शहरं
Join us  
Trending Stories
1
सहाव्या टप्प्याचे उद्या मतदान; प्रचारतोफा शांत, दिल्लीसह आठ राज्यांतील ५८ जागांवर लढत 
2
लोकसभेच्या निकालापूर्वीच शेअर बाजाराची  उच्चांकी झेप; रिझर्व्ह बँकेचा एक निर्णय अन् गुंतवणूकदार मालामाल
3
डोंबिवली हादरली; एमआयडीसीतील रासायनिक कारखान्यातील रिॲक्टरचा स्फोट; २०१६ च्या आठवणी जाग्या
4
छत्तीसगडमध्ये चकमकीत सात नक्षलवाद्यांचा खात्मा; अनेक जण जखमी; मोठा शस्त्रसाठा जप्त
5
बुडालेल्या युवकाचा शोध घेणाऱ्या एसडीआरएफ जवानांची बोट उलटली, 6 जण बुडाले; 3 मृतदेह सापडले, 1 बेपत्ता, 2 रुग्णालयात
6
प्रज्वल देशात परत ये अन् शरण जा; देवेगौडा यांचे पत्र
7
तो व्हिडीओ माझ्या 'बाळा'चा नाही, व्हायरल होणाऱ्या रॅप व्हिडीओबाबत आरोपीच्या आईची प्रतिक्रिया
8
"गाडी चढी आप पे, पैसे मेरे बाप पे..."; पुणे अपघातातील आरोपीचा कथित व्हिडिओ व्हायरल, नेटकरी खवळले
9
मतदानाच्या फॉर्म १७सी वरून वाद, आकडेवारीत फेरफाराचा आरोप, प्रसिद्ध न करण्यामागे ECI ने दिलं असं कारण
10
ताशी २ हजार किमी वेग, भयंकर मारक क्षमता, अमेरिकेने दाखवली जगातील सर्वात घातक विमानाची पहिली झलक
11
डोंबिवली एमआयडीसी स्फोट: मृतांचा आकडा वाढला; ६ जणांनी गमावले प्राण, ४८ जखमींवर उपचार सुरू
12
"...तर मी पाकिस्तानच्या हजारो सैनिकांना सोडलं नसतं," मोदींचा पंजाबमधून काँग्रेसवर हल्लाबोल
13
गजानन कीर्तीकर यांच्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिले असे संकेत  
14
"पतीच्या डोळ्यातून रक्त अन्...", दहशतवाद्यांच्या हल्ल्याला सामोरी गेलेल्या महिलेची थरारक कहाणी!
15
छत्तीसगडच्या दंतेवाडामध्ये भीषण चकमक; सुरक्षा दलांनी 7 नक्षलवाद्यांना घातले कंठस्नान
16
संशयातून हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त; खिशातून पैसे चोरण्याच्या आरोपात पतीने केली पत्नीची हत्या
17
ॲमेझॉनच्या कर्मचाऱ्याचा कारनामा, कंपनी सोडणाऱ्यांच्या खात्यांमधून काढले कोट्यवधी रुपये, अखेर असा सापडला जाळ्यात
18
"पुण्यातील कार अपघाताची न्यायालयीन चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा द्या’’ काँग्रेसची मागणी   
19
"स्वत:च्या मर्यादा पाळा, घुसखोरी करायचा प्रयत्न केलात तर..."; तैवानने चीनला भरला सज्जड दम
20
स्फोटामुळं डोंबिवली हादरली! इमारतीच्या काचा फुटल्या, ३ किमी परिसर दहशतीत

Business: pizza पोहोचविणारे उडते ‘drone’ ही नवी संधी !

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2021 5:45 AM

Business idea: droneमुळे सुरक्षाविषयक प्रश्न निर्माण झाले हे खरे; पण योग्य नियमन केल्यास ही विस्तारणारी संधी आहे, हे नक्की! आपण कधीही न कल्पिलेल्या संधी त्यात आहेत.

