शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

दृष्टिकोन - औद्योगिक वीज दरवाढीने महाराष्ट्र होरपळतोय

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2019 06:38 IST

त्यासाठी सप्टेंबर २०१८ ते मार्च २०२० पर्यंतच्या १९ महिन्यांच्या दर फरकापोटी ३४०० कोटी रुपये अनुदान राज्य सरकारने महावितरण कंपनीस द्यावे,

प्रताप होगाडे    सप्टेंबर २०१८ पासून राज्यातील सर्व औद्योगिक वीज ग्राहकांच्या बिलामध्ये २० टक्के ते २५ टक्के वाढ झाली. राज्यातील वीजदर शेजारील सर्व राज्यांच्या तुलनेने २५ टक्के ते ४० टक्के जास्त झाले आहेत. परिणामी जागतिक स्पर्धेत टिकाव धरता येत नाही. त्यामुळे औद्योगिक क्षेत्रात प्रचंड आर्थिक संकट आणि असंतोष निर्माण झाला असून, महाराष्ट्र औद्योगिक वीज दरवाढीने होरपळत आहे. ही औद्योगिक वीज दरवाढ संपूर्णपणे रद्द करण्याची गरज आहे.

त्यासाठी सप्टेंबर २०१८ ते मार्च २०२० पर्यंतच्या १९ महिन्यांच्या दर फरकापोटी ३४०० कोटी रुपये अनुदान राज्य सरकारने महावितरण कंपनीस द्यावे, अशी आमची मागणी आहे. याकरिता राज्यातील सर्व औद्योगिक संघटनांतर्फे नुकतेच राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चे व वीजबिलांची होळी करण्याचे आंदोलन पुकारले. सर्व औद्योगिक संघटनांच्या उत्स्फूर्त सहभागाने राज्यात २० ठिकाणी मोर्चे व वीजबिलांची होळी झाली. कोल्हापूर, सांगली, पिंपरी-चिंचवड, पुणे, अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगाव, चिपळूण, वसई, पालघर, तारापूर, ठाणे, औरंगाबाद, परभणी, अकोला, यवतमाळ, नांदुरा, सिंदखेडराजा, जळगाव जामोद येथे हे आंदोलन झाले. सातारा व सोलापूर येथेही असेच आंदोलन झाले.

या वस्तुस्थितीची व औद्योगिक क्षेत्रातील संकटाची नोंद घेऊन राज्यातील सर्व आमदारांनी विधानसभेत या संदर्भात आवाज उठवावा, हा प्रश्न धसास लावावा, असे आमचे म्हणणे आहे. राज्यातील सर्व आमदारांना वैयक्तिक आवाहनपत्र, निवेदन, संबंधित माहिती महाराष्ट्र चेंबर व समन्वय समितीतर्फे २४ फेब्रुवारीपर्यंत पाठविण्यात येणार आहे. अशीच परिस्थिती सप्टेंबर २०१३ मध्ये निर्माण झाली होती. त्या वेळी आताचे मुख्यमंत्री आणि तत्कालीन प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस व विनोद तावडे हे नाशिक येथे १७ आॅक्टोबर २०१३ रोजी वीजदरवाढीच्या विरोधात वीजबिलांची होळी आंदोलनात सहभागी झाले होते. त्या वेळी फडणवीस यानी भाजपाची सत्ता आल्यानंतर वीजगळती रोखून आणि वीज खरेदी खर्च कमी करून वीजदर कमी केले जातील, असे जाहीर आश्वासन दिले होते. त्यानंतर नोव्हेंबर २०१३ मध्ये तत्कालीन सरकारने राणे समिती नेमली. समितीच्या शिफारशीनुसार जानेवारी २०१४ पासून १० महिने दरमहा ६०० कोटी रुपये अनुदान दिले गेले होते. त्याचप्रमाणे आताच्या सरकारने यापूर्वी वेळोवेळी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी. त्यासाठी सरकारने सप्टेंबर २०१८ ते मार्च २०२० या १९ महिन्यांसाठी ३४०० कोटी रुपये अनुदान महावितरणला द्यावे आणि दर स्थिर ठेवावेत, असे सर्व औद्योगिक संघटनांचे म्हणणे आहे. सरकारने याबाबत निर्णय घ्यावा, यासाठी आमदारांनी विधानसभेत हा प्रश्न धसास लावण्याचे आवाहन समन्वय समिती व महाराष्ट्र चेंबरने केले आहे. विधिमंडळाचे अधिवेशन २५ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. या अधिवेशन काळात सरकारने याबाबत निर्णय घ्यावा. अन्यथा वीज दरवाढ पूर्णपणे रद्द झाल्याशिवाय हे आंदोलन थांबणार नाही. अधिवेशन संपेपर्यंत निर्णय न झाल्यास अधिक उग्र आंदोलन करण्यात येईल.( लेखक वीजतज्ज्ञ आहेत )

टॅग्स :electricityवीजMIDCएमआयडीसी