शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

उपनिरीक्षक झालेल्या कन्येचे गावातर्फे स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2019 11:33 IST

महिला दिनाचे औचित्य : शिंदखेडा तालुक्यातील अलाणेकरांचा प्रेरणादायी उपक्रम

शिंदखेडा : तालुक्यातील अलाने येथील सर्वसामान्य कुटुंबातील मोनिया कोमलसिंग गिरासे ही तरुणी पोलीस उपनिरीक्षक पदासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या परीक्षेत उत्तीर्ण झाली. तिची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल अलाने ग्रामस्थांकडून गावाच्या वेशीवर जाऊन तिची सजविलेल्या घोड्यावर बसवून व ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. तसेच घरोघरी औक्षण करून जंगी स्वागत करण्यात आले.या प्रसंगी गावातील महिला व पुरुषांसह पंचक्रोशीतील हजारो नागरिक उपस्थित होते. अलाणे या छोट्याशा खेडेगावात अभ्यासाला पोषक वातावरण नसतानाही केवळ दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर मोनिया कोमलसिंग गिरासे या तरुणीने पोलीस उपनिरीक्षक पदाची परीक्षा उत्तीर्ण केली. तिचे प्राथमिक शिक्षण अलाने गावातच जिल्हा परिषदेच्या शाळेत तर माध्यमिक शिक्षण चिरणे येथील यशवंत विद्यालयात झाले. १२ वीचे शिक्षण शहरातील एसएसव्हीपीएस कनिष्ठ महाविद्यालयात झाले. पदवी तिथेच यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून प्राप्त केली. स्पर्धा परीक्षेसाठी तिने जळगाव येथील खाजगी क्लासला प्रवेश घेतला होता.जागतिक महिला दिनाच्या दिवशी तिचा आॅनलाईन निकाल लागला.ही वार्ता तिच्या आईवडील व अलाने गावकऱ्यांना समजताच गावातील सर्वांनी तिचे अभिनंदन केले. शुक्रवारी ती बाहेरगावी गेली होती. शनिवारी सकाळी १० वाजता ती गावी परतली असता ग्रामस्थांनी तिला अलाने फाट्यावर जाऊन तिला सजवलेल्या घोड्यावर बसवून वाजतगाजत गावात आणले.गावात प्रत्येक घरून तिचे औक्षण करून स्वागत करण्यात आले. नंतर एका छोटेखानी कार्यक्रमात नातेवाईक व पंचक्रोशीतील विविध मान्यवरांनी तिचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. या वेळी तिच्या सोबत तिची आई देवकोरबाई, वडील कोमलसिंग गिरासे उपस्थित होते. मुलीचा होत असलेला आदर-सत्कार पाहून तिच्या आईवडिलांसह भाऊ संग्रामसिंग यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू तरळले. उपस्थितांचे डोळेही पाणावले होते.

टॅग्स :Dhuleधुळे