वाडी शेवाडीतून बुराई नदीत पाणी सोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:39 IST2021-05-20T04:39:04+5:302021-05-20T04:39:04+5:30
यावेळी चिमठाणे गटाचे जिल्हा परिषद सदस्य वीरेंद्रसिंग गिरासे, पंचायत समिती सदस्य दिपक मोरे, रणजित गिरासे, जयसिंग गिरासे, धनराज ...

वाडी शेवाडीतून बुराई नदीत पाणी सोडले
यावेळी चिमठाणे गटाचे जिल्हा परिषद सदस्य वीरेंद्रसिंग गिरासे, पंचायत समिती सदस्य दिपक मोरे, रणजित गिरासे, जयसिंग गिरासे, धनराज माळी, बाजार समिती उपसभापती अनिल गायकवाड, माजी पस सभापती डॉ. दीपक बोरसे, भीमसिंग गिरासे, जखाणे सरपंच बंटी बागूल, उपसरपंच गुलाब पाटील, कोमलसिंग गिरासे, अमराले उपसरपंच भैय्या पाटील, डॉ. अमोल बोरसे, परसामळ सरपंच नारायणसिंग गिरासे, निशाणे सरपंच विनायक पाटील, दिलीपसिंग गिरासे, आरावे सरपंच संजय गिरासे, दिलीप धनगर, चिमठाणे येथील योगेंद्रसिंग गिरासे, राजेंद्र बागले, प्रकाश जैन, देगाव येथील दगेसिंग गिरासे, सरपंच पिन्टू पाटील, शेवाडे येथील कोमलसिंग टेलर, अर्जुन कोळी, संदीप कोळी, शरद मोरे, पाटबंधारे विभागाचे उपभियंता महाले, अभियंता खैरनार व परिसरातील ग्रामस्थ व शेतकरी उपस्थित होते.
बुराई प्रकल्पातील १४५ दलघफु पाणी २० गावांच्या पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस असून, बुराई नदी काठावरील व वाडी शेवाडी प्रकल्पाच्या परिसरातील गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत होती, यासाठी प्रकल्पातून पाणी सोडावे , शी मागणी आ. रावल यांनी पत्राद्वारे केली होती. ती मागणी त्वरित मान्य करीत आरक्षित पाण्यातून १२० दलघफु पाणी सोडावे, असा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी केला होता. आज आ. रावल यांच्याहस्ते बुराई नदीत, पान नदीत तसेच डाव्या कालव्यात सोडण्यात आले. यामुळे परिसरातील गावांना दिलासा मिळाला आहे.