शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

व्हीलचेअर नावालाच, दिव्यांग, ज्येष्ठांची बसस्थानकात कसरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:43 IST

लोकमत न्यूज नेटवर्क धुळे : येथील बसस्थानकात व्हीलचेअर नावालाच असल्याचे चित्र आहे. बसस्थानकातील नियंत्रण कक्षात व्हीलचेअर उपलब्ध आहे. मात्र, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

धुळे : येथील बसस्थानकात व्हीलचेअर नावालाच असल्याचे चित्र आहे. बसस्थानकातील नियंत्रण कक्षात व्हीलचेअर उपलब्ध आहे. मात्र, त्याबाबत दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांना माहितीच नसल्याचे ‘लोकमत’च्या पाहणीत आढळले. धुळे बसस्थानकात दिवसभर प्रवाशांची वर्दळ असते. ६००पेक्षा अधिक बसेस या बसस्थानकावरुन ये - जा करतात. धुळे शहरातून महत्त्वाचे दोन महामार्ग जातात. तसेच दोन राज्यांच्या सीमा या जिल्ह्याला लागून आहेत. त्यामुळे दळणवळणाच्या दृष्टीने जिल्ह्याचे महत्वाचे स्थान आहे. येथील बसस्थानकातून इतर राज्यात जाणाऱ्या बसेसची संख्याही मोठी आहे. तसेच येथून इतर शहरात दररोज ये - जा करणाऱ्या प्रवाशांची संख्याही लक्षणीय आहे. त्यात दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांचाही समावेश आहे.

बसस्थानकात रॅम्प उभारण्यात आला असून, त्याचा दिव्यांगांना उपयोग होत आहे. तसेच रोटरी क्लबकडून व्हीलचेअरही उपलब्ध करून देण्यात आली आहे. स्थानकातील नियंत्रण कक्षात व्हीलचेअर ठेवण्यात आली आहे. दिव्यांग प्रवाशांनी मागणी केली तर व्हीलचेअर उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती मिळाली. मात्र, बहुतेक दिव्यांग प्रवाशांना बसस्थानकात व्हीलचेअर उपलब्ध असल्याबाबत माहिती नाही. त्यामुळे त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. व्हीलचेअर उपलब्ध असल्याबाबतचा फलक बसस्थानकात लावण्याची गरज आहे. त्यामुळे दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांना दिलासा मिळू शकतो.

व्हीलचेअर नियंत्रण कक्षात

बसस्थानकात व्हीलचेअर उपलब्ध आहे. मात्र, दिव्यांग प्रवाशांना त्याबाबत माहिती नाही. नियंत्रण कक्षात व्हीलचेअर ठेवण्यात आल्याची माहिती मिळाली. व्हीलचेअर असूनही दिव्यांगांना त्रास सहन करावा लागत आहे. व्हीलचेअर उपलब्ध असल्याबाबत माहिती देणे गरजेचे आहे.

रॅम्प उभारला

बसस्थानकात रॅम्प उभारण्यात आला आहे. मात्र, तो कोपऱ्यात असल्यामुळे बऱ्याच प्रवाशांना त्याचा लाभ घेता येत नाही. तसेच रॅम्पजवळच पडलेल्या लोखंडी पाईपमुळे अडथळा निर्माण झाला आहे. जवळच दुचाकी लावण्यात येत असल्याने रॅम्पचा वापर करणे कठीण जाते.

प्रतिक्रिया -

रॅम्प कोपऱ्यात असल्यामुळे त्याकडे लक्ष जात नाही. रॅम्प दर्शनी भागात केला असता तर ज्येष्ठ नागरिकांना जास्त मदत झाली असती. मला माहीत असल्याने नियमित रॅम्पचा वापर करते.

- कमल बोरसे, ज्येष्ठ नागरिक

व्हीलचेअरबाबत कोणतीही माहिती नाही. धुळे बसस्थानकातून जळगाव येथे नियमित ये - जा करत असतो. व्हीलचेअर मिळाली तर त्रास कमी होईल. रॅम्प असलेल्या ठिकाणी व्हीलचेअर उपलब्ध करावी.

- सुरेश पाटील, दिव्यांग

बसस्थानकात रॅम्प उभारण्यात आला आहे. दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक त्याचा वापर करतात. तसेच रोटरी क्लबकडून व्हीलचेअर प्राप्त झाली आहे. नियंत्रण कक्षात व्हीलचेअर उपलब्ध असते. मागणी केल्यानंतर दिव्यांगाना व्हीलचेअर दिली जाते. दिव्यांग बांधवांना त्याचा फायदा होतो.

- अनुजा दुसाने,

आगारप्रमुख