शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई शहरातील अजून एक माफिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2019 16:18 IST

मुंबईला त्रास देणारे आजवर अनेक माफिया झाले़ त्यांनी या मायानगरीला पोखरून काढले. भूमाफिया, तेल माफिया, डिझेल माफिया, वाळू माफिया, ही यादी मोठी आहे. या यादीत अजून एका माफियाचा समावेश झाला आहे. 

- विनायक पात्रुडकरमुंबईला त्रास देणारे आजवर अनेक माफिया झाले़ त्यांनी या मायानगरीला पोखरून काढले. भूमाफिया, तेल माफिया, डिझेल माफिया, वाळू माफिया, ही यादी मोठी आहे. या यादीत अजून एका माफियाचा समावेश झाला आहे. तो म्हणजे बांधकाम माफिया. स्वातंत्र्यानंतर रोजगाराच्या शोधात मुंबईत येणा-यांना राहण्यासाठी जागा देणारा म्हणून हा माफिया जन्माला आला. गेल्या सहा दशकात या माफियाने मुंबईला विदु्रप करून टाकले. जागा मिळेल तेथे अनधिकृत बांधकाम, झोपडपट्टी, चाळी, अशी अनेक अवैध बांधकामे या माफियाने उभी केली़ भ्रष्ट प्रशासकीय अधिकारी, राजकीय नेते यांच्या पाठबळामुळे हे शक्य झाले. आता हे माफिया डोईजड झाल आहेत.  त्यांच्याविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्या आहेत. त्याची दखल घेत अनधिकृत बांधकामे पाडण्याचे आदेश न्यायालयाने दिले. अवैध बांधकामे नियमित करू नका, असेही न्यायालाने बजावले. मात्र निगरगट भ्रष्ट अधिकारी व राजकीय नेत्यांना ते मान्य होणारे नाही. अनधिकृत बांधकामे नियमित करण्याचे धोरण सरकारने आणले. ते न्यायालयाने फेटाळून लावले. त्यानंतर पुन्हा सरकारने नवीन धोरण आणले. तेही न्यायालयाने फेटाळले व अवैध बांधकामे नियमित करू नका, असे सरकारला सांगितले. सरकार काही ऐकले नाही, त्यांनी पुन्हा नवे धोरण तयार केले. हे धोरण सध्या न्यायालयाच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. याप्रकरणांच्या याचिकांवर सुनावणीत न्यायालय प्रत्येकवेळी सरकारला फटकारते. नुकत्याच झालेल्या सुनावणीत न्यायालयाने पुन्हा एकदा सरकारचे कान टोचले.  शाळेचे बांधकामच अवैध असेल तर तेथे विद्यार्थी काय धडे घेणार, असे खडेबोल न्यायालयाने सुनावले. आपल्याकडे मंदीर, मशीदचे बांधकामही अनधिकृतपणे केलेले असते. अशा बांधकामात देव राहतोच कसा?, मला देव भेटला तर त्याला मी हा प्रश्न नक्की विचारेन, असेही न्यायालयाने नमूद केले. न्यायालयाला असे म्हणण्याची वेळ आज आली. न्यायालयाच्या टिप्पणीनंतर तरी भ्रष्ट अधिकारी व राजकीय नेत्यांनी थोडे सुधारायला हवे. अनधिकृत बांधकामे रोखणे अशक्य नाही. अनधिकृत बांधकाम नियमित न करण्याची भूमिकाही प्रशासन घेऊ शकते़ कॅम्पा कोलाचे प्रकरण यासाठी उत्तम उदाहरण ठरेल. कॅम्पा कोलाचे रहिवाशी सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचले. त्यावरील सुनावणीत केंद्र व राज्यातील सरकार बदलले तरी या इमारतींचे बांधकात अद्याप नियमित झालेले नाही. नवी मुंबईतील दिघा परिसरातील बांधकाम नियमित करण्यास तेथील प्रशासन तयार नाही. येथील रहिवाश्यांची याचिका उच्च न्यायालयात प्रलंबित आहे.  या दोन ठिकाणचे बांधकाम नियमित  करण्यास प्रशासन तयार नसेल तर संपूर्ण राज्यातील अनधिकृत बांधकामालाही विरोध केला जाऊ शकतो. प्रत्येक स्थानिक प्रशासनाने अशी कठोर भूमिका घ्यायला हवी. तरच या बांधकाम माफियांना आळा बसेल, अन्यथा अनधिकृत बांधकामे वाढतच राहितील. त्यांची चढ्या भावाने विक्री होईल व कालांतराने ती नियमतही होतील. 

टॅग्स :MumbaiमुंबईMaharashtraमहाराष्ट्र