शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

अग्रलेख: उसाची एआय शेती! उत्पादनामध्ये ३० टक्के वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2025 08:13 IST

एआय तंत्रज्ञानाने अनेक गोष्टी सोप्या झाल्या आहेत, अचूकता आली आहे.

नीलेश नलावडे, तुषार जाधव कृषी विज्ञान केंद्र, बारामती

एआय... आर्टिफिशल इंटेलिजन्स अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता. मानवी जीवनाच्या सर्व क्षेत्रात आज ‘एआय’चा शिरकाव झाला आहे. एआय तंत्रज्ञानाने अनेक गोष्टी सोप्या झाल्या आहेत, अचूकता आली आहे. शेतीतही एआय तंत्रज्ञानाचा वापर सुरू झाला आहे. महाराष्ट्र त्यात आघाडीवर आहे. ऊसाची शेतीही आता एआय तंत्रज्ञानावर करण्याचे युग अवतरले आहे. ॲग्रिकल्चर डेव्हेलोपमेंट ट्रस्ट, बारामती यांच्या मार्गदर्शनानुसार काही शेतकऱ्यांनी एआयवर उसाची शेती सुरू केली आहे. त्याचे निष्कर्ष खूपच चांगले आहेत. 

एआय म्हणजे मानवी बुद्धिमत्तेचे अनुकरण करणारी संगणकीय प्रणाली. त्यात शिकण्याची, विचार करण्याची, निर्णय घेण्याची आणि समस्या सोडवण्याची क्षमता असते. एआय केवळ एक तंत्रज्ञान नाही, तर मानवी जीवनात परिवर्तन घडवणारी शक्ती आहे. ती आपली भविष्यातील साथीदार ठरू शकते. एआयची सुरुवात १९५० साली अमेरिकेत झाली. संगणक वैज्ञानिक ॲलन ट्यूरिंग यांनी मशीन विचार करू शकते का? या प्रश्नावर आधारित संशोधनाला सुरुवात केली. त्यातून एआयचा जन्म झाला. 

एआयची कार्यपद्धतीड्रोन, सेन्सरमार्फत जमीन, पीक आणि हवामानातील घटकाची माहिती संकलित केली जाते. मागील अनेक वर्षांतील पारंपरिक पद्धतीने एकत्रित केलेल्या माहितीचे विश्लेषण केले जाते. एआय तंत्रज्ञानाने विश्लेषित केलेल्या आणि नकाशावरून हवामान, पीक उत्पादन, रोग व किडींचा प्रादुर्भाव यांचा अचूक अंदाज येतो. मोबाइलद्वारे किंवा ड्रोनद्वारे पिकांच्या घेतलेल्या फोटोवरून रोग व कीड तसेच अन्नद्रव्य कमतरतेची अचूक माहिती मिळते.

एआयमुळे होणारे फायदे- पेरणीची वेळ ठरवता येते.- अचूक पाणी व्यवस्थापन करता येते.- हवामानानुसार संभाव्य रोगांची माहिती मिळते, त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय करता येतात. योग्य हवामानानुसार ऊस शेतीचे नियोजन करता येते. - पूर, दुष्काळ या आपत्तींसाठी पूर्वसूचना मिळते.- उसाच्या उत्पादन खर्चात बचत होते. अनावश्यक खते, पाणी, संसाधने वाचतात. - एआय आणि अचूक उपग्रह नकाशा प्रणालीच्या साहाय्याने ऊस शेतीच्या उत्पादनात  ३५% ते ४०% पर्यंत वाढ मिळते.- मातीतील पाण्याचे प्रमाण योग्य राखण्यास मदत.- शेतकऱ्यांना प्रती टन २०० रुपयांपर्यंत अधिकचा नफा मिळण्यास मदत होईल.

एआय ठरले गेम चेंजर- एआय तंत्रज्ञानाच्या वापरामुळे उत्पादनामध्ये वाढ- महाराष्ट्रात ऊस उत्पादनातून मिळणारे एकूण उत्पन्न : ३०,००० कोटी ते ३५,००० कोटी - एआयमुळे उत्पादनामध्ये ३०% वाढ : अपेक्षित उत्पन्न : ४५,००० कोटी रुपये

टॅग्स :sugarcaneऊसMaharashtraमहाराष्ट्र