शहरं
Join us  
Trending Stories
1
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; उपराज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
2
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
3
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
4
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
5
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
6
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
7
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
8
मुंबई इंडियन्सच्या संघात अंशुल कंबोजची एन्ट्री! टॉस जिंकून २३ वर्षीय ऑल राऊंडरला दिली संधी, जाणून घ्या कोण आहे तो
9
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
10
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
11
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
12
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
13
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
14
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
15
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
16
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
17
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
18
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
19
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
20
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"

प्लॅस्टिकबंदीनंतर आता कारबंदी?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 02, 2018 6:24 AM

आता प्लॅस्टिक आणि फटाक्यांनंतर नजीकच्या भविष्यात आपल्याला कारबंदीलाही सामोरं जावं लागल्यास आश्चर्य वाटायला नको.

- हेमंत लागवणकर‘जीडीपीमध्ये वाढ म्हणजे विकास’, अशी जर व्याख्या असेल तर विकास म्हणजे निसर्गावर, पर्यावरणावर केलेला हल्ला असंच चित्र आज जगभरातून आढळतं. कारण, उत्पादकता वाढवायची असेल तर त्यासाठी लागणारा कच्चा माल निसर्गातूनच मिळवला जातो. पर्यावरणाचा समतोल राखून जर विकास साधायचा असेल तर कदाचित जीडीपीवाढीच्या दरात काही प्रमाणात एक तर तडजोड करावी लागेल; किंवा आपल्या जीवनशैलीमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणावा लागेल. पण विकास आणि पर्यावरण समतोल यातली सीमारेषा अत्यंत धूसर आहे.वाढता विकास आणि चंगळवादी जीवनशैली यांची युती झाल्यामुळेसुद्धा आपल्याला अनेक वाईट परिणामांना सामोरं जावं लागत आहे. चंगळवादी जीवनशैली अंगात भिनल्यामुळे आलेली बेफिकीर वृत्तीही अनेकदा आपल्याला अडचणीत आणते. यासंदर्भात प्लॅस्टिकबंदीचं उदाहरण पुरेसं बोलकं आहे.गेल्या दोन ते तीन दशकांपासून आपलं जीवन अक्षरश: व्यापून टाकणाऱ्या प्लॅस्टिकला आपल्या जीवनातून हद्दपार करण्यासाठी कारणीभूत ठरला तो त्याचा नैसर्गिकरीत्या अविघटनशील असलेला गुणधर्म. दोष प्लॅस्टिकचा नाही; तर दोष आपल्या सदोष कचरा व्यवस्थापनाचा आणि बेफिकीर वृत्तीचा आहे. जगभरातून दरवर्षी साधारण ऐंशी लाख टन प्लॅस्टिक वापरलं जातं आणि त्यातलं बरंचसं प्लॅस्टिक वापरून झाल्यावर जातं समुद्रामध्ये! याच वेगाने जर समुद्रात आपण प्लॅस्टिक ढकलत राहिलो तर २०५० सालापर्यंत जगभराच्या समुद्रामध्ये मासे आणि इतर जलचरांपेक्षा प्लॅस्टिकचं प्रमाण जास्त असेल.या सगळ्याचा व्हायचा तो परिणाम झाला आणि शेवटी प्लॅस्टिकबंदी करावी लागली. आता आणखी एक बंदी आपल्या अगदी उंबरठ्यापर्यंत येऊन ठेपली आहे; ती म्हणजे ‘कारबंदी’! स्पेन सरकारने माद्रीद या राजधानीच्या मध्यवर्ती भागात तिथे राहणाºया रहिवाशांच्या मोटारगाड्यांशिवाय इतर मोटारगाड्यांना या महिन्यापासून बंदी केली आहे. या बंदीमागचं मुख्य कारण आहे, वाहनांमुळे होणारं हवाप्रदूषण! पण या बंदीमुळे तिथल्या नागरिकांना जसा मोकळा श्वास घ्यायला मिळणार आहे, तशी फिरण्यासाठी मोकळी जागाही मिळणार आहे. अर्थात, अशी बंदी अमलात आणणारं माद्रीद हे काही पहिलं उदाहरण नाही. कोपनहेगन, ब्रुसेल्स, म्युनिच या शहरांमध्ये अशा प्रकारची बंदी यापूर्वीच लागू करण्यात आली आहे.जर्मनीतल्या हॅम्बुर्ग शहरातल्या हवेमध्ये नायट्रोजन डायआॅक्साइडचं प्रमाण प्रति घनमीटर ४० मायक्रोग्रॅम या युरोपियन कमिशनने ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा नेहमीच जास्त आढळत होतं. त्यामुळे या शहरात हवाप्रदूषण रोखण्यासाठी डिझेलवर चालणाºया मोटारगाड्यांना बंदी घालण्यात आली आहे. आॅक्टोबर महिन्यापासून फ्रान्सच्या राजधानीत, पॅरिसमधील मध्यवर्ती भागात दर महिन्याच्या पहिल्या रविवारी मोटारगाड्यांना बंदी घालण्यात आली आहे. हवाप्रदूषण आटोक्यात आणण्यासाठी २०२० सालापासून लंडनमध्ये डिझेलवर चालणाºया गाड्यांवर बंदी आणण्याचा विचार गांभीर्याने केला जातो आहे. म्हणूनच आता प्लॅस्टिक आणि फटाक्यांनंतर नजीकच्या भविष्यात आपल्याला कारबंदीलाही सामोरं जावं लागल्यास आश्चर्य वाटायला नको.(लेखक विज्ञान प्रसारक आहेत) 

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदीcarकारpollutionप्रदूषण