शहरं
Join us  
Trending Stories
1
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
2
सांगलीत मोठा ट्विस्ट; विशाल पाटील यांची ताकद वाढली! वंचित बहुजन आघाडीने दिला पाठिंबा
3
शरद पवार हेच महाराष्ट्राचा आत्मा, मोदींना ४ जूनला कळेल; जयंत पाटलांचा पलटवार
4
रायबरेली आणि अमेठीतून कोण निवडणूक लढवणार?; काँग्रेस नेत्याच्या दाव्याने सर्वच हैराण
5
Rohit Sharma throwback picture: रोहित शर्माच्या आईने वाढदिवशी शेअर केला 'हिटमॅन'चा जुना फोटो, चाहत्यांनी केल्या भन्नाट कमेंट्स
6
होय माझा आत्मा भटकतोय! शरद पवारांचा शिरुरमधून नरेंद्र मोदींवर पलटवार, 'मी लाचार होणार नाही'
7
मनीष सिसोदिया यांचा जामीन अर्ज पुन्हा फेटाळला, लोकसभा निवडणुकीदररम्यान आपला मोठा धक्का  
8
रणबीर-आलियाच्या फुटबॉल टीमची Finals मध्ये एन्ट्री, स्टेडियममध्ये केलं सेलिब्रेशन
9
'भटकती आत्मा' म्हणत मोदींचा हल्लाबोल; अजित पवार म्हणाले, पुढच्या सभेत मी...
10
'10 वर्षांपूर्वी देशात रिमोट कंट्रोलचे सरकार होते', लातूरमधून PM मोदींची काँग्रेसवर जोरदार टीका
11
IPL 2024 LSG vs MI: बर्थ डे बॉय रोहित शर्माचा 'जबरा फॅन', हिटमॅनच्या कृतीनं जिंकली मनं!
12
Rohit Sharma Record, Mumbai Indians IPL 2024: 'बर्थडे बॉय' रोहितला आजच्या सामन्यात मोठा विक्रम करण्याची संधी, हव्यात फक्त 'इतक्या' धावा
13
“राम मंदिराच्या लोकार्पणात गरीब अन् शेतकरी कुठे दिसले का?”; राहुल गांधींचा थेट सवाल
14
Guru Gochar 2024: बारा वर्षांनी वृषभ राशीत होणार गुरुबदल; वर्षभर अनेक शुभ-अशुभ घटना घडणार ; वाचा!
15
‘एकत्र येऊन मतांचा जिहाद करा’, काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांच्या पुतणीचा व्हिडीओ व्हायरल  
16
देवेंद्र यादव दिल्ली काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली नियुक्ती
17
'युपीत असते, तर उलटं टांगून...', सीएम योगी आदित्यनाथांचा हल्लाबोल
18
Rahul Gandhi : "जेव्हा सकाळी उठतील तेव्हा जादुने महिलांच्या बँक अकाऊंटमध्ये 1 लाख येतील..."
19
T20 World Cup 2024: विश्वविजेत्या इंग्लंडच्या संघाची घोषणा! घातक गोलंदाजाची अखेर एन्ट्री
20
T20 World Cup संघ निवडीच्या हालचालींना वेग: जय शाह, अजित आगरकर यांच्यात बैठक

साक्री व धुळे ग्रामीणमध्ये रात्री ८ वाजेपर्यंत मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2019 12:01 PM

विधानसभा निवडणूक : जिल्ह्यात सर्वाधिक शिरपूर तर धुळे शहर मतदारसंघात सर्वात कमी मतदान

