शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
2
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
3
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
4
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
5
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
6
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
7
महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'
8
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
9
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
10
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
11
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
12
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
13
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
14
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
15
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
16
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
17
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
18
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
19
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
20
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य

जागतिकीकरणाची चाके उलटी फिरू लागली आहेत का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 9:35 AM

अमेरिकेसह प्रत्येक देशाची पावले सध्या आत्मनिर्भरतेकडेच पडत आहेत. जगभरात विस्तार करण्याचा कंपन्यांचा कलही हळूहळू कमी होताना दिसतो.

-प्रा. नंदकुमार काकिर्डे

जागतिकीकरण, उदारीकरण व आर्थिक सुधारणा हा एकेकाळी भारतासह जगभरातील अनेक देशांनी हाती घेतलेला मंत्र होता. त्याला आता तीन चार दशके उलटून गेली आहेत. मात्र, त्यातील जागतिकीकरणाच्या मंत्राची शक्ती नष्ट होऊ लागली आहे. जागतिकीकरणाच्या उलट प्रक्रियेला गेल्या काही वर्षांत, विशेषत: कोरोनानंतर जास्त वेगाने प्रारंभ झाल्याचे जाणवू लागले आहे. 

भारतामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तर ‘आत्मनिर्भरते’चा नारा  दिलेला आहे. अमेरिकेचे विद्यमान अध्यक्ष जो बायडेन यांनीही ‘अमेरिका इज बॅक’ म्हणत त्यादृष्टीने पावले टाकण्यास प्रारंभ केला आहे. ब्रेक्झिटच्या निमित्ताने इंग्लंडने युरोपपासून फारकत घेऊन स्वत:चा स्वतंत्र सुभा उभारण्यास प्रारंभ केला आहे. चीन जरी विस्तारवादी भूमिकेमध्ये असला तरी त्याला जगभरातून होत असलेला विरोध लक्षात घेता आगामी काळामध्ये त्याच्याही विस्तारवादाला खीळ बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

जागतिकीकरणाचा जेव्हा जगभर रेटा होता तेव्हा अनेक विकसनशील देशांमध्ये बेरोजगारी वाढली. वेतन गोठले. शहरीकरण, बकालपणा वाढला. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेला अलीकडे ब्रेक लावला तो अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी. त्याचवेळी ब्रिटनने युरोपीयन संघातून काडीमोड घेतला. जर्मनी, नेदरलँडमध्येही स्वतंत्रतेचे वारे वाहत होते. १९४५ ते १९९० च्या जागतिकीकरण प्रक्रियेला गेल्या आठ दहा वर्षांत काहीसा आळा बसत आहे.

अमेरिकन सिनेटने आगामी पाच वर्षांसाठी २५० बिलीयन डॉलर्सचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेतला असून, चीनवरचे अवलंबित्व कमी करण्याचे ठरवले आहे. हा कार्यक्रम यशस्वी झाला तर अगदी साध्या चीपपासून यंत्रमानव, भूगर्भातील मौल्यवान खनिजांसाठी चीनवर अवलंबून असलेली अमेरिका विराम देण्याच्या मन:स्थितीत आहे. या प्रचंड रकमेतून चीनमध्ये दिल्या जाणाऱ्या सर्व सवलती अमेरिकेतील उद्योग, व्यापार, कर्मचारी यांच्यासाठी दिल्या जातील व पुन्हा एकदा अमेरिकेचे शक्तीशाली व्यापार विश्व उभारले जाईल.

जगामध्ये अत्याधुनिक प्रकारच्या संगणक चीपची निर्मिती चीनमधील तैवान सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग (टीएसएमसी) येथे होते. त्यावर मात करण्याचे पेंटॅगॉनचे म्हणजे अमेरिकन लष्कराचे उद्दिष्ट आहे. जागतिक चीप व्यवसायातून तैवानला बाहेर काढण्याची अमेरिकेची चाल आहे. अमेरिकेच्या अरिझोना व टेक्सास या प्रांतांमध्ये अत्याधुनिक चीप उत्पादन प्रकल्प उभारण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

अमेरिकेतील अनेक कंपन्यांना आता जगभरात विस्तार नको आहे. त्यांना फक्त अमेरिकेमध्येच व्यापार, व्यवसाय करण्यात रस आहे.  सिटी बँकेने तब्बल १३ देशांमधील ग्राहकांबरोबरचा व्यवसाय बंद करण्याचे जाहीर केले आहे.  बोइंग कंपनीने त्यांच्या उत्पादन विस्ताराचा फेरविचार करण्याचे ठरवले आहे. 

जागतिकीकरणातील पुरवठा साखळीची अकार्यक्षमता, देशादेशांमधील वाढते तंटे, चाचेगिरी, लुटालुटीमुळे होणारे नुकसान यांना अनेक देश कंटाळलेले आहेत. एकमेकांच्या देशांमध्ये गुंतवणूक करण्याच्या प्रक्रियेलाही गेल्या काही वर्षांमध्ये ओहोटी लागली आहे. स्वत:च्या देशातच गुंतवणूक वाढवण्याकडे प्रत्येक देश प्रयत्नशील आहे. वित्तीय संस्था, बँकाही आज त्यांचा व्यवसाय त्यांच्यात देशात करण्यास जास्त उत्सुक आहेत.  

कोरोनाच्या महामारीमुळे प्रत्येक देशाचीच अर्थव्यवस्था खिळखिळी झाली आहे. बेरोजगारी वाढली आहे. व्यापार, व्यवसाय बंद पडले आहेत. अमेरिका, इंग्लंड, युरोपातील अनेक देशांची स्थिती फारशी वेगळी नाही. चीनची खरी आकडेवारी बाहेर येत नाही; पण त्यांना बसलेल्या धक्क्यातून ते बाहेर येत असावेत. त्यांची लोकसंख्या, दडपशाही करणारी विस्तारवादी कम्युनिस्ट सत्ता जगालाच आव्हान देत आहे. मात्र, त्याला तोंड देण्यासाठी चीनला जागतिकीकरण प्रक्रियेतून बाहेर काढत, प्रत्येक देशानेच आत्मनिर्भरतेची कास धरली तर आगामी दशकात जागतिकीकरणाची प्रक्रिया मोडीत निघाल्याशिवाय राहणार नाही, असे वाटते. येणारा काळच याबाबतचा पर्याय ठरवेल, यात शंका नाही. जी ७ देशांच्या बैठकीत या देशांनी चीनच्या विस्तारवादाला आळा घालण्यासाठी जी काही एक भूमिका घेतली. ही जागतिकीकरणाच्या विघटनाचीच चिन्हे आहेत, असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही.