आत्मकथांचे मैदान

By Admin | Updated: November 15, 2014 23:16 IST2014-11-15T23:16:58+5:302014-11-15T23:16:58+5:30

25 वर्षाहून अधिक काळ क्रिकेटचे मैदान गाजवणारा विक्रमादित्य सचिन तेंडुलकरचे ‘प्लेइंग इट माय वे’ हे आत्मचरित्र प्रकाशित झाले

Alphabetical grounds | आत्मकथांचे मैदान

आत्मकथांचे मैदान

25 वर्षाहून अधिक काळ क्रिकेटचे मैदान गाजवणारा विक्रमादित्य सचिन तेंडुलकरचे ‘प्लेइंग इट माय वे’ हे आत्मचरित्र प्रकाशित झाले अन् त्यानिमित्ताने क्रीडा क्षेत्रतील दिग्गजांच्या आत्मचरित्रंकडे पुन्हा सा:यांच्या नजरा वळल्या. सर्वानाच आता इतर खेळाडूंच्याही जीवनाबद्दल, त्यांच्या प्रवासाबद्दल उत्सुकता लागली आहे. अशाच काही देशी-विदेशी खेळाडूंच्या गाजलेल्या आणि वादग्रस्त ठरलेल्या आत्मचरित्रंचा हा धांडोळा..
 
क्रीडा विश्वातील 
अनुभवांचा खजाना
आंतरराष्ट्रीय शतकांचे अभूतपूर्व शतक साजरे करणा:या सचिन तेंडूलकरला विचारलं गेलं, ‘‘अखेरीस तुला हवंय तरी काय, ज्यानं तू संतुष्ट होशील?’’
अधिकाधिक धावा, अधिकाधिक शतकं अन् अर्धशतकं यांचा रतीब दोन तपे घालत राहणा:या या आकर्षक सचिन नामक यंत्रतील मानवीरूप अखेर लोकांपुढे आले व हे विलोभनीय यंत्र आपणहून थांबलं व बोलू लागलं, ‘‘माङया वाटचालीच्या अखेरीस मी क्रिकेट खेळणं थांबवेन. मी एक चांगला क्रिकेटपटू होतो, अशी भावना माजी किक्रेटपटूंनी व्यक्त केली तर मी संतुष्ट होईन. क्रिकेटपटूंच्या जगतात खरंच काय चालतं याची जाण फारच थोडय़ा लोकांना असते. खेळाडूंचं मूल्यमापन खेळाडूच करू शकतात. त्यांची शाबासकी मी सर्वात मोलाची मानतो.’’
सचिनच्या या मताशी मी काही अंशी सहमत आहे. खेळाडूंच्या कर्तृत्वाची जाण व कदर काही खेळाडूंना जरूर असू शकते. पण सरसकट सारे खेळाडू जाणकार असतात, असं मानणं धाडसाचं ठरू शकतं. खेळाडूंसह प्रशिक्षक (जे उत्तम माजी खेळाडू असतातच असंही नाही), पंच, क्रीडावैद्यकापासून मानसोपचारतज्ज्ञ, फिटनेस गुरू, व्यासंगी समालोचक आणि सेवाभावी व दूरदृष्टीचे संघटक यांचीही गणना मी जाणकारांत अवश्य करीन. या सा:यांच्या लेखनाने, आत्मकथनाने व शब्दांकनाने दुनियेला लक्षावधी पुस्तकं, ग्रंथ, समीक्षणं, अहवाल असा लाखमोलाचा खजिना बहाल केला आहे. त्याचा आनंद लुटण्यास 1क् जन्म पुरे पडणार नाहीत. मानव अधिकाधिक शक्तिमान व वेगवान व्हावा व त्याची ङोप अधिकाधिक पल्लेदार व्हावी, हे ऑलिम्पिक चळवळीचे उद्दिष्ट. मानव जातीच्या शारीरिक विकासाचे आलेख सादर करणारे हे ग्रंथभांडार. भारतात क्रीडासंस्कृती रुजायची आहे, म्हणून या खजिन्याचं, ग्रंथभांडाराचं महत्त्व अधिकच.
तुमच्या मनात एक प्रश्न स्वाभाविक येत असेल. खेळासारख्या विषयावर लाख लाख पुस्तकं प्रसिद्ध झालेली आहेत? खरंच?
याविषयी काही प्राथमिक माहिती सांगतो : मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या कांगा वाचनालयात उपलब्ध असलेल्या (आणि गायब झालेल्या व वाळवी लागून खराब झालेल्या) पुस्तकांची संख्या सात-आठ हजारांच्या घरात जाते. ही पुस्तकं मुख्यत: क्रिकेटची, जुन्या जमान्यातील फुटबॉलची व बुद्धिबळाची.  
आणखी काही प्राथमिक माहिती : अलीकडच्या इंग्लिश संघातील केविन पीटरसन, अॅण्ड्रय़ू स्ट्राऊस, फ्लिंटॉफ, ग्रॅम स्वान, मॉण्टी ऊर्फ मधसुदन पानेसर आदींची आत्मचरित्रं प्रसिद्ध झालेली आहेत. तीच गोष्ट ऑस्ट्रेलियातील मॅथ्यू हेडन, अॅडम गीलािस्ट, जस्टीन लँगर, इयन हिली, ग्लेन मॅग्रा, अॅलन बॉर्डर प्रभूतींची. स्टीव्ह वॉ, रिकी पॉण्टिंग व शेन वॉर्न यांनी स्वत: व इतरांनी त्यांच्याविषयी विपुल लेखन केले आहे.
शेजारी पाकिस्तानमधील इमरान खान, झहीर अब्बास, जावेद मियाँदाद व वसीम अक्रम यांची पुस्तकं तर सुरेखच आहेत. भारतात सुनील गावसकर यांच्या पुस्तक मालिकेखेरीज विजय हजारे, मन्सूरअली पतौडी, अजित वाडेकर, प्रसन्ना आणि काहीसे अधिकच मनापासून लिहिणारे कपिलदेव निखंज यांची आत्मचरित्रंही वाचकांच्या ज्ञानात, जाणकारीत थोडीफार भर टाकणारी. या सर्वापेक्षा फटकळ आत्मकथन भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे माजी सचिव जयवंत लेले यांचे.
क्रिकेटपुरतं बोलायचं तर डॉन ब्रॅडमन, जॅक हॉब्स, 364 धावांचा तेव्हाचा विश्वविक्रम उभारणारे लेन हटन, कांगारू लेगस्पिनर बिल ओरॅली, मॅक फिंगलटन, अष्टपैलू वेस्ट इंडियन्स लियरी कॉन्स्टन्टाईन व गॅरी सोबर्स यांचे लेखन अधिकारवाणीचे तसेच नेव्हील कार्ड्स ते पीटर रोबक आदींचे समीक्षणही रंजक.
डॉन ब्रॅडमनच्या हुकुमी फटकेबाजीला रोखण्यासाठी इंग्लंडच्या डग्लस जारडीनने, हेरॉल्ड लारवूड व डावखुरा बील व्होस (पान कक वर) 
 
बॉब बोमेन यांचं पट्टशिष्याला शिकवायचं तंत्र कसं होतं? विश्वविक्रमी फेल्प्स वाचकांना त्याबाबत विश्वासात घेतो. ‘बटरफ्लाय शैलीच्या तीनहजार मीटर्स म्हणजे दोन मैल जलतरण पोहोण्यापासून सुरुवात झाली. आस्ते आस्ते बॉब फ्री स्टाईल शैलीचे 12 हजार मीटर्स (सुमारे सात मैल) करवून घेऊ लागले. त्याची उकल अशी : एकदा 8क्क् मीटर्स, मग दोनदा 7क्क्, मग तीनदा 6क्क्, चारदा 5क्क्, पाचदा 4क्क्, सहादा 3क्क्, सातदा 2क्क् व आठदा 1क्क् मीटर्स असे तब्बल 12 हजार मीटर्स!’
 
- वि. वि. करमरकर
 

 

Web Title: Alphabetical grounds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.