धुळे जिल्ह्यातील अमरावती प्रकल्प ‘ओव्हरफ्लो’च्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2020 12:12 PM2020-09-24T12:12:13+5:302020-09-24T12:12:39+5:30

प्रकल्पामुळे धुळे-नंदुरबार जिल्ह्यातील २६०६ हेक्टर जमीन ओलिताखाली

On the way to Amravati project 'overflow' in Dhule district | धुळे जिल्ह्यातील अमरावती प्रकल्प ‘ओव्हरफ्लो’च्या मार्गावर

धुळे जिल्ह्यातील अमरावती प्रकल्प ‘ओव्हरफ्लो’च्या मार्गावर

Next

आॅनलाइन लोकमत
मालपूर (जि.धुळे) : शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथील अमरावती मध्यम प्रकल्प यावर्षी झालेल्या तुरळक पावसावर देखील क्षमतेने भरुन ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावर असल्याचेआहे.
१४ वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर मागील वर्षी हा प्रकल्प ओसांडून वाहुन निघाला. मात्र यावर्षी मागील वर्षीच्या तुलनेत खुपच तुरळक पाऊस झाला. १५ जुननंतर येथे शेतशिवारातुन पाणी बाहेर निघालेच नाही. तरी देखील धरणाच्या पाणलोटक्षेत्रात झालेल्या पावसामुळे या प्रकल्पाची पाणी पातळी २२४.८५ मीटर पर्यंत पोहचली असुन सध्या पाण्याचा ओघ सुरुच असुन २२५.७० मीटर पर्यंत पाणी साठा झाल्यावर हा प्रकल्प यावर्षी देखील पुर्ण क्षमतेने भरुन ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावर असल्याचे चित्र दिसून येत आहे.
हा प्रकल्प धुळे नंदुरबार जिल्हांच्या सिमेवर मालपूर गावापासून दोन किलो मीटर पश्चिम दिशेला नाई व अमरावती नदीवर बांधलेला आहे. याची याची महूर्तमेढ १९८० साली रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून झाली होती. याला पुर्ण व्हायला सन २००६ उजाडले. तब्बल २६ वषार्नंतर हा प्रकल्प पुर्णत्वास येवून पहिल्याच वर्षी पुर्ण क्षमतेने भरला. मात्र त्यानंतर भरायला एक तप पुर्ण होवुन १३ वर्ष प्रतिक्षा करावी लागली. तेव्हा मागील वर्षी ओसांडून वाहुन निघाला. यावर्षी तुलनेने खुपच कमी पाऊस झाल्याची नोंद आहे. मात्र या प्रकल्पाच्या पाणलोटक्षेत्रात शनिमांडळ कडे सतत पाऊस होत असल्यामुळे तसेच मागील वषीर्चा जिवंत साठा शिल्लक असल्यामुळे भरण्याच्या उंबरठ्यावर असुन पाण्याची लेव्हल येण्यास फक्त एक मीटर पाणी साठा येण्याची गरज असुन नाई व अमरावती या दोनही नद्यांमधून जलस्रोत वाहत असुन हा प्रकल्प यावर्षी देखील क्षमतेने भरुन ओव्हरफ्लो होईल असे या प्रकल्पाचे प्रभारी शाखा अभियंता प्रशांत खैरनार यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
मागील वर्षीच्या म्हणजे ३०जुन पर्यंत या प्रकल्पात पाणी पातळी २२२.९० मीटर म्हणजे ३२० दक्षलघफु.होती. हा जिवंतसाठा होता. यात वाढ होवुन १३ सप्टेंबर मधरात्री पर्यंत २२४.८५ मीटर म्हणजे ५५८ दक्षलघफुच्या वर दिसून येत आहे. २२५.७० पाणी पातळी झाल्यावर हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरुन यापुढे पाणी पातळीत वाढ झाल्याचे दिसून आल्यास या प्रकल्पातुन पाण्याचा विसर्ग करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.यामुळे रात्री बेरात्री पाऊस झाल्यास अमरावती नदी काठावरील नागरिकांनी तसेच दोंडाईचा शहरातील नदीकाठी राहणाº्या नागरिकांनी सावध रहावे. मागील वर्षी खरीप व रब्बी दोन्ही हंगामात शेती साठी आवर्तन सोडण्यात आली होती. रब्बी हंगाम ७० हेक्टर व कालव्या प्रवाहामध्ये २१० असे एकुण १८० हेक्टरला याचा लाभ मिळाला होता. यातुन ४९ हजार रुपये वसुली होवुन अद्याप ५६ हजार थकबाकी असल्याचे प्रकल्पाच्या अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले.दोन्ही कालवे मिळुन शिंदखेडा तालुक्यातील २५७१ हेक्टर व नंदुरबार जिल्ह्यातील ३५ हेक्टर असे एकुण २६०६ हेक्टर जमीन ओलिताखाली आली आहे.

Web Title: On the way to Amravati project 'overflow' in Dhule district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे