नगाबारी परिसरात महिलांचा काँग्रेस पक्षात प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 23:23 IST2020-02-25T23:22:44+5:302020-02-25T23:23:07+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क धुळे : गाव तेथे महिला काँग्रेस प्रवेश मेळावा या अभियानांतर्गत देवपूरातील नगावबारी भागातील महिलांनी काँग्रेस पक्षात ...

dhule
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : गाव तेथे महिला काँग्रेस प्रवेश मेळावा या अभियानांतर्गत देवपूरातील नगावबारी भागातील महिलांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला़
काँग्रेस पक्ष महिला आघाडीच्या धुळे शहर जिल्हाध्यक्षा वाणुबाई शिरसाठ यांनी या मेळाव्याचे आयोजन केले होते़ पक्षाचे शहराध्यक्ष युवराज करनकाळ अध्यक्षस्थानी होते़ महिला काँग्रेसच्या प्रदेश सल्लागार विमल बेडसे, माजी नगरसेवक मुजफ्फर हुसैन, शिंदखेड्याच्या तालुकाध्यक्षा छाया पवार, उपाध्यक्षा भावना पवार, रमेश फुलपगारे, सुकलाल गिरासे, जोशी, इंताज पिंजारी, शोभा चौधरी, तारा फुलपगारे, जयश्री खलाणे, रंजना साबळे, दवरे, लिला बागुल, रिना अवसरमल, प्रमिला पगारे, शांता राठोड, सकुबाई कोळी, संदल पिंजारी, मुन्नी पाटील, शोभा आखाडे, खटाबाई गिरासे, छाया बडगुजर, वैशाली बडगुजर उपस्थित होत्या़
काँग्रेस हा सर्वधर्म समभाव मानणारा पक्ष असून वाणूबाई शिरसाठ यांनी सुरू केलेले पक्ष संघटनाचे कार्य कौतुकास्पद आहे़ त्यांच्यामुळे काँग्रेस पक्षात महिला कार्यकर्त्यांची संख्या वाढत असल्याचे समाधान काँग्रेसचे महानगर जिल्हाध्यक्ष युवराज करनकाळ यांनी व्यक्त केले. यावेळी अन्य मान्यवरांनीही उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले.