ट्रालाच्या चाकात आल्याने महिला जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2019 12:25 IST2019-06-02T12:24:59+5:302019-06-02T12:25:52+5:30
पिंपळनेर : सटाणा रस्त्यावरील घटना, ग्रामस्थांत संताप

ट्रालाच्या चाकात आल्याने महिला जागीच ठार
लोकमत आॅनलाईन
पिंपळनेर : पिंपळनेर-सटाणा रस्त्यावरील अतिक्रमणामुळे एका महिलेला प्राण गमवावे लागले़
शनिवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास चेतन मेडिकलसमोर शोभाबाई भालचंद्र ततार (६०) यांचा ट्रॉलाच्या पुढच्या चाकात दबून जागीच मृत्यू झाल्याने एकच हळहळ व्यक्त केली जात आहे. पिंपळनेर बसस्थानक चौफुली ते सटाणा रस्त्यावर मयत शोभाबाई ततार यांच्या मुलाचे चेतन मेडिकल दुकान आहे़ दुपारी एक वाजता मुलाला जेवण्यासाठी सोडायला शोभाबाई मेडिकलवर आल्या़. मुलगा जेवण करून मेडिकलवर आल्यावर शोभाबाई या परत घरी पायी जात असताना सटाणा रस्त्याकडून भरधाव वेगाने येणा-या ट्रॉलाने शोभाबाई यांना धडक दिली़. यात त्या पुढच्या चाकात आल्याने शोभाबाई यांच्या अंगावरून ट्राला गेला़ त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला़ मुलगा चेतन व स्थानिक नागरिकांनी त्यांना जवळच्या खासगी रुग्णालयात नेले़ डॉ. खैरनार यांनी त्यांना मृत घोषित केले़ शहरात वाढणारे अतिक्रमण आणि स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष यामुळे ही दुर्घटना घडल्याची चर्चा परिसरात सुरु आहे़ त्यांच्या या अपघाती निधनाने पिंपळनेर शहरात हळहळ तसेच संताप व्यक्त होत आहे.