता शक्य तितक्या लवकर नवे सरकार सत्तेत यायला हवे. भाजपने या वेळी जनसंदेश यात्रेच्या माध्यमातून प्रचार केला. पण आता लोकांनी दिलेल्या संदेशाकडे त्या पक्षाला लक्ष पुरवावे लागेल.( लेखक राजकीय विश्लेषक आहेत )

टॅग्स :VotingमतदानElectionनिवडणूकCaste Certificateजात वैधता प्रमाणपत्र