धुळे : विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील पाचही मतदारसंघात सोमवारी काही किरकोळ वाद वगळता शांततेत मतदान झाले. शिरपूर मतदारसंघात सर्वाधिक ७० टक्के तर धुळे शहरात सर्वात कमी ५०.२० टक्के मतदान झाले आहे. साक्री तालुक्यातील बोडकीखडी येथे रात्री साडे सात वाजेपर्यंत तर धुळे ग्रामीण मध्ये कापडणे आणि तिसगाव ढंढाणे येथे रात्री आठ वाजेपर्यंत मतदान झाले. एकूणच यंदा शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातील मतदानाचा टक्का वाढला.जिल्ह्यात पाचही मतदारसंघात सोमवारी सकाळी सात वाजेपासून मतदानास सुरुवात झाली होती.जिल्ह्यातील पाचपैकी सर्वाधिक मतदान शिरपूर मतदारसंघात ७० टक्के त्याखालोखाल धुळे ग्रामीणमध्ये ६४.२० टक्के, साक्रीत ६२.२० टक्के, शिंदखेडा ६२.२० टक्के तर सर्वात कमी मतदान धुळे शहर विधानसभा मतदारसंघात ५०.२० टक्के मतदान झाले.धुळे शहरात ईव्हीएम बंदधुळे शहर मतदारसंघातील भंगार बाजार, चितोड रोडवरील मनपा शाळेतील सकाळी काही काळ ईव्हीएम मशिन बंद पडले होते. त्यानंतर भंगार बाजार आणि चितोडरोडवरील मशिन सुमारे २० मिनिटांनी सुरु झाले.फागणेत तासभर बंदधुळे ग्रामीण मतदारसंघातील फागणे येथील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेतील मतदान केंद्रावर एका खोलीतील सकाळी दोन वेळा ईव्हीएम मशिन बदलण्यात आले. तर दुसऱ्या खोलीतील व्हीव्हीपॅड मशिन देखील बंद पडले होते.वडजाई येथे दोन मशिन बदललेधुळे ग्रामीण मतदार संघातील वडजाई येथील मतदान केंद्रावर मतदान सुरु झाल्यानंतर ईव्हीएम मशिनमध्ये बिघाड झाल्याने ते दोनदा बदलण्यात आले.दुसऱ्यांदा बदलल्यानंतर ते मशिन व्यवस्थित सुरु झाले होते.सकाळी मतदान प्रक्रिया सुरु झाल्यानंतर दुपारपर्यंत धीम्या गतीने मतदान झाले. मात्र दुपारी एक वाजेनंतर मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागण्यास सुरुवात झाली.अनिल गोटेंचा आरोपधुळे शहर मतदारसंघात दुपारी दीड वाजेच्या सुमारास माजी आमदार अनिल गोटे यांनी देवपुरातील नेहरु नगरात शनि मंदिर परिसरातील एका ठिकाणी कॉम्प्लेक्समध्ये पैसे वाटप होत असल्याचा आरोप केला. तसेच स्वत: त्याठिकाणी भेट दिली. त्यानंतर डीवायएसपी सचिन हिरे देखील त्याठिकाणी आले. त्यांनी गोटे यांनी सांगितलेल्या दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून त्याठिकाणी ठेवलेली ५० हजाराची रोकड आणि बनावट पिस्तुल जप्त केले. ते त्यांनी तपासासाठी भरारी पथकाच्या ताब्यात दिले. तपासअंती ती बनावट पिस्तुल नसून लायटर असल्याचे पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांनी सांगितले. यासंदर्भात पोलिसात कुठलीही नोंद झालेली नव्हती.धुळे ग्रामीण मतदारसंघात चुरसधुळे ग्रामीण मतदारसंघात सरळ लढत असल्याने याठिकाणी मतदान केंद्रावर प्रचंड चुरस दिसून आली. मतदारसंघातील प्रमुख गावे कुसुंबा, बोरीस, लामकानी, कापडणे, शिरुड, न्याहळोद, फागणे, मुकटी, नेर, खेडे या ठिकाणी मतदान केंद्राबाहेर लावण्यात आलेल्या काँग्रेस आणि भाजपच्या बुथवर मोठी गर्दी दिसून आली. मतदान केंद्रावर जास्तीत जास्त मतदारांना पोहचविण्यासाठी काँग्रेस - भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड चुरस दिसून आली.मुस्लिम भागात जास्त उत्साहधुळे शहरातील मुस्लिम भागात जास्त उत्साह दिसून आला. सकाळपासून मुस्लिम परिसरातील मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागलेल्या दिसून आल्यात. शहरात देवपुरातील एल.एम.सरदार येथील मतदान केंद्रावर तर सायंकाळी सात वाजेपर्यंत मतदान सुरु होते.

टॅग्स :Dhuleधुळे