शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
2
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तान जागतिक दहशतवादाचे केंद्र; सर्व धर्मीयांनी केला पाकचा निषेध- परराष्ट्र सचिव
3
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
4
India Pakistan War : भारताने लाहोर ते कराचीपर्यंतच्या ९ शहरांवर इस्रायली ड्रोनने हल्ला केला; घाबरलेल्या पाकिस्तानचा दावा
5
Karachi Bakery: हैदराबादच्या प्रसिद्ध कराची बेकरीविरुद्ध निदर्शने, सर्व दुकानांवर लावला तिरंगा झेंडा...
6
भारताच्या ड्रोन हल्ल्यात हाफिज सईदचा सहकारी ठार, तर मुलगा बेपत्ता
7
भारताचं 'सुदर्शन चक्र' लय भारी! पाकच्या क्षेपणास्त्रांचा 'खेळ खल्लास' करणाऱ्या S-400 ची पॉवरफुल्ल स्टोरी
8
कधी काजल, कधी स्वीटी; २१ वर्षीय गुलशानाचं १२ वेळा लग्न; तरुणांना ‘अशी’ अडकवायची जाळ्यात
9
स्वप्नांसाठी काय पण! रुग्णालयात १२ तास ड्युटी करतानाच UPSC ची तयारी, डॉक्टर झाली IAS
10
बारामतीच्या महिलेचे पाचोऱ्याच्या तरुणावर जडलं प्रेम; पण असं काही घडलं की तिघांनी केली आत्महत्या
11
घराजवळ बाँबचा आवाज ऐकल्याने पाकिस्तानी अभिनेता बिथरला, म्हणाला- "आम्हाला शांतता हवी आहे..."
12
Pakistan Video: "इतके नालायक आहेत, ड्रोन हल्ला, पण सांगताहेत की वीज कोसळली", पाकिस्तानी नागरिकाचा व्हिडीओ व्हायरल
13
Operation Sindoor: भारतीय लष्कराचा पाकमध्ये आणखी एक 'धमाका'; लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम केली उद्ध्वस्त
14
भारत-पाकिस्तान तणावामुळे बाजारात दबाव; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण
15
ऑपरेशन सिंदूरः भारताने पाकिस्तानला दाखवलेत 'तारे', वाहतील का युद्धाचे वारे?; ग्रहस्थिती काय सांगतेय बघा!
16
'ऑपरेशन सिंदूर' भारतीय शौर्याचे प्रतीक, हा शब्द आता.. ट्रेडमार्कवर रिलायन्सचे स्पष्टीकरण
17
"दहशतवादी हल्ल्यामुळे आम्हाला प्रत्युत्तर द्यावं लागलं!"; इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांसमोर एस जयशंकर काय म्हणाले?
18
India pakistan : दोन राज्यात पोलिसांच्या सुट्ट्या रद्द, शाळा बंद; राजस्थान, पंजाबमध्ये हायअलर्ट
19
चहा, डायपर ते सॅनिटायझिंग.. डाबर अनेक प्रॉडक्ट बंद करणार; सीईओंनी स्वतः सांगितलं कारण
20
Sophia Qureshi: बहीण असावी तर अशी! “मी तिच्याद्वारे माझं स्वप्न जगतेय”, कर्नल सोफिया यांचा कुटुंबीयांना अभिमान

धार्मिक बंधने, संस्कृतीतून साकारलेली जैवविविधता, निसर्गाचे संवर्धन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2019 04:13 IST

निसर्ग साधनसंपत्तीचा वापर मोठ्या प्रमाणात व्यापारीकरणासाठी होऊन नैसर्गिक संपदा धोक्यात येऊ लागली आणि जैव विविधतेचा व्यापार सुरू झाला.

- डॉ. महेश गायकवाड आजच्या निसर्ग संवर्धनासाठी अनेक लोकांनी मोलाचे प्रयत्न केल्याचे दिसून येते, यात अगदी रामायण काळापासून ते आजच्या पिढीपर्यंत निसर्ग संवर्धन विविध प्रकारे केल्याचे काळानुसार दिसून येते. अलीकडील ५०० वर्षांपासून म्हणजे मोघल काळापासून ते ब्रिटिश काळापर्यंत अनेक नैसर्गिक प्राणी आणि वनस्पतींचे व्यापारीकरण झाल्याचे दिसून येते. अर्थात याच काळात निसर्ग साधनसंपत्तीचा वापर मोठ्या प्रमाणात व्यापारीकरणासाठी होऊन नैसर्गिक संपदा धोक्यात येऊ लागली आणि जैव विविधतेचा व्यापार सुरू झाला.

