शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

जि.प. व पं.स.च्या ४५ सदस्यांचे सदस्यत्व रद्द, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश, राज्य निवडणूक आयोगाचे जिल्हा प्रशासनाला पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:33 IST

धुळे - जिल्हा परिषद निवडणुकीतील आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेचा निकाल ४ मार्च रोजी जाहीर झाला. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार ...

धुळे - जिल्हा परिषद निवडणुकीतील आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेचा निकाल ४ मार्च रोजी जाहीर झाला. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार जिल्हा परिषदेच्या १५ आणि धुळे पंचायत समितीच्या ८, शिरपूर ८, शिंदखेडा ५ आणि साक्री पंचायत समितीच्या ९ जागेवर नागरिकांच्या मागासवर्गातून निवडून आलेल्या सदस्यांचे सदस्यत्व ४ मार्चपासून रद्द करण्यात आले आहे. संबंधितांना ९ मार्चपर्यंत हे आदेश बजावून त्याचा अहवाल ९ मार्चला सदर करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने पत्राद्वारे जिल्हा प्रशासनाला दिले आहे. पत्रात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार या रिक्त पदाच्या निवडणुकीबाबत आयोगाकडून स्वतंत्रपणे कार्यक्रम देण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे जिल्हा परिषद पाठोपाठ पंचायत समितीसुद्धा राजकीय खळबळ उडाली आहे.

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या आरक्षणसंदर्भात दाखल याचिकेच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले आहे. आदेशाची अंमलबजावणी करण्यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा प्रशासनाला पाठविलेले पत्र शुक्रवारी सायंकाळी प्राप्त झाले आहे. त्या आदेशानुसार जिल्हा निवडणूक कार्यालयातर्फे सदस्यत्व रद्द झालेल्या जिल्हा परिषद आणि चारही पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांना सर्वोच्च न्यायालयाचे आदेश ९ मार्चपर्यंत बजाविण्याची कारवाई सुरू झाली आहे. सोमवारी त्याची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे.

जिल्हा परिषद - जिल्हा परिषदेत धुळे व शिंदखेडा तालुक्यातून नागरिकांच्या मागास प्रवर्ग गटातून निवडून आलेले १५ सदस्यांचे सदस्यत्व यातून रद्द होणार आहे. त्यात धुळे तालुक्यातील ११ आणि शिंदखेडा तालुक्यातील ४ गटांचा समावेश आहे.

पंचायत समिती - सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्ह्यातील चारही पंचायत समितीतील ३० सदस्यांचे सदस्यत्व रद्द होणार आहे. त्यात धुळे पंचायत समितीतील ८, साक्री पं.स.९, शिंदखेडा पं.स ५ आणि शिरपूर पंचायत समितीच्या ८ सदस्यांचे सदस्यत्व रद्द होणार आहे.