शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

लाॅकडाऊनमध्ये गावात परतलेले तरुण रोजगार हमी योजनेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 22:33 IST

ग्रामीण भागातील चित्र : महानगरांमध्ये पुन्हा मिळाला रोजगार, रोहयोची कामे घटली

धुळे : कोरोना आणि लाॅकडाऊनमुळे भल्याभल्यांचे अर्थचक्र थांबले होते. महानगरात मिळालेले काम बंद झाल्याने गावाकडे परतलेल्या तरुणांसह अनेक कुटूंबे शेतीकामासह रोजगार हमी योजनेच्या कामावर काम करताना दिसली. सुदैवाने आता परिस्थिती रुळावर आली आहे.ग्रामीण भागातील अनेक कुटूंबे रोजगारासाठी मुंबई, पुणे, नाशिक, सुरत, अहमदाबाद अशा शहरांमध्ये स्थलांतरीत झाली होती. पंरतु लाॅकडाऊनमुळे उद्योग, व्यवसाय ठप्प झाल्याने रोजगार बंद पडला. पुन्हा कधी सुरू होईल याची कल्पना नसल्याने ही कुटूंबे आणि तरुणही गावाकडे परतले. बेरोजगार झालेल्या या तरुणांना गावात रोजगार हमी योजनेत काम मिळाले. तर कुटूंबातील महिला शेतशिवारांमध्ये काम करताना दिसल्या. लाॅकडाऊन काळात हे चित्र सर्वत्र सारखे होते आणि ग्रामीण भागामध्ये हा विषय अतीशय चर्चेचा ठरला होता. प्रशासनाने रोजगार हमी योजनेची कामे वाढविल्याने या तरुणांना रोजगार मिळाला.दरम्यान, शासनाने अनलाॅक केल्यापासून उद्योग, व्यवसाय सुरू झाले आहेत. अनेकांना पुन्हा रोजगार मिळाला आहे. गावी आलेले तरुण आणि इतर कुटूंबे पुन्हा शहरात परतली आहेत. त्यामुळे रोजगार हमी योजनेची कामे सध्या कमी झाली आहेत. परंतु ज्यांना अजुनही रोजगार मिळाला नाही त्यांना याच कामांचा दिलासा आहे.वर्षात रोहयोची कामे वाढली लाॅकडाऊनमुळे ग्रामीण भागातील असंख्य कामगार गावाकडे परतले होते. अशा परिस्थितीत त्यांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने रोहयोची कामे सुरू केली होती. मे २०२० मध्ये २४३१ कामांवर ११ हजार ८०० मजूर होते तर जूनमध्ये पावसाळा लागल्याने कामांची संख्या १३४७ वर आली होती. त्यावेळी ६८३२ मजूर कामावर होते. गेल्या वर्र्षीच्या तुलनेत हा आकडा मोठा आहे. पंरतु आता नोव्हेंबरमध्ये केवळ २६५ कामे आहेत.गावात काम नसल्याने गुजरातमधील सुरत शहरात चांगले काम मिळाले होते. लाॅकडाऊनमध्ये काम बंद झाल्याने पुन्हा गावाकडे परतलो. गावात आल्यावर रोजगार हमी योजनेत काम मिळाले. त्यामुळे लाॅकडाऊनमध्ये पोटापाण्याचा प्रश्न सुटला.  - सोमनाथ सोनवणे, रोहयो कामगार,लाॅकडाऊनमध्ये कुणीही बेरोजगार राहू नये अशा सूचना शासनाने दिल्या होत्या. त्यानुसार जिल्ह्यात रोहयो कामांची संख्या वाढविण्यात आली. मागेल त्याला काम देण्याचे नियोजन प्रशासनाने केले होते. परंतु आता शहरांमध्ये पुन्हा रोजगार मिळाल्याने मजुर कमी झाले आहेत.- गोविंद दाणेज, उपजिल्हाधिकारी, रोहयो

टॅग्स :Dhuleधुळे