मात्र अधिवासी संस्कृती, रामायण काळात, बुद्धकालीन, जैनकालीन संस्कृतीत नैसर्गिक संपदा जतन केल्याचे मोठ्या प्रमाणात पाहावयास मिळते. यात प्रत्येक वनस्पती, प्राणी, जमीन, जंगल, पाणी, पर्वत यांना देवाचे स्थान दिले असल्यामुळे ही नैसर्गिक संपत्ती वाचविता आली हे विशेष. अगदी आपण ५०-६० हजार वर्षांपूर्वीचा विचार केल्यास त्या काळातील मानवाने देवराईच्या नावाने अनेक ठिकाणी वने राखून ठेवली आहेत : भारतातील महाराष्ट्र, झारखंड, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश या राज्यांसह जवळपास १ लाखापेक्षा जास्त देवराई संरक्षित होत्या, मात्र अलीकडे आपल्या विकासाच्या नादात बहुतांश नष्ट होत आहेत. बहुतांश लोकांनी किंवा समूहाने अशा देवराया नष्ट करून त्या ठिकाणी कारखानदारी सुरू केली, हे दुर्दैव. तळी, झरे पाणवठे, पर्वत अशी ठिकाणेसुद्धा संरक्षित केल्याच्या नोंदी आहेत. तुळस आणि मोहाची झाडेसुद्धा तोडायची नाहीत अशी धार्मिक बंधनेही पूर्वीच्या लोकांनी घातली होती.
अगदी ५ ते ६ हजार वर्षांपूर्वीपासून आपल्या पूर्वजांनी शेतीचा शोध लावला आणि खरी जंगलतोड सुरू झाली. विविध मसाल्याच्या पदार्थांचा मानवी जीवनात वापर होऊ लागला. शिवाय अनेक वन्यप्राणी पाळीव करण्याची पद्धत सुरू झाली. तसेच शेतीमधील पिकांची विविधता वाढीस लागली. सुमारे २६०० वर्षांपूर्वी सिंधू नदीच्या किनारी मानवी लोकसंख्या वाढीस लागली. साधारणपणे १००० ते ६०० वर्षांपूर्वी आर्य लोकांचा कालखंड सुरू आणि यात युद्धासाठी घोड्यांचा वापर होऊ लागला. याच काळात वेद, महाभारत आणि रामायण यातील अनेक काव्यांतून निसर्ग संवर्धनासाठी प्रयत्न सुरू झाल्याचे आढळते. याच काळात आर्य लोकांनी शेतीची लोखंडी अवजारे शोधण्यात यश मिळवले आणि शेती व मानवी जीवन यांचा विकास होत गेला.अगदी ४०० वर्षांपूर्वी बौद्ध आणि जैन कालखंड सुरू झाला आणि निसर्ग संवर्धन चळवळ मोठ्या प्रमाणात सुरू झाली. त्या वेळचे त्यांचे विचार आजही उपयोगी येत आहेत. अगदी अभयारण्य ही संकल्पनेसहित जैवविविधता संवर्धन, अधिवास जतन अशा अनेक गोष्टी बौद्ध काळात उदयास आल्या की ज्याचा वापर आजही आपण निसर्ग संवर्धन प्रकल्पासाठी करीत आहोत. सम्राट अशोकाने बुद्धीसम आदर्श मानून शाकाहारी संस्कृतीला महत्त्व दिले आणि शिकार करण्यास बंदी घालण्यात आली.इ.स.पूर्व ३०० वर्षांपूर्वी राजा चंद्रगुप्त मौर्य यांनी वन्यजीव आणि वनस्पतींची सूची तयार केली. शिवाय हत्तीची शिकार केल्यास मृत्युदंड शिक्षा देण्यात येत होती. १६ व्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या साम्राज्यात वृक्षतोड करू नये, जंगल वाचावे यासाठी आंबा, फणस यासारखी बहुपयोगी झाडे वाचविण्यासाठी आदेश काढून जनतेला पर्यावरण रक्षणाचा संदेश दिल्याचे आढळते. मात्र इंग्रजांनी आपल्या निसर्गाची प्रचंड हानी केल्याचे दिसून येते. पण त्यांनी आपल्या भूभागाचा खूप महत्त्वपूर्ण अभ्यास केल्याचे दिसून येते. त्यांनी केलेल्या नोंदी आपल्याला संशोधनासाठी उपयोगी येतील.
पक्षीतज्ज्ञ डॉ. सलीम अली यांनी बीएनएचएस या संस्थेमार्फत भारतात अनेक ठिकाणी पक्षी सर्वेक्षण करण्याचे काम केले आणि अनेक संस्थानांबरोबर काम करीत पक्षी संवर्धन चळवळ भारतभर राबविली. वन्यजीव आणि जंगल संरक्षण मोहीम राबविण्यात डॉ. सलीम अली यांच्याबरोबर अनेक जण होते. अगदी यात प्रकाश गोळे, अशद रहमानी, डॉ. एरीच भरुचा, भारत भूषण या सर्वांनी पक्षी संरक्षण, जैव विविधता संरक्षण आणि जनजागृतीपर खूप मोठे काम देशभर केल्याचे दिसून येते.अलीकडच्या काळात मारुती चितमपल्लींनी अगदी सातत्याने ५० वर्षे जंगलात राहून जंगलातील अनेक निरीक्षणे जगासमोर मांडली आहेत. आपल्या नवीन पिढीला समजेल अशा सोप्या भाषेत त्यांचे लिखाण आज जगभर पसरले आहे. त्यांनी जंगलाचा शास्त्रीयदृष्ट्या केलेला अभ्यास आज आपल्याला वाचवू शकतो. गौतम बुद्ध ते मारुती चितमपल्ली यांच्यातील विचार साम्यच आहेत. जगाने या महान विचारांची ज्योत पुढे तेवत ठेवली तरच आपले जग तरू शकेल, अन्यथा विनाश अटळ आहे.

(लेखक निसर्ग जागरचे अध्यक्ष आहेत.)

टॅग्स :Natureनिसर्ग