- एस. एस. मंथा(शिक्षण आणि व्यवस्थापन तज्ज्ञ) 

आकाशात उडणारे ड्रोन पाहिले की आपल्यापैकी अनेकांची बोटे तोंडात जातात. उडते ड्रोन आपल्या घरी पिझ्झा आणून पोहोचवील अशी कल्पनाही कोणी पाच वर्षांपूर्वी केली नसेल. ते आज घडते आहे.  ड्रोन अनेक ठिकाणी उपयोगात आणली जातात. दुर्घटनास्थळी शोधकार्यात, सीमेवरून घुसखोरी, हवाई फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी, बांधकाम क्षेत्रातील फोटोग्राफी, नकाशे, सर्वेक्षणे, मालमत्तेची तपासणी, भारवहन, शेतीत कीटक नियंत्रण, पिकांवर फवारणी, वस्तू पोहोचविणे याव्यतिरिक्त लष्करी कामातही ड्रोन वापरतात. प्रत्यक्षात ड्रोन हे मनुष्यविरहित हवाई वाहन आहे. त्यात कोणी नसते. दुरून नियंत्रित करता येणारा तो यंत्रमानव आहे. सेन्सर्सच्या समुच्चयाने बांधलेली बुद्धिमत्ता आणि संगणकातील आज्ञावलींनी नियंत्रित तंत्रज्ञान म्हणजे यंत्रमानव. (रोबो) ड्रोनच्या प्रणालीत बसविलेल्या सॉफ्टवेअरच्या नियंत्रणानुसार ड्रोन उडते. त्याला सेन्सर्स आणि जीपीएसची आवश्यकता  असते. काही ड्रोन्स लांबून संचालित केले जातात. नियंत्रित उंची, वेग यासह ते दीर्घ काळ उडू शकतात. याचा अर्थ विमान उड्डाणाचे सर्व नियम याला लागू व्हायला हवेत.  हे तंत्रज्ञान नवे आहे का? - असे पहिले चालकविरहित वाहन ब्रिटिश आणि अमेरिकनांनी पहिल्या महायुद्धाच्या वेळी १९१७ साली तयार केले होते. ब्रिटिशांनी आधी छोट्या रेडिओ नियंत्रित वाहनाची चाचणी घेतली. अमेरिकनांनी नंतर कॅटरिंग बग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टॉर्पेडोची  चाचणी घेतली. ही दोन्ही वाहने युद्धात वापरली.  जुन्या इंग्रजीत मधमाशीच्या नराला ड्रोन संबोधत. लक्ष्यभेदाचा सराव आणि प्रशिक्षणासाठी रेडिओ नियंत्रित असे हे मनुष्यविरहित वाहन १९३५ मध्ये ब्रिटनमध्ये वापरले जाऊ लागल्याने प्रचलित झाले. अमेरिकनांनी ते प्रथम व्हिएतनाम युद्धात वापरले. निश्चित लक्ष्यावर क्षेपणास्त्र सोडणे, पत्रके टाकणे यासाठी त्याचा उपयोग झाला. ९/११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर ड्रोनचा वापर लक्षणीयरीत्या वाढला. ड्रोन हा रोटर्स, प्रोपेलर्स आणि सामान्य विमानासारखा सांगाडा असतो. हा सांगाडा हलका असल्याने तो दुसरे वजन नेऊ शकतो. सुरू करणे, हवे तिकडे नेणे आणि उतरविणे यासाठी त्याला रिमोट कंट्रोल लागतो. ॲक्सलोमीटर, अल्टिमीटर डिस्टन्स सेन्सर, अल्ट्रासॉनिक, लेझर, लिडार, टाइम ऑफ फ्लाइट सेन्सर, थर्मल सेन्सर, व्हिज्युअल सेन्सर, केमिकल सेन्सर, स्टॅबिलायझेशन अँड ओरिएंटेशन सेन्सर आणि टक्कर होणार नाही याची काळजी घेणारे सेन्सर यासारख्या बहुमुखी सेन्सर्सद्वारे पाठविलेल्या वायफाय किंवा रेडिओ लहरींमार्फत हे रिमोट ड्रोनशी संपर्क साधते. सूक्ष्म बदल नियंत्रित करणारे बॅरोमीटर, मॅग्नेटोमीटर गायरोस्कोपही त्यात असतात. अलीकडे ड्रोन प्रतिकूल स्थितीतही काम करतात. दीर्घ काळ उडण्यासाठी सौर ऊर्जेवर चालतात.

