शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
2
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
3
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
4
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
5
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
6
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
7
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
8
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
9
भोंदू अशोक खरातला सातव्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी; आठव्या गुन्ह्यात SIT ने घेतला ताबा
10
पश्चिम बंगाल निवडणुकीत मोठा राडा, ईव्हीएमवरील भाजपच्या बटणावर 'टेप'! मतदान थांबलं, आयोगाकडून फेरमतदानाचे संकेत
11
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
12
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
13
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
14
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
15
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
16
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
17
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
18
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
19
लग्नाला नकार दिल्याच्या रागातून प्रेयसीसह तिच्या आईची हत्या; दुहेरी हत्याकांडाने विरार हादरले
20
आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे आईसह बाळाला जीवनदान; कल्याण रेल्वे स्थानकावरील घटना
Daily Top 2Weekly Top 5

आम्ही मटनावर ताव मारलेलाच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2020 12:47 IST

जि.प.सभेनंतरची मटन पार्टी : अनेक सदस्यांची सावरासावर सुरू, विरोधी गटाने साधला निशाणा

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभे दरम्यान काही सदस्यांनी ऐन श्रावणात व ज्या दिवशी श्रीराम मंदिराचे भूमिपूजन होत होते, त्याचदिवशी मटनावर ताव मारल्याचे माध्यमांमध्ये प्रसिद्ध होताच, सदस्यांवर टीका होऊ लागली. त्यामुळे मटन रिचविणाऱ्या सदस्यांनी आता सावध पवित्रा घेतला आहे. आम्ही मटनावर ताव मारलाच नाही असे काही सदस्य सांगत आहे. त्यांनी मटन खाल्ले नाही तर तीन बोकडांचे मटन कोणाच्या पोटात गेले असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होऊ लागला आहे.जिल्हा परिषदेत प्रथमच भाजपची स्वबळावर सत्ता आलेली आहे. कोरोनाचे कारण पुढे करीत जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा प्रथमच जि.प. आवाराच्या बाहेर झाली. शहरापासून लांब होत असलेल्या सभेमुळे सत्ताधारी पक्षातील काही सदस्यांना मटनावर ताव मारण्याचा मोह आवरता आला नाही. यासाठी तीन बोकडांची कुर्बानी देण्यात आली. मटनावर ताव मारत असतांना सत्ताधारी पक्षातील काही सदस्यांना श्रावणाचा व ज्या दिवशी अयोध्येत श्रीराम मंदिराचे भूमिपूजन होत आहे, त्या पवित्र दिवसाचाही विसर पडला.सदस्यांनी मटन रिचवल्याचे वृत्त सोशल मीडियामध्ये व्हायरल होताच, अशा सदस्यांवर टीका सुरू झाली. अनेकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. काहींनी तर त्यांनी पक्षाच्या नितीमुल्याचीही आठवण करून दिली. मटन खाऊन प्रभू श्रीराम यांची प्रतिमा पूजन करणे म्हणजे किळसवाणा प्रकार आहे अशा प्रतिक्रियाही उमटू लागल्या आहेत. माध्यमांमध्ये होत असलेल्या टीकेनंतर यातील काही सदस्यांना पश्चातापाची उपरती येऊ लागली आहे. तर काहींना याबाबत विचारणा केली असता, पवित्र श्रावण महिन्यात आम्ही मटन खाल्लेच नाही असा पवित्रा काहींनी घेऊन कानावर हात ठेवले आहे. सदस्यांनी मटन खाल्ले नाही तर तीन बोकडांचे मटन कोणाच्या पोटात गेले असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होऊ लागला आहे.