शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
2
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
3
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
4
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
5
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
6
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
7
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
8
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
9
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
10
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
11
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
12
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
13
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
14
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
15
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
16
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
17
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
18
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम
19
एक अंध तर दुसरा अपंग, तरीही मिळून तिसऱ्याला संपवलं! घटना ऐकून पोलीसही झाले स्तब्ध
20
घरात लग्नाची तयारी, होणाऱ्या पतीसोबत करायचं होतं फोटोशूट पण तरुणीसोबत घडलं आक्रित अन्...

कार दुचाकीच्या अपघातात वाखारकर नगरातील महिला ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2020 22:25 IST

गरताड शिवार : कारचालक घटनेनंतर फरार

धुळे : चाळीसगाव रोडवरील गरताड शिवारात भरधाव कारने एका मोटारसायकलीला जोरदार धडक दिली़ मोटारसायकलीवरुन पडून कल्पना दिलीप जगताप (३४, रा़ वाखारकर नगर, धुळे) या महिलेच्या डोक्यावरुन कारचे चाक गेले़ त्यात तिला गंभीर दुखापत झाल्याने तिचा मृत्यू ओढवला़ अपघाताची ही घटना ३ जानेवारी रोजी रोजी सायंकाळच्या सुमारास घडली़गरताड शिवारात अपघात, एक ठारयाप्रकरणी सतिष शांताराम आभाळे (रा़ वेल्हाणे देवाचे ता़ धुळे) यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली़ त्यानुसार, ३ जानेवारी रोजी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास चाळीसगाव रोडने एमएच १८ एव्ही ४३२१ या क्रमांकाच्या मोटारसायकलीने जात असताना धुळे तालुक्यातील गरताड शिवारातील आदित्य पेट्रोल पंपाच्या जवळ पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या एमएच ४१ सी ६९९२ क्रमांकाच्या कारने मोटारसायकलीला धडक दिली़ या अपघातात मागे बसलेल्या कल्पना दिलीप जगताप या मोटारसायकलीवरुन खाली पडल्या़ कारचे चाक त्यांच्या डोक्यावरुन गेले़ या अपघातात कल्पना जगताप यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली़ परिणामी त्यांचा मृत्यू ओढवला़अपघाताच्या ठिकाणी कारचालक न थांबता धुळ्याच्या दिशेने पळून जाण्यात यशस्वी ठरला़ अपघात झाल्यानंतर परिसरातील नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली होती़ कल्पना जगताप यांना हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषीत केले़ याप्रकरणी ३ जानेवारी रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास मोहाडी पोलीस ठाण्यात भादंवि कलम २७९, ३०४ (अ), ३३८, ४२७ सह मोटार वाहन कायदा कलम १८४, १३४/१७७ प्रमाणे कारचालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला़शिराळेजवळ अपघात, एक ठारमुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर शिंदखेडा तालुक्यातील शिराळे गावाजवळ भरधाव लक्झरी बसने मोटारसायकलला धडक दिली़ यात गोपीचंद उत्तम पाटील (४८, रा़ पाडळसरे ता़ अमळनेर जि़ जळगाव) या इसमाचा मृत्यू झाला़ तर याच अपघातात प्रविण सदाशिव अहिरे (४०, रा़ पाडळसरे ता़ अमळनेर जि़ जळगाव) यांना गंभीर दुखापत झाली आहे़ अपघाताची ही घटना ३ जानेवारी रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली़ याप्रकरणी चंद्रशेखर ताराचंद पाटील (रा़ पाडळसरे ता़ अमळनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन लक्झरी बसचालक समाधान धनराज देसले या संशयितांविरोधात नरडाणा पोलीस ठाण्यात ३ जानेवारी रोजी मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला़ पोलीस उपनिरीक्षक एस़ के़ पाटील घटनेचा तपास करीत आहेत़

टॅग्स :DhuleधुळेAccidentअपघात