घोषणेचे काय झाले ? बहुसंख्य बांधकाम मजुरांना एका पैशाचीही मदत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:38 AM2021-05-08T04:38:05+5:302021-05-08T04:38:05+5:30

धुळे - लॉकडाऊनच्या काळात बांधकाम मजुरांना दीड हजार रुपयांची मदत केली जाईल, अशी घोषणा राज्य शासनाने केली होती. मात्र, ...

What happened to the announcement? The majority of construction workers do not get a single penny of help | घोषणेचे काय झाले ? बहुसंख्य बांधकाम मजुरांना एका पैशाचीही मदत नाही

घोषणेचे काय झाले ? बहुसंख्य बांधकाम मजुरांना एका पैशाचीही मदत नाही

Next

धुळे - लॉकडाऊनच्या काळात बांधकाम मजुरांना दीड हजार रुपयांची मदत केली जाईल, अशी घोषणा राज्य शासनाने केली होती. मात्र, कोणतीही मदत मिळाली नसल्याच्या तक्रारी बांधकाम कामगारांनी केल्या आहेत. मदतीची रक्कम थेट कामगारांच्या खात्यात जमा होत असते. त्यामुळे जिल्ह्यातील किती कामगारांना मदत मिळाली, त्याची माहिती नसल्याचे कामगार अधिकारी अ. ज. रुईकर यांनी सांगितले.

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर निर्बंध कडक करण्यात आले होते. बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने लॉकडाऊनची चर्चा सुरू झाली होती. त्यावेळी हातावर पोट असणाऱ्या अनेक कामगारांनी विरोध केला होता. कामगारांना आर्थिक मदतीची हमी देत शासनाने लॉकडाऊन लावला. जिल्ह्यातील काही कामगारांच्या खात्यात रक्कम जमा झाली आहे. मात्र, बहुसंख्य कामगारांनी खात्यात दीड हजार रुपये जमा झाले नसल्याच्या तक्रारी केल्या आहेत. कामगारांची माहिती शासनाकडे पाठविली असून थेट त्यांच्या खात्यात रक्कम जमा होत असल्याने आतापर्यंत किती कामगारांना मदत मिळाली, त्याचा तपशील नसल्याचे कामगार कार्यालयाकडून सांगण्यात आले.

जगायचे कसे ?

सध्या लॉकडाऊन असल्याने काम बंद आहे. त्यामुळे कसे जगायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाकडे बांधकाम कामगार म्हणून नोंदणी केली आहे. आवश्यक कागदपत्रे जमा केली आहेत. दीड हजार रुपये देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, आतापर्यंत कोणतीही मदत मिळालेली नाही.

- भीमसिंग लोधी

सध्या काम बंद असल्याने हाल होत आहेत. दोनवेळच्या अन्नासाठी काय करायचे, असा प्रश्न पडतो आहे. शासनातर्फे कोणतीही मदत मिळालेली नाही. खात्यात पैसे जमा झाले किंवा नाही ते पाहण्यासाठी बँकेत चकरा मारत आहे. मात्र, खात्यात पैसे जमा झालेले नाहीत. शासनाने मदत करावी किंवा लॉकडाऊन उठवावे.

- सुभाष चौरे

दीड हजार रुपयांची मदत तोकडी आहे. मात्र, तीदेखील मिळत नाही. काम बंद असल्याने बांधकाम कामगारांची उपासमार होत आहे. त्यांना केवळ गहू, तांदूळ नव्हे तर साखर, मीठ यासह संपूर्ण किराणा शासनाने द्यावा. केरळ, झारखंड येथील शासन अशाप्रकारची मदत करत आहे. यासाठी केंद्र शासनाने राज्य शासनाला सहकार्य केले पाहिजे.

- डॉ. एल.आर राव, अध्यक्ष सिटू कामगार संघटना

नोंदणीकृत कामगारांची माहिती शासनाकडे पाठविली आहे. थेट त्यांच्या खात्यात रक्कम जमा होत असल्याने आतापर्यंत किती कामगारांना रक्कम मिळाली त्याची माहिती उपलब्ध नाही. मात्र, मदत मिळाल्याची माहिती अनेक कामगारांनी दिली. काही कामगारांच्या कागदपत्रांमध्ये त्रुटी होत्या. त्याची पूर्तता केली आहे. त्यांनाही लवकरच मदत मिळेल.

- अ. ज. रुईकर, कामगार अधिकारी

नोंदणी केलेले बांधकाम मजूर - ८४२९

नोंदणी न केलेले बांधकाम मजूर - २११५६

Web Title: What happened to the announcement? The majority of construction workers do not get a single penny of help

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.