- इतके भन्नाट उपयोग असताना आपल्या दैनंदिन जीवनात ड्रोन किती उपयोगी पडेल याची कल्पना करता येईल. २०१७-१८ या काळात ड्रोनचा व्यावसायिक वापर वाढला. ॲमेझोन फ्लर्टी यासारख्या कंपन्यांनी वस्तू घरोघर पोहोचवायला त्याचा वापर सुरू केला. व्हर्जिनिया पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट स्टेट युनिव्हर्सिटीने गुगल अल्फाबेटच्या मदतीने खाद्यपदार्थ घरोघर पोहोचविणारे ड्रोन तयार केले. ड्रोनचा वापर पुढे शेतीत होऊ लागला. मातीचा कस कसा आहे याची माहिती ड्रोन देऊ लागले.  त्यावरचे हायपरस्पेक्ट्रल सेन्सर्स खनिजद्रव्ये हुडकू लागले. ऊर्जा कंपन्या त्यांचे तारांचे जाळे आणि इतर यंत्रांवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोन वापरू लागल्या. विमा कंपन्याही दावे मार्गी लावताना ड्रोनची मदत घेऊ लागल्या.भारतात ड्रोन नियंत्रण नियम आहेत. त्यानुसार मिनी आणि नॅनो ड्रोन उडवायला आपल्याकडे सुरक्षा परवाना लागत नाही. बिगर व्यावसायिक वापरासाठी मायक्रो ड्रोनला पायलट परवाना लागत नाही. नागरी उड्डयन मंत्रालय आपल्या संकेतस्थळावर आंतरसंवादी हवाई पट्ट्याचा नकाशा दाखविते. त्यात तीन पट्टे असतात. नियंत्रित असा पिवळा पट्टा, परवानगीची आवश्यकता नसलेला हिरवा पट्टा आणि परवानगी आवश्यक असा लाल पट्टा, असे तीन भाग असतात. ड्रोनवीरांनी ते लक्षात घेऊन आचारसंहिता पाळली पाहिजे. हवाई क्षेत्र, विमानतळे यांच्याजवळ न उडणे, १२० मीटरच्या खाली राहणे, सेकंदाला २५ मीटरपेक्षा जास्त वेग न ठेवणे, लोक, तसेच इमारतींपासून १५० मीटर दूर राहणे, विमानाच्या जवळ न जाणे असे नियम पाळायला हवेत.२०१६ मध्ये एका अहवालाने २०२१ साली ड्रोनच्या साहाय्याने १२ अब्ज डॉलर्सचा व्यवसाय होईल असा अंदाज वर्तवला होता.  प्राइस वॉटर हाउस कूपरने पायाभूत उद्योग, शेती आणि वाहतूक क्षेत्रात ड्रोनचा व्यवसाय १२७ अब्ज डॉलर्सचा होईल असे म्हटले होते. गोल्डमन साशेने २०१६ ते २०२० दरम्यान १०० अब्ज डॉलर्सची बाजारपेठ ड्रोनला मिळेल असा कयास वर्तविला होता. त्यात लष्कराचा वाटा अधिक अपेक्षित होता. भारतानेही ड्रोन व्यवसायात उतरले पाहिजे. लक्षावधी नोकऱ्या  आणि आपण कधीही न कल्पिलेल्या संधी त्यात आहेत.

 

टॅग्स :businessव्यवसाय